आरोग्य विभागातील. Aarogya vibhag vaidikiya vibhag रिक्त ,११,५०० महिनाभरात निकाली;
आरोग्य विभागातील रिक्त पदांची महिन्याभरात निकाली; वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती.
राज्यामध्ये आरोग्य विभागामध्ये बरेचसे पद रिक्त असून. त्या पदांचा आकडा अकरा हजार पाचशे इतका आहे. राज्यामध्ये आरोग्य विभागामध्ये परिचारिकासह वेगवेगळ्या पदांच्या ११ हजार ५०० जागा असून त्या जागा भरण्याचा येत्या सोमवारी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच महिन्याभरामध्ये पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी ग्वाही राज्याच्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीशजी महाजन यांनी पत्रकारांना दिली आहे. तसेच राज्यांमधील शिक्षक पदाच्या पन्नास हजार जागा देखील लवकरात लवकर भरल्या जातील. अशी ग्वाही सुद्धा गिरीजी महाजन यांनी लोकमत सी बोलताना सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व रुग्णालयातील रिक्त पदांविषयी गिरीशजी महाजन यांना त्या संदर्भात माहिती विचारली असता. त्यांनी संपूर्ण राज्यभरात असलेल्या रिक्त पदांच्या जागांविषयी माहिती लोकमत शी बोलताना जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील संपूर्ण आरोग्य विभागातील ११ हजार ५०० जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी राज्यातून जवळपास 11 लाख अर्ज आले आहेत. मात्र त्या कडे मागील सरकारने म्हणजे महाविकास आघाडी सरकारने एवढ्या वर्ष आरोग्य विभागाच्या भरतीकडे लक्ष दिले नाही तसेच भरती सुद्धा होऊ शकली नाही.
आरोग्य विभागातील आता जागा भरण्यासाठी येत्या सोमवारी बैठक घेणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यादिवशी गिरीजी महाजन स्वाक्षरी देतील अशी माहिती सुद्धा कळवली आहे.
वैद्यकीय भरती एका महिन्यामध्ये पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पात्र उमेदवारांची अंतिम यादी एकाच महिन्यामध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. असे त्यांनी
सांगितले आहे.
आरोग्य विभागासह शिक्षण विभागातील बॅकलॉग लागणार लवकरच मार्गी
राज्यामध्ये आरोग्य विभागातच नव्हे तर शिक्षकांच्या देखील राज्यामध्ये ४० ते ५० हजाराच्या जवळपास रिक्त पदे असून त्या देखील लवकरच भरण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीजी महाजन यांनी सांगितले.
राज्यातील शिक्षण भरती शिक्षण विभागाचा असला तरी गिरीजी महाजन यांच्याकडे ग्रामविकास खाते असल्याने ग्रामविकास खाते जिल्हा परिषददेशी तो निगडित आहे. राज्यातील शिक्षण भरती विषयी शिक्षणमंत्र्यांशी गिरीशजी महाजन या विषयावर चर्चा केली आहे. तसेच त्या विषयाचे सर्व प्रश्न शिक्षण भरती विषयाच्या सर्व मार्ग लवकरच निकाली काढले जातील असे महाजनांनी ग्वाही दिली.