Mega job fair-तरुणींसाठी महारोजगार मेळावा 20 डिसेंबर पर्यंत.
राज्यातील नोकरी इच्छुक तरुणांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे मंत्री कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे आव्हान.
कोणाच्या काळामध्ये राज्यातील बहुतांश तरुणांचा Mega job fair हातून गेला होता आता राज्य सरकारने ऑनलाइन नोंदणी दारे रोजगारासाठी नोंदणी करता येणार आहे.
सविस्तर.
कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राज्यात 12 व 13 डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन Mega job fair मेळाव्यात उमेदार उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
त्यामुळे या मेळाव्याचा कार्यक्रम आता 20 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींनी व उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे मल्लिक यांनी तरुण-तरुणींना व उद्योजकांना आवाहन केले आहे.
रोजगार मेळाव्यात सहभागासाठी नोकरी इच्छुक तरुणांनी//HTTPS://rojgar. mahaswayam.gov.in या वेबसाईट पोर्टलवर मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी.
राज्यातील तरुण-तरुणी साठी नोकरी इच्छुक उमेदवारांना साठी ही एक सुवर्णसंधी असून यामध्ये राज्यातील सर्वसाधारणपणे 9वी पासून ते पुढे दहावी-बारावी, आयटीआय, डिप्लोमा, तसेच बी व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार सहभागी होऊ शकता.
नक्की वाचा – प्रधानमंत्री पीक विमा 2020- pradhanmantri Pik vima information in marathi
:- मेळाव्यात राज्यातील नामांकित उद्योजकांचा सहभाग.
मेळाव्यामध्ये दररोज विविध क्षेत्रातील उद्योजक आपला सहभाग नोंदवत आहेत. आतापर्यंत नामांकित उद्योजकांनी सहभाग नोंदविला आहे. तसेच राज्यातील 20 ते 25 कंपन्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.
•[ ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे..
हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंती क्रमांक नोंदविणाऱ्या उमेदवारासाठी घेण्यात येत आहे त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी विभागाच्या//Https://rojgar.mahaswayam.gov.in
या वेबसाईटला भेट द्यावी.
नोकरीसाधक (job seeker) लॉगिन मधून आपल्याला युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉग इन करावे
त्यानंतर डॅशबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्या जॉब फेअर या बटनावर क्लिक करून प्रथम आपणास जिथे अर्ज करावयाचा आहे तो जिल्हा निवडून त्यातील, STATE LEVEL MEGA Job FAIR या रोजगार मेळाव्याचे निवड करावी यानंतर View Vacancy List पाहून उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. आवश्यकता पात्रता
धारण करिता असल्याची खात्री करून पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन आपली पात्रता असलेल्या रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.
इच्छुक व ऑनलाइन पसंती क्रमांक नोंदवणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमांकानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण दिनांक, व वेळ एसमेस, दूरध्वनी, ईमेल, किंवा सोयीच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल शक्य असेल तिथे ऑनलाईन, किंवा ऑफलाईन, मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल.
अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे असे मंत्री. नवाब मलिक यांनी सांगितले