Mukhyamantri Sahayata nidhi मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळण्याचा मार्ग अगदी सुलभ
मित्रांनो शासनामार्फत विविध योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी तसेच महाज्योती, जीवन ज्योती अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शासन रुग्णांना मदत करत असते. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून रुग्णांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.
Mukhyamantri Sahayata nidhi मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून रुग्णांना काय मिळणार ?
मित्रांनो मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन सुविधा व नवीन योजना चालू करण्यात आली आहे. CMRF Maharashtra मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी आता एक नंबर दिला आहे.8650567567 या नंबर वरती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळवण्यासाठी एक मिस्ड कॉल देतात मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज तुमच्या मोबाईलवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. या अर्जामध्ये तुम्हाला रुग्णांची पूर्ण माहिती भरावी लागणार आहे.
Mukhyamantri Sahayata nidhi
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आर्थिक दुर्बल घटकांना दुर्धर आजारावर रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून थेट रुग्णांना मदत जाहीर केली जाते. यामध्ये रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया तसेच वेगळ्या मोठ्या आजारांवरही उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत दिली जाते.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा अर्ज
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज कुठे मिळतो, तो रुग्णांनी कसा भरायचा किंवा तो अर्ज आणखी कुठून घ्यायचा किंवा मुख्यमंत्री कार्यालयातून घ्यावा का? अशा अनेक समस्या सर्वसामान्यांना पडल्या आहेत. सर्वांच्या समस्या व शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने एक नवा उपक्रम जारी केला आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता CMRF Maharashtra निधीसाठी वरील क्रमांकावर अर्जाची लिंक तुमच्या मोबाईल वरती एसएमएस द्वारे दिली जाईल. एसएमएस द्वारे आलेल्या लिंक वर तुम्ही क्लिक करता. मोबाईलवर अर्ज डाऊनलोड होईल. या अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज व्यवस्थित रित्या भरून त्याच्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्र व पोस्ट द्वारे किंवा स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात cmrf.maharashtra.govn.in तुम्हाला या ईमेल आयडीवर पाठवता येईल, ही माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख श्री मंगेश चिवटे यांनी सूत्रांना दिली आहे.
Mukhyamantri Sahayata nidhi मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये सर्वात जास्त रुग्णांचे अर्ज हे कर्करोगासाठी येतात. त्यानंतर हृदयविकार, तसेच अपघात, गुडघा पत्यारोपण, डायलेसिस, किडनी विकार, गुडघा प्रत्यारोपण या शस्त्रक्रिया किंवा उपचारासाठी सर्वात जास्त अर्ज असता. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये. सुसूत्रता यावी म्हणून शासनाने असा निर्णय ला आहे. विशेषतः
मुख्यमंत्री सहायता निधीतून कोणत्या आजारावर निधी मिळतो?
मुख्यमंत्री सहाय्यता निधी CMRF Maharashtra मध्ये मेंदू रोग, हृदयरोग, नवजात बालके, कर्करोग, डायलेसिस, अपघात, यकृत प्रत्यारोपण, हृदय प्रत्यारोपण, अस्थिबन्ध दुखापत, मूत्रपिंड प्रत्यारोपण, फुफ्फुस अशा विविध आजारावर व शस्त्रक्रियावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून रुग्णांना मदत दिली जाते.
ही माहिती आपण शासकीय वेबसाईटवर जाऊन किंवा ऑनलाईन सुद्धा पाहू शकता.