Pm kisan samman Nidhi Yojana 2021

 

Pm kisan samman Nidhi Yojana 2021

  1. पी एम किसान सन्मान निधी केंद्र सरकारने चालू केली तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नियमित दोन हजार रुपये येत आहेत. तरी काही बनावट शेतकऱ्यांचे आता ते पैसे बंद होणार.

सविस्तर वाचा

बनावट शेतकऱ्यांनी सावधान व्हावे कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान सम्माननिधि योजना देशभरामध्ये राबवली जात आहे. तरी या योजनेच्या माध्यमातून बनावट शेतकरी लाभ घेत असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. तरी बनावट शेतकऱ्यांनी सावधान व्हावे. पी एम किसान सन्मान निधी चा फायदा घेण्यासाठी शेतकरी बनावट असल्याचे वा खोटं सांगत प्रधानमंत्री किसान सम्मान निधि pm kisan samman Nidhi योजना या योजनेचा लाभ घेणारे बनावट शेतकरी आता अडचणीत येणार आहेत.

बनावट शेतकऱ्यांचे अडचणींमध्ये वाढ.

पी एम किसान सम्माननिधि या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी असल्याचे खोटे सांगत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पूर्णपणे फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खोटे सांगून फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आता अडचण होणार आहे. आता या योजनेतील लाभार्थ्यांची तपासणी सरकारच्या माध्यमातून गावागावांमध्ये जाऊन चौकशी केली जाणार आहे. कारण ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजना साठी खोटी माहिती देऊन या योजनेअंतर्गत शेतीसाठीची वार्षिक सहा हजाराची मदत घेतली असेल किंवा घेण्याचा प्रयत्न केला असेल अशा बनावट शेतकऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यांची मदत बंद केली जाणार आहे. व ज्या शेतकऱ्यांनी आज पर्यंत पी एम किसान सन्मान pm kisan निधी चा आर्थिक फायदा घेतलेला असेल अशा शेतकऱ्यांना पैशांची भरपाई करून द्यावी लागणार आहे या योजनेच्या माध्यमातून 5 टक्के लाभार्थ्यांची प्रत्यक्ष त्यांच्या गावी म्हणजेच त्यांच्या ठिकाणी जाऊन तपासणी करण्याचे आदेश व तरतूद केली आहे. या योजनेची सरकारने आता अंमलबजावणी सुद्धा सुरू केली आहे.

(Verification pm kisan samman Nidhi scheme in India)

या योजनेच्या बनावट शेतकऱ्यांची चौकशीसाठी सर्वप्रथम देशामध्ये उत्तर प्रदेश मधील गोरखपूर जिल्ह्यात या तपासणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्याचे जिल्हा अधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातील अधिकारी गावागावात जाऊन या लाभार्थ्यांची पी एम किसान सन्मान निधी च्या यादी ची पाहणी करून सत्यता तपासणी करून तसेच प्रत्येक जिल्ह्यामधील पाच टक्के लाभार्थ्यांची यादी तयार झाल्यानंतर या अनुसार संबंधित अधिकाऱ्यांनाही यादी देऊन शेतकऱ्यांचे यादीमधील नाव मोबाईल नंबर आणि आधार कार्ड Aadhar card ची सत्यता तपासून तसेच ते शेतकरी आहेत की नाही हेही तपासून ज्या शेतकऱ्यांची माहिती खोटी सापडेल त्या शेतकऱ्यांची पीएम किसान सन्मान निधी योजनेची मदत तातडीने बंद करण्यात येणार आहे.

किसान सन्मान निधी लाभार्थ्यांची तपासणी का?

केंद्र सरकारने पी एम किसान सम्माननिधि योजना शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहे. पण पी एम किसान सन्मान योजनेत अनेक खोठे लाभार्थी असल्याचे समोर आलेले आहे. आसाम तामिळनाडू बिहार उत्तर प्रदेश पंजाब गुजरात  असे देशातील अनेक राज्यांमध्ये 33 लाख लोकांनी खोटी माहिती देऊन पी एम किसान सन्मान निधी योजनेची मदत मिळवली आहे. त्यामुळे pm kisan samman Nidhi पी एम किसान योजनेच्या माध्यमातून बनावट शेतकऱ्यांकडे 23 26 कोटी रुपये बनावट लाभार्थी कडे गेल्याचे लक्षात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक 377 कोटी रुपये आसाम मध्ये बनावट शेतकरी बनुन या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात ही रक्कम गेली आहे. तसेच विविध राज्यांमध्ये बनावट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम सुद्धा गेली आहे. उत्तर प्रदेश मधील आकडा पाहता. 1,78,398 या शेतकऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतलेला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

x