Guava Farming in Marathi 2021
पेरू लागवड तंत्रज्ञान /Peru lagvad
महाराष्ट्रात पेरू या (Guava Farming) पिकाची मोठया प्रमाणात लागवड होत आहे. भारतामध्ये २.६८ लाख हे. क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. प्रामुख्याने उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यात या (Guava Farming) पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात एकूण ४०,०ooहे. क्षेत्रावर पेरु लागवड केली जाते. लागवडीखालील क्षेत्रात उत्तरप्रदेशानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. सध्या महाराष्ट्रातील पेरू (Guava Farming) या पिकाची उत्पादकता अवघी ८.१ मे. टन प्रती ` हेक्टर इतकी आहे. या उलट उत्तरप्रदेश आणि बिहार `~ या राज्यात ती अनुक्रमे १३.४ आणि १२.५ मे. टन प्रती हेक्टर एवढी आहे. पेरू (Guava Farming) फळाच्या साल व गरामध्ये क जीवनसत्व मोठया प्रमाणात उपलब्ध असते. मलावरोध, रक्तविकार व रक्तपित्त इ. विकारात पेरु अतिशय गुणकारी आहे.
Bigboss Marathi – Big Boss Marathi
Peru lagvad हवामान:–
पेरु लागवड माहिती पेरुची लागवड Peru lagvad प्रामुख्याने उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात केली जाते. कमाल तापमान कक्षा असणा-या प्रदेशात हे पीक चांगले येते. जास्त पावसाच्या तसेच दमट हवामानाच्या प्रदेशात देवी या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते.
जमीन:-
पाण्याचा उत्तम निचरा होणारी, हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत या पिकाची लागवड करावी. जमिनीची खोली किमान दोन फूट असावी.जमिनीचा सामू साधारणतः ६ ते ७.५ या दरम्यान असावा. चुनखडीयुक्त किंवा पाण्याचा निचरा न होणा-या जमिनीत या पिकाची pera लागवड करणे टाळावे.
Peru lagvad लागवड तंत्रज्ञान
१) पारंपरिक पध्दत : या पध्दतीमध्ये जमिनीची
आखणी करून ६ x ६ मी. अंतरावर ६0 x ६0 x ६0 सें. मी. आकाराचे खड़े ध्यावेत. हे खड़े भरतांना १५ ते २0 किलो चांगले कुजलेले शेणखत, ५o0 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ५ ग्रॅम फॉलीडॉल पावडर आणि माती या मिश्रणाने खडु भरून घ्यावेत व रोपाची लागवड करावी.
२) घन लागवड : या पध्दतीत ३ × २ मी.अंतरावर ५o × ५o × ५० सें.मी. आकाराचे खडे घ्यावेत. यामध्ये साधारणतः ५ ते १० किलो चांगले कुजलेले शेणखत, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २.५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर, २५ ग्रॅम पीएसबी, २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर आणि ५ ग्रॅम फॉलीडॉल पावडर पोयटा मातीत मिसळून या मिश्रणाने खडे भरून घ्यावेत व रोपाची लागवड करावी.
नक्की वाचा – बीटी कापूस लागवड तंत्रज्ञान – bt cotton farming 2021
पेरु खत व्यवस्थापन Peru lagvad लागवड पद्धतप्रथम वर्षीदुसऱ्या वर्षीतिसऱ्या वर्षीचौथ्या वर्षीलागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यानंतर (प्रती झाड )जून ते जानेवारी (प्रती झाड )जून ते जानेवारी (प्रती झाड )जून ते जानेवारी (प्रती झाड )घनबाग७५:३०:३० ग्रॅम नत्र ,स्फुरद व पालाश +५ ग्रॅम शेणखत +२५ ग्रॅम प्रत्येकी अ्झोटोबॅक्टर पीएसबी आणि ट्रायकोडर्मा१३०:७५:७५ ग्रॅम नत्र , स्फुरद व पालाश +५ ग्रॅम शेणखत +२५ ग्रॅम प्रत्येकी
अझोटोबॅकटर पीएसबी आणि ट्रायकोडर्मा१३०:७५:७५ ग्रॅम नत्र , स्फुरद व पालाश +७ ग्रम शेणखत +५०ग्रम प्रत्येकी अझोटोबक्टर पीएसबी आणि ट्रायकोडर्मा२०५:११२:११२: ग्रम नत्र , स्फुरद व पालाश + १० ग्रम शेणखत + ५० ग्रम प्रत्येकी अझोटोबॅक्टर , पीएसबी आणि ट्रायकोडर्मापारंपारिक लागवड९०:३०:३० ग्रम नत्र , स्फुरद व पालाश + १० ग्रम शेणखत + २५ ग्रम प्रत्येकी अझोटोबॅक्टर ,पीएसबी आणि
ट्रायकोडर्मा१८०:६०:६० ग्रॅम नत्र , स्फुरद व पालाश + २० ग्रॅम शेणखत + २५ ग्रॅम प्रत्येकी अझोटोबॅक्टर , पीएसबी आणि ट्रायकोडर्मा२७०:९०:९० ग्रॅम नत्र , स्फुरद व पालाश + ३० ग्रम शेणखत + ५० ग्रम प्रत्येकी अझोटोबॅक्टर पीएसबी आणि ट्रायकोडर्मा४५०:१५०:१५० ग्रम नत्र , स्फुरद व पालाश + ४० ग्रम शेणखत +५० ग्रम प्रत्येकी पीएसबी आणि ट्रायकोडर्मा
जाती सरदार (लखनऊ-४९) पेरु फळ जाती
या जातीच्या पेरूची(Guava Farming) महाराष्ट्रात मोठया प्रमाणात लागवड केली जाते. या जातीच्या फळाचे सरासरी वजन २00 ते २५० ग्रॅम असून फळांचा रंग पिवळसर हिरवा असतो. फळ आकाराने मध्यम गोलाकार असून गर पांढरा व गोड असतो. या जातीत विद्राव्य घटकाचे प्रमाण सरासरी १२ ते १४ टक्के असते. या जातीपासून प्रती हेक्टरी पारंपरिक पध्दतीत २० ते २५ टन तर घनबाग लागवडीतून ४० ते ४५ टन उत्पादन घेता येते.
कीड व्यवस्थापन/ पेरु वरील रोग
फळमाशी:-
ओळख : प्रौढ माशी घरी दिसणा-या माशीसारखीच पण आकाराने लहान म्हणजे ५ ते ६ मि.मी. लांब असते. माशीचे मागील भाग टोकदार व गर्द कथ्या रंगाचे असून पंख सरळ लांब असतात. या माशीच्या अळ्यांना पाय नसतात. या मळकट पांढ-या असून १० ते १२ मि.मी.लांब परंतू तोंडाच्या बाजूस निमुळत्या असतात. कोषावस्थेत त्या जमिनीत असतात. प्रौढ माशा अर्धपक्व फळात २ ते ३ मि.मी.
खोल एक एक करून अंडी घालतात. एक माशी साधारणत: १o0 ते १५0 अंडी घालते. २ ते ३ दिवसात या अंडयातून अळ्या बाहेर पडतात आणि फळातील गर खातात. परिणामी अंडी घातलेल्या ठिकाणी फळे सडतात आणि गळतात. या अळ्या तापमानानुसार ५ ते २० दिवसानंतर १० ते १५ सें.मी. खोलीवर जमिनीत कोषावस्थेत जातात. साधारणपणे ८ ते १० दिवसात कोषातून प्रौढ माशा बाहेर पडतात. सर्वसाधारणपणे एका वर्षात अनेक पिढ्या तयार होतात.
पेरु peru व्यवस्थापन:
प्रादुर्भावग्रस्त फळे वेचून जमिनीत खोलवर पुरून टाकावीत.
झाडाच्या सभोवताली जमिनीची वखरणी/कुदळणी करावी व मिथील पॅरॉथियॉन भुकटी जमिनीत मिसळावी.
मिथील युजेनॉल/रक्षक सापळयांचा (एकरी १० ते १२) वापर करावा.
प्रौढ माशांच्या बंदोबस्तासाठी २० मि.ली. मॅलॅथियॉन + २00 ग्रॅम मळी या प्रमाणात २० लिटर पाण्यातून बागेच्या सभोवताली फवारणी करावी. अगर प्लॅस्टिक डब्यात हे द्रावण जागोजागी झाडावर लटकावे.
बागेत स्वच्छ, भरपूर सुर्यप्रकाश व खेळती हवा राहण्यासाठी हलकी छाटणी करावी.
पिठ्या ढेकूण:-
या किडीची पिले आणि प्रौढ लहान, चपटी व ३ ते ४ मि.मी. लांब असून शरीराभोवती मेणकट पांढरा रेशमी कापसासारख्या पदार्थ असतो. त्यामुळे कोड एकदम दिसून येत नाही. जमिनीतून अंड्यातून निघालेली पिल्ले झाडावर चढतात आणि नवीन पाने आणि फळांच्या देठाजवळ पोहचतात. तेथे ती एकाच ठिकाणी बहुसंख्येने एकत्रितपणे फळाच्या देठाजवळून तसेच फळाच्या मागील भागातून रस शोषण करतात. फळातील रस शोषण केल्यामुळे फळांची वाढ न होता ती गळतात; फळे वाकडी ति कडी होतात.पेरु रोप नर्सरी
अ) उन्हाळ्यात झाडालगत नांगरणी केल्यास अंडी नष्ट होतात. काही पक्षी खातात तर काही सुर्याच्या उष्णतेने मरतात.
ब) या किडीच्या नियंत्रणासाठी जैविक व्हर्टिसिलियम-४0 ग्रॅम १oo मि.ली. दुधात मिसळून १० लीटर पाण्यातून फवारावे.
क) जमिनीच्या ३० सें.मी. वर खोडावर ग्रेिसचा पट्टा दिल्यास अगर चिकट जेल लावल्यास पिल्ले झाडावर चढणार नाहीत.
मावा:-
ही कोड पानाच्या खालच्या बाजूला समूहाने राहून सतत रस शोषण करतात. प्रौढ माव्यास बहुदा पंख नसतात. त्यामुळे प्रौढ आणि पिले या समूहात सारखीच दिसतात. त्यांचे शरीर नाजूक व कोमल असून शरीराच्या शेवटी शिंगासारखी एक जोडी असते. मादी मावा अंडी न देता सरळ पिल्लांना जन्म देतात. तसेच नर मादीच्या मिलनाशिवाय पिल्लांना जन्म दिला जातो. या किडींची पिले व प्रौढ समूहाने पानातून आणि कोवळया फुटीतून सतत रस शोषण करतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने पिवळी पडतात, चुरगळल्यासारखी होतात व शेवटी पानगळ होते. परिणामी पेरू(Guava Farming) फळाच्या प्रतिवर विपरित परिणाम होतो.
उपाययोजना:-
माव्याच्या नियंत्रणासाठी ४ टक्के निंबोळी अकांची फवारणी करावी. आवश्यकता असल्यास आंतरप्रवाही किटकनाशकाची फवारणी करावी. त्यासाठी मॅलॅथियॉन ५o टक्के प्रवाही अगर डायमेथोएट ३o टक्के प्रवाही १० मि.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच जास्त प्रादुर्भावग्रस्त पाने तोडून नष्ट करावीत.
साल पोखरणारी अळी:-
या किडींचा प्रादुर्भाव जुनी झाडे किंवा दुर्लक्षित बागेत जास्त प्रमाणात दिसून येतो. या किडीची अळी मळकट पिंगट कथ्या रंगाची, दंडगोलाकृती असून अंगावर लांब केस असतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३५ ते ४० मि.मी. लांब असते. पतंग भुरकट रंगाचा, मध्यम आकाराचा व मजबूत बांध्याचा असतो. अळी प्रथम साल खाऊन त्याचा भुगा व लाळ यांच्या साहाय्याने तेथे तोंडापासून जाळे तयार करते. नंतर ती खोडात छिद्र करते. छिद्राच्या राहून रात्रीच्या वेळी बाहेर येते आणि भुयारी जाळ्यात राहून पुढेपुढे साल खाते आणि जाळे तयार करीत असते. परिणामी अन्नपुरवठा खंडीत होऊन येतो, म्हणून वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
पेरु peru व्यवस्थापन:-
या किडीच्या व्यवस्थापनासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर याच कालावधीत विशेष लक्ष देऊन उपाययोजना करावी. यावेळी खोडात फारशी छिद्रे झालेली नसतात, बहुदा बाहेरच जाळे असतात. ती नष्ट करावीत. यानंतर जाळ्याच्या एका टोकास पाहिल्यास छिद्र दिसेल. प्रथम जाळे स्वच्छ करून त्यात अणकुचीदार तार घालून वरखाली करावी म्हणजे आतील अळी मरेल. या छिद्रात तेल देण्याच्या पिचका-यांच्या साहाय्याने डी.डी.व्ही.पी.चे द्रावण टाकावे. हा प्रभावी उपाय पुन्हा पुन्हा करावा. तसेच झाडावर व फांद्यावर या कीटकनाशकाची फवारणी करावी.
पांढरी माशी:-
या किडीची पिले आणि प्रौढ माशा सतत पानातून रस शोषण करित असतात. रस शोषण करतांना ही कोड पानावर चिकटगोड पदार्थ सोडतात.
परिणामी त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन पाने, फळे व फांद्यासहित झाड काळे पडते. त्यामुळे पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय येतो. त्यामुळे उत्पादन व गुणवत्तेवर परिणाम होतो. अशा फळांना अतिशय कमी भाव मिळतो.
एकात्मिक पीक संरक्षण (सारांश):-
बागेमध्ये स्वच्छ सुर्यप्रकाश राहील व हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी.
बाग तणविरहित ठेवावी.
रस शोषणा-या किडींच्या नियंत्रणासाठी जैविक व्हर्टिसिलियम ५० ग्रॅम + १०० मि.ली. दुधात घेऊन ते १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
फळमाशीच्या नियंत्रणासाठी रक्षक सापळ्यांचा वापर करावा.
मर रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा पावडर (१oo ग्रॅम प्रती झाड) शेणखतात मिसळून मातीत टाकावी. अथवा १ टका बोडॉमिश्रणाची मातीत जिरवणी करावी.
फळांवरील डागांसाठी बाविस्टीन (o.१ टक्के) + मॅन्कोझेब (o.२ टक्के) ची फवारणी करावी.
आता आपण सघन पध्दतीने पेरू(Guava Farming) कसा लावावा ते आपण बघूया तेसुद्धा काळजीपूर्वक:-
पेरू (Guava Farming)फळपिक कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे फायदेशीर पीक आहे. इतर फळझाडांच्या तुलनेत पेरूचे(Guava Farming) पिक कमी खर्चाचे हमखास उत्पादन देणारे आणि कमी मेहनतीचे असल्याने ह्या पिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.
पेरूची (Guava Farming) सघन लागवड पध्दत किंवा मिडो ऑर्चड पध्दत:
पेरूच्या (Guava Farming)सघन लागवड पध्दतीमध्ये दोन लागवड पध्दतीने लागवड करता येते. पहिली पध्दत म्हणजे 2 X 1 मीटर (6 X 3 फूट) अंतरावर लागवड व दुसरी पध्दत 7.5 X 7.5 फुट अंतरावर लागवड करणे.
जर आपण 2 X 1 मीटर अंतरावर लागवड केली असेल तर आपल्याला वर्षातून तीन छाटण्या कराव्या लागतात यासाठी मजुरांची गरज जास्त लागते याचा विचार करता 7.5 X 7.5 फूट अंतरावर लागवड कमी खर्चिक आहे.
7.5 x 7.5 फूट लागवड अंतराचे तंत्रज्ञान:
जर आपण पेरूची लागवड 7.5 X 7.5 फूट अंतरावर केली तर एकरी पेरूचे(Guava Farming) 774 झाडे बसतात आणि अशा पध्दतीने एकरी 15 ते 18 टनापर्यंत उत्पादन मिळते. पेरूच्या(Guava Farming) प्रतीमध्ये चांगली सुधारणा होते.
सघन पध्दतीने लागवड केल्यामूळे ठिबक सिंचन पध्दतीचा वापर करून पिकाला गरजेनूसार पाणी देता येते. जमिनीत सतत वाफाचा परिस्थिती राहिल्यामूळे उत्पादनात वाढ होते.
मे महिन्यात एकदाच चांगली छाटणी केली तर पेरूचे (Guava Farming)चांगले उत्पादन मिळते. पेरूच्या(Guava Farming) झाडाची जास्त वाढ होत असेल तर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात वाढणारा शेंडा हाताच्या सहाय्याने एकदाच काढला तर पुढची वाढ थांबते व त्यामूळे फांदीवर फुलांची संख्या वाढते.
पेरूची(Guava Farming) सर्व फळे जाड फांदी व खोडावर येत असल्यामूळे त्याचा आकार व प्रतही चांगले मिळते.
झाडाची मे महिन्यात छाटणी करताना जाड फांद्या ठेवून बाकीच्या सर्व बारीक काड्या छाटाव्यात. झाडाच्या मुख्य खोडापासून आलेल्या चार ते पाच उपयुक्त फांद्या आणि त्यानंतर आलेल्या लहान फांद्या अशा प्रकारे झाडांना आकार देण्यात येतो.
जुन महिन्यात पाऊस पडल्यानंतर किंवा गरजेप्रमाणे पाणी दिल्यानंतर झाडांना फूट येण्यास सुरूवात होते. पाण्याची उपलब्धता असेल तर लवकर छाटणी करून हंगामापूर्वी फळे बाजारपेठेत पाठविता येतात.
पाणी देण्याअगोदर शिफारशीत मात्रेमध्ये शेणखत, रासायनिक खते, आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडाच्या खोडाभोवती रिंग करून द्यावेत किंवा ठिबक मधून सोडावेत (शेणखत सोडून)
झाडाला पालवी आल्यानंतर सुरूवातीला फुले हे झाडाच्या जाड फांद्या आणि खोडावर येतात. या फळाचा आकार, वजन आणि गुणवत्ता चांगली असते. फळांची गोडी चांगली असते. झाडाला भरपूर फूट येऊन पानांची संख्या चांगली मिळते. नंतरचा बहार हा नविन आलेल्या शेंड्यांना येतो.
पेरूच्या(Guava Farming) पहिल्या फळाची काढणी सप्टेंबर -ऑक्टोबर मध्ये होते. तर दुसरी फळे फेब्रुवारी-मार्च किंवा यापेक्षा थोडी उशीरा मिळतात. फळाला चांगला बाजारभाव मिळतो.
फळांच्या उत्पादनानूसार झाडांना दोनदा चाळणी करावी लागते. झाडांच्या जुन्या मुळ्या तुटून नवीन पांढरी मुळे येण्यासाठी शेत भुसभुशीत ठेवावे. अंतरमशागतीसाठी पॉवर टिलरचा वापर करावा म्हणजे खर्चात बचत होते.
पेरूचे मिडो ऑर्चड तंत्रज्ञान:
या पध्दतीमध्ये पेरूची (Guava Farming)लागवड 2 X 1 मीटर अंतरावर केली जाते. व एकरी 2000 झाडांची लागवड करता येते. या पध्दतीने जर लागवड करायची असेल तर छाटणी तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत असणे महत्त्वाचे आहे. जर आपल्याला छाटणी तंत्र समजले तर आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे घेता येईल नाहीतर चांगल्या प्रतीच उत्पादन घेता येत नाही.
पेरूचे(Guava Farming) मिडो ऑर्चड छाटणी तंत्रज्ञान:
पहिल्यांदा 2 X 1 मी. म्हणजेच दोन ओळीतील अंतर 2 मी. व दोन झाडातील अंतर 1 मी. या अंतरावर लागवड करावी.
लागवड केल्यानंतर दोन महिन्यांनी 50-60 से.मी. जमिनीपासून खोड ठेवून छाटणी करावी.
सुरूवातीला आकार देताना चार दिशेच्या चार फांद्या फक्त ठेवाव्यात. म्हणजे झाडाला चांगला आकार येतो.
पहिल्या छाटणीनंतर तीन महिन्यांनी परत एकदा फांद्यांची छाटणी करावी. यामध्ये फांदीचे 50 टक्के (अर्धी फांदी) छाटणी करावी. फक्त तांबड्या रंगाची परिपक्व फांदीचा खालचा भाग आहे तसाच ठेवावा.
दुसऱ्या छाटणीनंतर तीन महिन्यांनी परत एकदा ज्या नविन फांद्या फुटलेल्या आहेत या फांदीची 50 टक्के म्हणजे सुरूवातीचा 50 टक्के शेंड्याच्या भागाची छाटणी करावी.
पेरु paru छाटणीचे कशी करायची ते आपण बघूया:-
महिना व करावयाची कामे:—-
छाटणी संदर्भात माहिती:—
1)
पेरूची(Guava Farming) लागवड
दाब कलमांच्या रोपांची लागवड करावी पेरु छाटणी कसी करावी
2)
लागवडीनंतर 3 महिन्यांनी
जमिनीपासून 60 सेमी अंतरावर शेंडा तोडणी/कट करावा
3)
पहिल्या छाटणीनंतर 3 महिन्यांनी परत दुसरी छाट्णी करावी. (लागवडीनंतर 6 महिन्यांनी)
3-4 फांद्या चारी बाजूने सारख्या अंतरावर ठेवून इतर फांद्या काढून टाकाव्यात
4)
दुसऱ्या छाटणीनंतर 2-2.5 महिन्यांनी परत तिसरी छाटणी करावी (लागवडीनंतर 9 महिन्यांनी)
चार फांद्या ज्या ठेवल्या आहेत (प्राथमांक) या फांद्यांची 50 टक्के (अर्धा) छाटणी करावी व खालचा 50 टक्के (अर्धा) भाग जो परिपक्व व तांबड्या रंगाचा आहे तोच भाग ठेवावा.
5)
तिसर्या छाटणीनंतर परत पुन्हा 3 महिन्यांनी फांद्यांची चौथी छाटणी करावी (लागवडीनंतर 12 महिन्यांनी)
ज्या परिपक्व फांद्या ठेवलेल्या आहेत त्या फांद्यांची 50 टक्के शेंडा छाटणी करावी म्हणजेच या ठिकाणी फुले लागतात व फळधारणा होते.
6)
लागवडीनंतर 1 (महिन्यांची 1.5 वर्षानंतर)
पहिल्यांदा फळधारणा होते.
7)
फळे काढणी केल्यानंतर (लागवडीनंतर 23 महिन्यांनी किंवा फळधारणेनंतर 5 महिन्यांनी)
एकुण फांदीच्या 50 टक्के फांदीची छाटणी करावी. (सर्व फांद्या- बॅक प्रुनिंग)
8)
छाटणीनंतर दोन महिन्यांनी (लागवडीनंतर 25 महिन्यांनी)
दुसरी फळधारणा
9)
लागवडीनंतर 30 महिन्यांनी
तिसरी फळधारणा
पहिली फळधारणा लागवडीनंतर 18 महिन्यांनी
फळे काढणी केल्यानंतर पुन्हा एकदा एकूण फांदीच्या 50 टक्के फांदीची छाटणी करावी. (सर्व फांद्याची-बॅक प्रुनिंग करावी)
छाटणीनंतर पुन्हा दोन ते तीन महिन्यात परत फळधारणा चालु होते.
तुलना: पारंपारिक लागवड आणि सघन लागवड पध्दती:—-
तुलनात्मक भाग:—-
पारंपारिक लागवड पद्धत
सघन लागवड पद्धत:–
1)
फळधारणा
तिसऱ्या वर्षापासून चालू होते
पहिल्या वर्षापासून चालू होते
2)
उत्पादन
12-15 टन/हेक्टर
30-45 टन/हेक्टर
3)
व्यवस्थापन—
झाडाचा आकार मोठा असल्याने थोडे अवघड होते.
झाडाचा आकार लहान असल्यामूळे सोपे होते.
4)
मजूर
जास्त
कमी
5)
उत्पादन खर्च
जास्त
कमी
6)
तोडणी / काढणी
अवघड
सोपी
7)
फळांचा दर्जा:—
मोठा आकार, विस्तार, जास्त फांद्या, यामुळे फांद्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे फळांचा दर्जा चांगला मिलत नाही.
झाडांचा कमी विस्तार यामुळे सर्व फांद्यांना सूर्यप्रकाश मिळतो, हवा खेळती राहते, रोग व कीड कमी प्रमाणात येते व सर्व फांद्यांना व फळांना सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे फळांचा दर्जा व उत्पादन सुधारते.
अश्या प्रकारे आपण पेरूची (Guava Farming)लागवड करू शकतो.