Krishi Vibhag Yojana – एकाच नंबर वरती मिळवा आता शेती योजनांची माहिती 2020
शेतकरी मित्रांनो आता कृषी विभागाने(Krishi Vibhag Yojana) शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे एक नंबर आपल्या मोबाईल मधे सेव करून घ्या आणि सर्व शासनाचे जीआर आणि कृषी विभागातील(Krishi Vibhag Yojana) नवीन नवीन योजना अनुदान तसेच शेती विषयक माहिती शेतकऱ्यांना भाग मिळणार आहे आपल्या मोबाईल वरती तर शेतकरी मित्रांनो एक नंबर असा आहे की तो आपण आपल्या मोबाईल मध्ये सेव करून घ्यायचा आहे तर काय आहे सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहे
शेतकरी मित्रांनो शासनाने नवीन नवीन शेतकऱ्यांसाठी योजना राबवत असते किंवा नवीन नवीन योजना निघाल्या तर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना त्यांची ताबडतोब किंवा लगेच माहिती मिळाली पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजेच व्हाट्सअप च्या माध्यमातून शेतकऱ्यांना लगेच त्या योजनेची माहिती आपल्या मोबाईल वर तीच मिळणार आहे आता आपल्याला कुठलेही टिव्ही चैनल किंवा पेपर वाचण्याची गरज राहणार नाही जे काही शासनाचे जीआर असतील किंवा कुठलीही माहिती असेल ते आपल्या मोबाईल वरती पाहायला मिळणार आहे तर करा शेतकरी मित्रांनो हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव करा.
नक्की वाचा – Maha Awas Abhiyan – निघाला जी आर पहा घरकुल मिळणार 2020
राज्यातील कृषी विभागाच्या(Krishi Vibhag Yojana) विविध योजनांची माहिती तंत्रज्ञानाची सांगाळ घेतल्याचे काम सुरू असून विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आता व्हाट्सअप आणि ब्लॉग या माध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.
राज्यात सुमारे 9 कोटी 37 लाख मोबाईल धारक असल्याची बाब लक्षात घेऊन कृषी विस्तार कार्यांमध्ये या बाबीचा फायदा होऊ शकतो हे लक्षात घेऊन व्हाट्सअप द्वारे कृषी विषयक योजना व तंत्रज्ञानाबाबत परिणामकारक माहिती मिळवावी म्हणून याटो रिप्लायची सुविधा तयार करण्यात आली आहे.
मातीत राबविणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता ब्लॉक आणि व्हाट्सअप चा वापर करण्या येत आहे.
मोबाईलवरून. 8010550870 या व्हाट्सअप क्रमांकावर ‘नमस्कार’ किंवा ‘हॅलो’ शब्द टाईप करून पाठविणारा व्यक्तिस स्वागत संदेश प्राप्त होतो. ज्यामध्ये कृषी विभागाच्या प्रचलित योजनांबाबत संक्षीप्त शब्द (की वर्डस्) दिले आहेत ते टाईप करून या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवल्यावर शेतकऱ्याला हव्या त्या योजनेची माहिती मिळेल.
सध्या या उपक्रमात कृषी विभागाच्या जवळपास 27 योजनांचा समावेश केला असून त्या कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश करून त्यांची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.
विभागामार्फत योजनांचा अद्ययावत माहितीसाठी krushi-
vibhag.blogspot.com हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे त्याद्वारे कृषी योजनांची व्याप्ती; लाभार्थी; निकष; अनुदान; व अर्ज कुठे करावा याबाबत माहिती देण्यात आली
आहे.
धन्यवाद..