Narendra Modi PASHU AADHAR CARD पशु आधार कार्डचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा; जाणून घ्या
शेतकऱ्यांसाठी आता आणखी एक ॲप ई गोपाल च्या माध्यमातून पशु ची खरेदी-विक्री शेतकऱ्यांसाठी सोपी होणार आहे.
सविस्तार.
मागील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ई-गोपाला अॅपचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी पशु आधार कार्डचा उल्लेख केला होता. पण अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना पशु आधार कार्ड काय आहे? हे माहिती नाही. तर चला आज ते जाणून घेऊयात.
ई-गोपाला अॅपच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान म्हणाले होते की, या अॅपमध्ये प्राण्यांचा आधार ठेवण्याचे काम पूर्ण झाल्यास प्राण्यांविषयीची सर्व माहिती आपल्याला सहज मिळू शकेल, आणि यामुळे साध्या सोप्या पद्धतीने पशुंची खरेदी- विक्री करता येईल.
काय आहे पशु आधार कार्डड Narendra Modi PASHU AADHAR CARD
प्राण्यांचे टॅगिंग हे त्यांचे पशु आधार कार्ड आहे. या पशु कार्डच्या माध्यमातून देशभरातील प्रत्येक गाय-म्हशीसाठी एक अनोखा ओळख क्रमांक दिला जाईल.
Download Aadhaar Card – आता तुमचे आधार कार्ड राहील नेहमी तुमच्या जवळ
पशु आधार कार्डामुळेे Narendra Modi PASHU AADHAR CARD गुरेढोरे आपल्या सॉफ्टवेअरवरुन आणि घरी बसून जनावरांची माहिती घेण्यास सक्षम असणार आहे. याशिवाय लसीकरण, जाती सुधार कार्यक्रम, वैद्यकीय सहाय्य यासह इतर कामेही सहज करता येणार आहेत.
सध्या देशात पशुंची माहिती ठेवण्यासाठी एक मोठा डेटा तयार केला जात आहे. या माध्यमातून सरकारचा असा प्रयत्न आहे की, शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल झाले पाहिजे.
केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या म्हणण्यानुसार, येणाऱ्या दीड वर्षाच्या काळात जवळपास ५० कोटी गाईंना त्यांचा मालक, त्यांची प्रजाती आणि उत्पादकता शोधण्यासाठी डिजिटल व्यासपीठावर अनोखी आयडी देण्यात येईल. त्यासाठी जनावरांच्या कानात ८ ग्रॅम वजनाचा पिवळा टॅग ठेवला जाईल. तसेच त्या लावलेल्या टॅगवर १२ अंकी आधार क्रमांक छापला जाईल.
रूवातीला ३० करोड जनावरांना लावला जाणार टॅग
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री संजीव बालयान यांनी सांगितले आहे की, सध्या ४ करोड गाई, म्हैशीचं Narendra Modi PASHU AADHAR CARD
आधार कार्ड बनवले आहे. तर सध्या देशात ३० करोड पेक्षा जास्त गाई म्हशी आहेत.
दरम्यान, एक विशिष्ट मोहिम सुरू करून जनावरांना टॅग केले जाणार आहे. जनावरांचे टॅग पूर्ण झाल्यानंतर शेळ्या, मेंढ्या आणि बकरी यांचाही आधार तयार केला जाणार आहे. या कार्डमध्ये युनिक नंबर, मालकाचा तपशील आणि जनावरांच्या लसीकरण आणि प्रजननाची माहिती असेल.
- आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.Download App
TAGSe -gopala app Narendra Modi PASHU AADHAR CARD PRIME MINISTER ई- गोपाला अॅपपंतप्रधान नरेंद्र मोदीपशु आधार कार्डपशुसंवर्धन मंत्री