बीटी कापूस लागवड तंत्रज्ञान – bt cotton farming 2021

bt cotton farming नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतामध्ये तसे इतर देशांमध्येही नगदी पीक म्हणून ओळख असलेले कापूस bt cotton farming  (cotton) पिकाचे मोठ्या प्रमाणात लागवड होते तसेच भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये लागवड होते परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये कपाशीचे cotton एकूण 22 टक्के शेत्रफळ कपासाची लागवड होते व शेतकरी या जे पिकाकडे नगदी पीक म्हणून पहाता महाराष्ट्रामध्ये विशेषता खानदेश विदर्भ मराठवाडा मध्ये बी.टी (bt cotton) कपासाचे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते व शेतकरी यांच्या पासून योग्य उत्पन्न घेने होत नाही कारण ..

Netaji Subhashchandra Bose Informatioan in Marathi-नेताजी सुभाष चंद्र बोस मराठी

bt cotton farming 2021 – बीटी कापूस लागवड तंत्रज्ञान

बीटी कापूस लागवड तंत्रज्ञान - bt cotton farming 2021

योग्य जमिनीची निवड न करणे खताचे व्यवस्थापन चुकणे लागवडीची वेळ निघून जाणे bt cotton farming  तसेच कपाशी cotton तील अंतर यांच्यातील नियोजन चुकणे म्हणून शेतकऱ्यांना बी.टी कपाशी (bt cotton farming) फायदेशीर ठरत नाही. कारण शेतकऱ्यांनी आधी घेतलेल्या बी.टी कपाशीच्या bt cotton India उत्पादनात व आताच्या उत्पन्नात जमीन-अस्मानचा फरक आहे

तसेच खूप तफावत आहे आता पिकामध्ये बी.टी (bt cotton farming) कपाशीच्या खूप घसरण झालेली आहे कारण शेतकऱ्यांचे प्रत्येक गोष्टीचे नियोजन चूकत आहे म्हणायचे एकच की शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुस्कान फवारणी खत जमिनीची निवड (bt cotton farming) याच्यावर होणारा खर्च त्याच्यामुळे जास्त प्रमाणात बी.टी कपाशीचे bt cotton farming उत्पादन होत नाही. कारण जमिनीमध्ये सेंद्रिय हा गर्भ राहिला नाही रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम हा बीटी कपाशीवर (bt cotton farming) होत आहे म्हणून उत्पन्नात वाढ होत नाही म्हणून जमिनीमध्ये सेंद्रिय किंवा शेणखत टाकणे गरजेचे असते.

कपाशीसाठी जमिनीची योग्य निवड  bt cotton farming

शेतकरी मित्रांनो आपण जर कपाशीची (cotton) लागवड करत असल्यास कोणत्या जमिनीमध्ये लागवड करावी किंवा कोणत्या जमिनीमध्ये कपाशी (cotton) लागवड करु नाही आपण पुढील प्रमाणे जमिनीचा फरक पाहू तर मित्रांनो बी.टी कपाशीची (bt cotton) लागवड करत


असताना जमिनीची कोणती काळजी घ्यायची तसेच पानचीव जमीनीमध्ये किंवा ज्या जमिनीमध्ये पाणी साचते त्या जमिनीमध्ये (bt cotton farming) कपाशीची लागवड करू नये त्या जमिनीमध्ये कपाशीची लागवड bt cotton Plants केल्यास कपाशीची पूर्णपणे वाढ होत नाही कपाशीचे झाड हे पूर्णपणे पीकुन जाते जसे पिवळसर पडून जाते व कपाशीला फुलधारणा किंवा

बीटी कापूस लागवड तंत्रज्ञान - bt cotton farming 2021

बोंडे लागत नाहीत म्हणून अशा जमिनीमध्ये कपाशीची bt cotton ppt लागवड करू नये कपाशीची लागवड करण्यासाठी योग्य जमीन निवडावी भारी हलकी निचरा होणारी अशा जमिनीमध्ये कपाशीची लागवड (bt cotton farming) केल्यास फायदेशीर ठरते तसेच पाणथळ किंवा पानचिवजमिनीमध्ये लागवड केल्यास जमिनीमध्ये चर पाडावे किंवा पाणी शेताच्या बाहेर काढून द्यावे जमिनीची खोली 95-100 सेंटीमीटर असावे तसेच जमिनीचा सामू 5.5 ते 8.5 असावा अशा जमिनीमध्ये कपाशीची लागवड केल्यास फायदेशीर ठरते..

कपाशी लागवडीसाठी हवामान/ bt cotton farming

शेतकरी मित्रांनो bt cotton बी.टी कपाशीची लागवड करत असताना हवामानाची ही गरज असते आणि हवामानावर सुद्धा बीटी कपाशीचे उत्पादन अवलंबून असते तर बीटी पिकाची बीटी कपाशी ला उगवणीसाठी 16 अंश सेल्सिअस तर वाढीसाठी 21 ते 27 अंश तापमानाची गरज असते बोंडे लागणे किंवा फुलपात्या परिपक्व होण्यासाठी 26 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आसने गरजेचे असते .

नक्की वाचा – vigna mungo – असे काढा उडीद पीक, उडीद लागवड व व्यवस्थापन 2021

कोरडवाहू लागवडीसाठी सरासरी 500 ते 600 मि मी पावसाची आवश्यक असतो. कमी पाऊस पडला तर करोडो कपाशी कमी उत्पादन देते आणि बोंडे पण कमी लागतात व फुलधारणा सुद्धा कमी होतो आणि उत्पन्नात आपल्याला खूप मोठे नुसकान होतो म्हणून कोरडाऊ bt cotton lagvad बी .टी कपाशी लागवडीसाठी सरासरी 500 ते 600 मी पावसाची ची आवश्यकता असते..

Bt cotton कपाशी लागवडीसाठी जमिनीची मशागत bt cotton farming

शेतकरी मित्रांनो बीटी कपाशीची bt cotton lagvad लागवड करत असताना जमिनीची मशागत कोणत्या प्रकारे करायची जमिनीची मशागत करताना जमिनीची एकदा खोलगट नांगरणी करून घ्यावी नांगरटी झाल्यानंतर आपली जमीन दोन ते अडीच महिने पडून राहू द्यायचे नांगरटी हे मार्च ते एप्रिल महिन्यातच करून घ्यावी जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आपली जमीन पूर्णपणे तापुन जाते व जमिनीतील कीड हे मरन पावते व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो

नंतर लागवडीच्या किंवा पावसाच्या आधी जमिनीतील वखराच्या साह्याने किंवा ट्रॅक्‍टरच्या साह्याने रोटावेटर मारून जमिनीतील ढेकळे बारीक करून घ्यावे तसेच जमिनीची नांगरटी दरवर्षी न करता दोन ते तीन वर्षातून एकदा करावी दरवर्षी केल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा कमी होते व जमिनीतील पीक हे जोमाने किंवा त्याची वाढ चांगली होत नाही म्हणून जमिनीची नांगरट हे दोन ते तीन वर्षातून एकदाच करून घ्यावी..

जमीनीतील सेंद्रिय खताचे नियोजन bt cotton lagvad in Marathi2020

शेतकरी मित्रांनो आपण ज्या शेतांमध्ये bt cotton lagvad कपाशीची लागवड करत आहे अश्या शेतामध्ये आपण जर सेंद्रिय किंवा आपले शेणखत टाकले तर जमिनीची पोत चांगल्याप्रकारे सुधारते तसेच जमिनीची पाणी शोषून घेण्याची शक्ती सुद्धा वाढते तसेच जमिनीची पोत सुधारतो व हवासुद्धा खेळती राहते अन्नद्रव्य उपलब्ध होतात तसेच जमिनीला असणारे पोषक जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते

बीटी कापूस लागवड तंत्रज्ञान - bt cotton farming 2021

तसे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्मात सकारात्मक बदल होतो सेंद्रिय खतांमुळे प्रामुख्याने लोह बोरॉन झिंक मॅग्नेशियम इत्यादी सूक्ष्म मूलद्रव्यांचे प्रमाण वाढते तसेच आपण शेवटची उन्हाळ्यातील वखरटी

देण्याअगोदर शेतामध्ये चांगल्या प्रकारे सेंद्रिय किंवा शेणखत मिसळून टाकावे कमीत कमी दहा ते बारा गाड्या कोरडवाहू व बागायती साठी 25 ते 30 गाड्या कुजलेले चांगले शेणखत टाकावे टाकल्यामुळे जमिनीची पोत चांगल्या प्रकारे राहते चांगल्या प्रकारे पाणी सून घेण्यास मदत होते म्हणून शेणखताचा किंवा सेंद्रिय खताचा वापर केल्यास पिकांची वाढ चांगली होते व उत्पन्नात चांगली वाढ होते..

Bt cotton full form lagvad/ जमिनीतील पिकांची फेरपालट का करावी..

शेतकरी मित्रांनो आपण जर कपाशीची लागवड करत असल्यास आपण दर वर्षी एका शेतामध्ये कपाशी लागवड करू नये जमिनीमध्ये फेरपालट करणे गरजेचे असते तर फेरपालट करत असताना कोणते पीक घ्यायचे तर मित्रांनो आपण आदल्या वर्षी जमिनीमध्ये ऊळीद सोयाबीन तूर हायब्रीड मका असे पीक घेतले

असल्यास नंतर दुसऱ्या वर्षी त्या शेतामध्ये कपाशीची लागवड करावी नाहीतर आपण कपाशीच्या शेतामध्ये कपाशीची लागवड केली तर उत्पन्नात घट होते कारण जमिन तापण्याला वेळ भेटत नाही तसेच यावर्षीची कीड त्या शेतामध्ये राहते व पुढच्या वर्षी आपण पेरलेल्या कपाशीवर लवकर किडीचा प्रादुर्भाव होतो उत्पन्नही कमी होतो म्हणून आंतरपीक घेतले तर जमिनीचा प्रकार सुद्धा बदलतो व जमिनीची पोत सुधारत म्हणून अशाच जमिनीमध्ये कपाशीची लागवड करा..

जातीची निवड/ bt cotton class 12 bt cotton lagvad in Marathi2020

शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाच्या जातीची निवड करत असताना प्रत्येक शेतकरी विचलीत आहे कारण कोणती व्हरायटी किंवा कोणत्या जातींची लागवड करा हे शेतकऱ्यांना नेमके कळत नाही व आपल्या भागात कोणत्या जातीची लागवड करणे योग्य राहील असे शेतकऱ्यांना माहिती राहा नाही म्हणून शेतकरी कोणती व्हेरायटी किंवा जात घेण्यात विचलित होतात कारण मार्केटमध्ये बीटी कपाशीच्या भरपूर जाती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोरडवाहू जातीची निवड करणे गरजेचे असते व बागायती शेतीसाठी बागायती निवड करणे गरजेचे असते आपण जर फेरपालट केले तर उत्पन्नात घट होऊ शकतो व

आपले पीकही चांगले होत नाही म्हणून तर आपल्या भागामध्ये कोणता वाण चालते याची निवड करणे गरजेचे असते तर काही बाबी लक्षात घेता बागायतीसाठी व करोडो साठी लवकर येणारा वाहन घेणे गरजेचे असते तसेच झाडाची रोग प्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे असते तसेच किडींचे सहनशीलता करनारे वाण निवडा तसेच बोंडे मोठी असणारे निवडावे व धाग्याची चांगली प्रत असणारे निवडावे पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावे अशा काही बाबी लक्षात घेऊन आपल्या शेतातील वाहत निवडावा व उत्पन्नात चांगली वाढ मिळवावे..

Bt cotton full form lagvod पेरणी वेळ.bt cotton lagvad in Marathi2020

शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाची लागवड करत असताना मान्सूनचा पहिला पाऊस किंवा जमिनी ते तीन ते चार इंच वल झाल्यावर कपाशीची लागवड करणे योग्य राहते तसेच लागवड जर उशिरा केली तर एकरी 1 क्विंटल उत्पन्नात घट होते म्हणून वेळेवर लागवड करणे गरजेचे असते जास्त उशिरा लागवड करू नये उत्पन्नात जास्तीत जास्त घट होते म्हणून मान्सूनचा पाऊस पडल्यानंतर किंवा जमिनीची तीन ते चार इंच वल झाल्यावर कपाशीची लागवड करणे योग्य राहते.

Bt cotton lagvad कपाशी लागवडीचे अंतर/ bt cotton pdf

शेतकरी मित्रांनो bt cotton कपाशी लागवड करत असताना बागायती आणि कोरडवाहू लागवडीसाठी वेगवेगळे अंतर असते तर मित्रांनो आपण जर बागायती कपाशीची लागवड करत असल्यास 4 फूट बाय 2 फूट अंतरावर लावणे गरजेचे असते तसेच करोडो साठी 3.5 फूट बाय 1.5 फुटावर झाड लावणे गरजेचे असते तर मित्रांनो आपण कपाशीचे या प्रकारे लागवड केली तर आपल्या उत्पन्नात चांगली वाढ होते..

शेतकरी मित्रांनो मी लिहिलेला लेख माझ्या स्वतःच्या अनुभवा प्रमाणे लिहिलेला आहे तरी मी कपाशीचे पीक दरवर्षी व विक्रमी उत्पादन घेत असतो या अनुभवातून लिहलेली माहिती आहे माहिती आवडल्यास सर्व शेतकरी बांधवांना पर्यंत पोहोचवावी व शेर करावी..

धन्यवाद शेतकरी मित्रांनो

Leave a Reply

Your email address will not be published.

x