- Krushi Saur pump सौर पंपांसाठी ९० टक्के अनुदान मिळणार.
शेतकऱ्यांना मिळणार सौर पंपासाठी 90 टक्के अनुदान जाणून घ्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया. नियम व अटी लागू
- ई ग्राम: केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. त्यातच शेतकऱ्यांसाठी आता Krushi Saur pump कुषी सौर पंपांसाठी 90 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार कृषी सौर पंप. किसान ऊर्जा सुरक्षा आणि उन्नती अभियान कुसुम योजनेअंतर्गत केंद्र सरकारने सौर ऊर्जा सह देशभरात सिंचनासाठी वापरलेले सर्व डिझेल इलेक्ट्रिक पंप चालवण्याची योजना आखली आहे कुसुम योजना माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्र सरकारच्या सर्वसाधारण अर्थसंकल्प 2018 19 मध्ये जाहीर केले होता.
२०२०-२१ च्या कुसुम योजनेच्या अर्थसंकल्पात व अर्थसंकल्पांतर्गत २० लाख सौर पंपांना अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे डिझेलचा वापर आणि कच्च्या तेलाच्या आयातीवर खूप मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.
Maharashtra Cheif Minister List
•कुसुम योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व महत्त्वकांक्षी .
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कुसुम योजनेचा फायदा देशातील शेतकऱ्यांना दोन प्रकारे होणार आहे. एक त्यांना सिंचनासाठी विनामूल्य वीज मिळेल आणि दुसरे म्हणजे त्यांनी अतिरिक्त वीज बनवून ग्रेडर ला पाठवले तर त्यातून त्यांचे उत्पन्न वाढेल याशिवाय सौर ऊर्जा उपकरणे बसवण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के रक्कम द्यावी लागेल उर्वरित रक्कम केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अनुदान म्हणून देण्यात येईल. कुसुम योजना अंतर्गत बँका 30 टक्के रक्कम शेतकर्यांना कर्ज म्हणून देतील त्याच वेळी सरकार सौर पंपाच्या एकूण खर्चाच्या 60% टक्के शेतकऱ्यांना अनुदान म्हणून देईल व शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फायदा ही सुद्धा होणार आहे.
•कुसुम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया शेतकऱ्यांनी कसे करावे.
१) अर्जदाराने आधी अर्धा साठी अधिकृत संकेतस्थळावर जावे.
Https://www.mahadiscom.in/solar/वर जावे.
२) त्यानंतर होम पेजवर अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
३) तुम्हाला तिथे कुसुम योजनेचा फ्रॉम दिसेल.
४) अर्जदारास त्याची वैयक्तिक माहिती या फॉर्ममध्ये भरावी लागेल. जसे की अर्जदाराने त्याची वैयक्तिक माहिती मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
५) ऑनलाइन अर्ज पूर्ण झाल्यावर तुम्हाला कुसुम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल.
६) आता कुसुम सौर योजनेअंतर्गत भरलेला फॉर्म जमा करा.
- •शेतकऱ्यांसाठी कुसुम योजना म्हणजे काय?
सौर ऊर्जा उपकरणे बसविण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के रक्कम द्यावी लागेल केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करेल सौर ऊर्जा पंप जमिनीवर बसविले जातील कुसुम योजना अंतर्गत बँका ३० टक्के रक्कम शेतकऱ्यांना कर्ज म्हणून देतील. शेतकऱ्यांचा याच्यामध्ये आर्थिक फायदा सुद्धा होणार आहे.
सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना त्याच्या वेडे अनुसार त्याला वीज उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना होणारा त्रास याच्यामुळे वाचणार आहे.