onion export latest news 2021 – कांदा निर्यात बंदी उठविताच भावात सुधारणा

निर्यात बंदी उठविताच भावात सुधारणा; शेतकऱ्यांमध्ये समाधान

केंद्र सरकारने कांदा निर्यात onion export latest news बंदी उठवल्यामुळे गुरुवारी कांद्याचे भाव ३०० ते ३५० रुपयांनी वधारले. गेले पाच महिने ही बंदी केंद्र सरकारने लादली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. पण, आता ही बंदी उठवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्वीट करून कांदा निर्यात बंदी उठवल्याची माहिती बुधवारी दिली होती. त्यानंतर या भावात वाढ झाली आहे.

onion export latest news 2021 - कांदा निर्यात बंदी उठविताच भावात सुधारणा

राज्यात सर्वात मोठा कांदा onion export latest news उत्पादक जिल्हा म्हणून नाशिक ओळखला जातो. येथील बाजारपेठेतून देशातंर्गत व जगभर कांदा पाठवला जातो. पण, अवकाळी पावासाने मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान केल्यामुळे बाजारपेठेत आवक कमी झाली. त्यामुळे कांद्याची आवक घटली व भावही वाढले. त्यानंतर केंद्र सरकारने २९ सप्टेंबर २०१९ रोजी कांद्याची निर्यात बंदीची घोषणा केली. त्याबरोबरच कांदा साठवणुकीवरही निर्बंध घातले.

Cow Information in Marathi गायची माहिती

घाऊक व्यापाऱ्याला २५ मेट्रीक टन तर किरकोळ व्यापाऱ्याला ५ मेट्रीक टन साठवणुकीची मर्यादा घातली. पण, यावर्षी कांद्याची मोठी आवक झाली. केंद्र सरकारने केलेल्या सर्व्हेनुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ ११ लाख मेट्रीक टन आहे. त्यामुळे ही बंदी उठवल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे चीनमध्ये करोनामुळे येथील कांदा निर्यात होत नसल्यामुळे जगभर कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे भारतीय कांद्याला मोठी मागणी आहे.

असे वाढले भाव

देशात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सरासरी भाव दोन हजार रुपये क्विंटल होता. यात ३०० ते ३५० रुपयांनी वाढ झाली आहे. मंगळवारी हाच भाव १७०० रुपयांच्या आसपास होता. बुधवारी बाजार समिती बंद होती. याच बाजार समितीत सर्वाधिक कमाल भाव २३५२ रुपये प्रती क्विंटल होता. तर सर्वात कमी दर हे एक हजार रुपये प्रती क्विंटल होते.

कोट

निर्यात बंदी उठवल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. करोना व्हायरसमुळे कांदा onion export latest news उत्पादक देश असलेल्या चीनची निर्यात बंद झाली आहे. त्यामुळे त्याचा फायदा भारताला मिळणार आहे. त्यामुळे ही बंदी उठवल्यामुळे कांद्याला चांगले भाव मिळेल.

सोहनलाल भंडारी, कांदा व्यापारी

निर्यात बंदी उठवल्याचा ट्वीट केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. निर्यात उठवण्याबरोबरच कांदा निर्यातील onion export latest news प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यासाठी अनुदानही द्यायला हवे. यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत कांदा उत्पादन वाढले आहे. त्यामुळे या संधीचा निर्यातीतून फायदा घ्यायला हवा. चीनची बाजारपेठ काबीज करण्याची ही संधी आहे.

onion export latest news 2021 - कांदा निर्यात बंदी उठविताच भावात सुधारणा

जयदत्त होळकर, माजी सभापती, कृऊबा लासलगाव

नक्की वाचा – गहू पिकाचे ( wheat farming 2021 ) नवीन वाण, मिळेल भरपूर उत्पन्न

चांदवडला दरवाढ

चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी कांदा onion export latest news लिलाव सुरू होताच बाजार भावात तेजी दिसून आली. गुरुवारी सकाळ सत्रात २३११ पर्यत कांद्याला बाजारभाव मिळाल्याने भावात प्रति क्विंटल ३५० ते ४०० रुपये वाढ झाल्याने शेतकरी आनंदित झाला.

जे कांदा उत्पादक आहेत त्यांच्यासाठी महत्वाचे

निफाड : कांदा निर्यातबंदी onion export latest news चार महिन्यांतर महिन्यांनी उठवल्यामुळे कांदा दरातील घसरण थांबेल आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कांदा विक्रीतून चांगले पैसे मिळतील असा आशावाद निर्माण झाला आहे. निर्यातबंदी उठवल्याने लासलगाव व पिंपळगाव बाजार समितीत बुधवारच्या तुलनेत बाजारभावात २०० रुपये वाढ झाली होती.

कांदा onion export latest news बाजारभावात होत असलेली घसरण थांबविण्यासाठी शेतकरी हित विचारात घेत केंद्र शासनाने कांदा निर्यात खुली करून साठवणुकीची मर्यादाही काढल्याने शेतकऱ्यांना कांदा भावात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.

नक्की वाचा – Sant Shiromani Savta Mali Rayat Bazar Abhiyan ‘विकेल ते पिकेल’ 2020

उन्हाळ कांद्याचीही आवक सुरू

सध्या नाशिक जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगाव या दोन मोठ्या बाजारसमित्यांसह उमराणे, येवला, सिन्नर अशा सर्व बाजार समित्यांमध्ये रोज ९० हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. यावर्षी मागच्या हंगामात साठवलेल्या उन्हाळ कांद्याला उच्चांकी भाव मिळाल्याने महागाचे रोप आणून शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. उन्हाळ कांदा onion export latest news साठविता येत असल्याने मोठी लागवड केली असून अजून १५ दिवसांनी उन्हाळ कांद्याचीही आवक सुरू होईल.

लासलगावसह जिल्ह्यातील सर्व कृषी बाजार समित्यांमध्ये लाल कांदा onion export latest news मोठ्या प्रमाणावर विक्रीस येत आहे. रब्बी कांदाही थोड्या फार प्रमाणात सुरू असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या हिताचे दृष्टीने कांद्यावरील निर्यात बंदी हटविण्याचा व व्यापारी वर्गास लागू केलेली कांदा साठवणुक मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

कांदा निर्यातबंदी onion export latest news उठविल्यामुळे बाजारभावात २०० ते ३०० रुपये वाढ होईल, अशी आशा आहे. मात्र केंद्राने निर्यातबंदी उठवल्याचे नोटिफिकेशन अजून काढले नाही.

मागील काही दिवसांपासून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले कांद्याचे दर १०-२० रुपयांनी खाली उतरून शंभर रुपये किलोपर्यंत आले असले तरीही या ओल्या कांद्याने मुंबईकरांना रडवले आहे.

सुका कांदा onion export latest news अवकाळी पावसामुळे आता बाजारात उपलब्ध नाही, असे स्पष्टीकरण व्यापारी वर्गाकडून दिले जात असले तरीही प्रत्यक्षात इतर देशांतून येणाऱ्या कांद्याची आवक वाढल्याने घरचा कांदा पडून राहील व खराब होईल या भीतीने राज्याच्या निरनिराळ्या भागांतील शेतकऱ्यांनी ओला कांद्याची काढणी करण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे ओला कांदा बाजारात अधिक प्रमाणात दिसत आहे. हा कांदा सुक्या कांद्याच्या तुलनेत अधिक झोंबणारा व चवीमध्ये अव्वल दर्जाचा नसल्याने ग्राहक नाईलाजाने हा कांदा onion export latest news विकत घेत आहेत.

साताऱ्यातील कांदा उत्पादक पांडुरंग पाटील यांनी सांगितले, ‘ उन्हाळी आणि खरीप कांद्याच्या उत्पादनात यंदा मोठी घट झाली व तुटवडा निर्माण झाला. अवकाळी पावसानेही उत्पादकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे ज्यावेळी कांद्याला योग्य दर न मिळाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

आता बाजारात कांद्याला अधिक भाव मिळत असल्याने पूर्ण तयार होण्याआधीच ओला कांदा काढला जात आहे. हा पूर्ण तयारही झालेला नाही. मात्र तुटवड्यामुळे त्याला अधिक दर मिळत आहे. कांदा उत्पादकांना यावर्षी मोठा फटका बसला आहे.’

‘केंद्र सरकारने इतर देशांमधून कांदा onion export latest news आयातीसाठी परवानगी दिली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात हा कांदा उपलब्ध आहे. आयात कांद्यामुळे आपल्या कांद्याला भाव मिळणार नाही या भीतीने कांदा उत्पादकांनी नवीन कांदा बाजारात आणला आहे,’ असे भायखळा येथील किरकोळ व्यापारी कांदा उत्पादक संघाचे सदस्य विश्वास जोगडे यांनी सांगितले.

मध्यममार्ग हवा

बाजारात उपलब्ध असलेला कांदा ओला का आहे असे विचारल्यावर अनेक विक्रेते पावसामुळे कांदा खराब झाला, असे स्पष्टीकरण देतात. काही ठिकाणी सुका कांदा उपलब्ध आहे. त्या कांद्याचे दर १०-२० रुपये अधिक आहेत. मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोघांना दिलासा देणारा मध्यममार्ग काढायला हवा, अशी प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.

onion export latest news 2021 - कांदा निर्यात बंदी उठविताच भावात सुधारणा

जेंव्हा कांदा निर्यात बंदी उठवली तेंव्हा

निर्यातबंदी उठवल्याची अधिसूचना पासवान यांच्या घोषणेपाठोपाठ उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे कांदा निर्यातीसाठी जागतिक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून पतपत्र, निर्यातीचा कोटा, किमान निर्यातमूल्य अशा अटी लागू होतील काय? अशी धास्ती भारतीय निर्यातदारांना वाटत आहे.

दरम्यान, देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव वाढताच, केंद्र सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. तत्पूर्वी देशांतर्गत भाव आटोक्‍यात आणण्यासाठी किमान निर्यातमूल्य टनाला 850 डॉलर इतके करण्यात आले होते.

तसेच सोयाबीन विषयीसुद्धा आजची परिस्थिती आपण पाहणार आहोत:

सोयाबीन शेती : विदर्भ – मराठवाड्यात बियाणं उगवलंच नाही, महाबीज म्हणते, ‘शेतकऱ्यांनी घाई केली’

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेतकरी मुकुंद पुनसे यांनी 3 एकरात सोयाबीनची पेरणी केली. सोयाबीनच्या पेरणीसाठी त्यांनी महाबीज कंपनीचं बियाणं खरेदी केलं. पेरणी करून आठ दिवस उलटून गेले असूनही बियाणं उगवलंच नाही. मुकुंद यांच्यावर आता दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे.

यावर्षी पावसानं वेळेवर हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी उत्साहानं पेरणी केली होती. त्यात मुकुंद यांनी 12 जूनला पेरणीला सुरुवात केली.

महाबीज आणि एक पोतं विक्रांत कंपनीच्या बियाण्यांची पेरणी केली. विक्रांत कंपनीचं बियाणं उगवलं मात्र सरकारी महाबीज कंपनीचं बियाणं उगवलंच नाही.

महाबीजनं मात्र त्यामागे वेगवेगळी कारणं असल्याचं म्हटलं आहे. तसंच ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्यांना आम्ही बियाणे बदलून देत आहोत, असंही त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे.

महाबीजच्या दोन्ही बॅगेतील बियाणं बोगस असल्याची तक्रार मुकुंद यांनी केली आहे. त्यांचं 50 ते 60 हजाराचं आर्थिक नुकसान झालं असून शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुकुंद यांच्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील ममदापूर, वरखेड, मारडा या गावातील अनेक शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीचं सोयाबीन पेरलं असून ते उगवलं नसल्याची त्यांची तक्रार आहे.

अकोला जिल्ह्यातील दिनेश शिंदे यांनीही बारा एकरात महाबीज सोयाबीणची पेरणी केली. 13 तारखेला त्यांनी शेतात पेरणी केली. त्यांच्याही शेतात पेरलेलं उगवलंच नाही.

त्यांच्यावर आता दुबार पेरणीचं संकट आहे. सोयाबीनला अंकुरच फुटले नसल्याने त्यांनी आपलं संपूर्ण सोयाबीन पीक ट्रॅक्‍टरच्या साह्याने मोडून टाकलं. शिंदे यांच्याकडे आता दुबार पेरणीसाठी पैसेही नाहीत.

अमरावती विभागात महाबीज कंपनीचं बियाणं उगवलं नसल्याच्या 900 तक्रारी प्राप्त झाल्याचं कृषी विभाग सांगत आहे.

एकीकडे विदर्भात ही परिस्थिती आहे, तर मराठवाड्यातही सोयाबीनच्या बोगस बियाण्यांच्या तक्रारी शेतकरी करत आहेत.

परभणी जिल्ह्यातल्या आरवी गावातले सिद्धेश्वर कदम सांगतात, “15 जूनला 15 एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली. पण, अद्याप सोयाबीन उगवलं नाही. कृषी विभागाचे अधिकारी पंचनामा करून गेले पण अद्याप मदतीविषयी काहीच पावलं उचललेली नाहीत.”

गावात सगळीकडेच ही परिस्थिती असल्याचं कदम यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, सदोष बियाणं तक्रारीची तातडीनं तपासणी करावी. त्यासाठी सोयाबीन शास्त्रज्ञ आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी कृषी विभागाला दिले आहेत.

महाबीजचं बियाणं त्वरित शेतकऱ्यांना बदलून द्यावं, अशाही सूचना भुसे यांनी दिल्या आहेत.

One thought on “onion export latest news 2021 – कांदा निर्यात बंदी उठविताच भावात सुधारणा

  1. कांद्याचे भाव वाढले पाहिजेत कारण या वर्षी पावसामुळे आणि वातावरणातील बद्दल यामुळे खूप कमी उत्पादन निगत आहे आणि खर्च अवाच्या सवा झाला आहे आणि आज भाव कमी झाला तर आमच्या सारख्या शेतकऱ्याला कोण वाली नाही शेतकऱ्यांची पण विचार करा ओ आम्ही पण रात्रंदिवस कष्ट करतो ………..
    एक तरुण शेतकरी
    अमोल जरग (९१३०३२०९९९)

Leave a Reply

Your email address will not be published.

x