घरकुल योजना Gharkul yojan list 2021 घरकुल योजनेतील 10 लाख अपात्र नावे
आपल्या देशामध्ये गरीब लोकांसाठी केंद्र सरकारने पक्के घर असावे व प्रत्येकाला त्या पक्क्या घराचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेतून खूप मोठ्या संख्येने घरकुल योजना राबवल्या जात आहे. परंतु त्याच्यामध्ये चांगले व श्रीमंत लोक सुद्धा लाभ घेत होते.
ग्रामीण भागातील गरीब अल्पभूधारक घर नसलल्या व्यक्तींनी घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून घरांचा लाभ दिल्या जात असतो मात्र यादीत चांगली परिस्थिती असलेल्या नावांचाही समावेश आढळून आला आहे. त्यामुळे आधार कार्डच्या आधारे पडताळणी करून वेगवेगळ्या कारणाने राज्यातील 10 लाख 84 हजार 575 नावे केंद्रसरकारच्या पडताळणी वरील एनआयसी प्रणालीतून अपात्र केली आहे.
ग्रामीण भागात गरीब घर नसलेल्या व्यक्तींना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारमार्फत पंतप्रधान घरकुल योजना राबवली जात आहे. त्या अनुसार प्रत्येक गावातून दोन वर्षांपूर्वी याद्या गोळा केल्या होत्या. ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ती नावे एनआयसी प्रणालीतून अपलोड केली व केंद्र सरकारने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे याद्या परत आल्यावर संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत वस्तुस्थिती चे फोटो एनआयसी प्रणाली वर अपलोड केले. त्यातून 75 लाख 60 हजार 56 व्यक्तींची नोंदणी झाली होती.
त्या नावांची एनआयसीन पडताळणी करून संबंधितांच्या नावे दुचाकी, चारचाकी, मालमत्ता बँक ठेवी प्लॉट, फ्लॅट, पूर्वीचे पक्के घर, दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन यासह आर्थिक बाब भक्कम असल्याचे स्पष्ट करणाऱ्या नोंदणी आहेत. अशा व्यक्तींची नावे एनआयसी प्रणालीच्या पडताळणी मध्ये अपात्र झालेली आहे.
अपात्र झालेली राज्यातील 10 लाख 84 हजार 575 नावे आहेत. 46 लाख 69 हजार 596 व्यक्तींची नावे पात्र असल्याचे सांगण्यात आले आहे. आता राहिलेल्या नावान बाबत पात्र नावे असलेल्या व्यक्तींचे ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत कुटुंबप्रमुखाचे जॉब कार्ड मॅप करण्याचे काम सुरू आहे. अपात्र झालेल्यात कोल्हापूर, नगर जिल्ह्यातील सर्वाधिक नावे आहेत. सर्वाधिक जास्त पात्र उमेदवारांचे नावे नांदेड जिल्हा व जळगाव खानदेश जिल्ह्यामध्ये आहेत.
घरकुल अपात्रतेला कोण जबाबदार ?Gharkul yojan list
ग्रामीण भागात अजूनही बहुसंख्येने अनेकांना पक्के घर नाहीत. त्यात बहुतांश शेतकरी कष्टकरी, कामगार, शेतमजूर, महिला परितक्त्या, महिलांचा समावेश आहेत. मात्र यामध्ये त्यांना अत्यंत पक्क्या घराची गरज असूनही स्थानिक पातळीवर म्हणजेच गाव पातळीवर राजकारणात या विषयाची सातत्याने चर्चा होत असते. केवळ आपल्या पक्षाची किंवा आपल्या बाजूची व्यक्ती नाही हे कारण पुढे करत लाभ मिळणार नाही यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले जातात. मात्र आता केंद्र सरकारच्या एलआयसी प्रणालीमुळे या स्थानिक जिल्हा अथवा राज्य पातळीवरही कोणाला हस्तक्षेप करता येत नाही त्यामुळे अपात्र झालेल्या नावाला ह स्थानिक पातळीवर कोणी जबाबदार नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
जिल्हानिहाय अपात्र संख्या (कंसात जिल्ह्याची पात्र संख्या)
धुळे:२५३१७ (१७४२१८)
कोल्हापूर:७८७८७ (१०२८९२),१५२९१ (४२०४८)
रायगड :११११७ (३८६९५)
गोंदिया:३४९३५ (१०८६७९)
अमरावती: ३१४०१ (९४२७४२)
अकोला: २१५०१ (७१६४९)
गडचिरोली :२२३८२ (७९९४०)
सातारा: २९९८३ (८८११८)
वर्धा: २२७७५ (५२३३८)
जळगाव: ५१९२१ (२६४८०८)
नंदुरबार: १८३७५ (१८०९५६)
पुणे: ३५०७६ (७७९७८)
रत्नागिरी: १४४८९ (६४२५७)
सिंधुदुर्ग: १६११० (२०६१९)
हिंगोली: १०२८९ (११३७१४)
चंद्रपुर: ३२०६८ (१२३३०८)
नागपूर: ३३४३६ (५५८८४)
उस्मानाबाद :१९९४४ (१०४३४८)
अहमदनगर :६५८९२ (२२७७०८)
परभणी: ३१६१७ (१५७९१८)
औरंगाबाद: ३८१०६ (२२२८४१)
जालना: ३५८९२ (१८५९५९)
वाशिम: २६८३९ (११६५४२)
नांदेड :४१५०५ (३०९८०२)
पालघर : १९२४४ (९३४९२)
बीड: ३०३८० (२२८२७२)
भंडारा: ३०७१५ (९२८५२)
बुलढाणा: ३४६२६ (२०१९३३)
सोलापूर: ३९६४६ (१६७८३८)
यवतमाळ : ४६०१६ (३०३४६२)
लातूर :२९२७६ (१२२८०३)
सांगली: ४०१६३ (९२४२०)
नाशिक: ४९५७२ (२४५६३)
वर दिलेले आकडे हे पूर्ण जिल्हा वाईस आहेत. या आकड्यांमध्ये जी आकडेवारी बिगर कंसामध्ये आहे ती आकडेवारी पात्र लाभार्थ्यांची आहे. तर जी आकडेवारी कंसात मध्ये दर्शवली आहे. ती आकडेवारी अपात्र झालेले लाभार्थ्यांची आहे.