Pomegranate Farming in maharashtra 2020
डाळींबाची(Pomegranate Farming) लागवड फार प्राचीन काळापासून म्हणजे इ.स. पुर्व 3500 वर्षापूर्वी झाल्याचा उल्लेख आढळून येतो. डाळींबाचे(Pomegranate Farming) उगमस्थान इराण असून इ.स.2000 वर्षापासून डाळींबाची लागवड केली जात होती असे आढळते. इराण प्रमाणेच स्पेन, इजिप्त, अफगाणिस्थान, मोराक्को, बलूचीस्थान, पाकीस्तान, इराक, ब्रम्हदेश, चीन, जपान, अमेरिका, रशिया, भारत या देशामध्ये लागवड केली जाते.
Kangaroo Information in Marathi कांगारू
रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड सुरु होण्यापूर्वी सन 1989-90 मध्ये डाळिंब पिकाखाली 7700 हेक्टर क्षेत्र होते. डाळिंब पिकांची लागवड अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, वाशिम या जिल्हयात प्रामुख्याने होत असून इतर जिल्हयातही मोठया प्रमाणावर लागवड होत आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये डाळिंब पिकाखाली 73027 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी सुमारे 41000 हेक्टर क्षेत्र उत्पादनाखाली आहे. त्यापासून 410000 मेट्रीक टन इतके उत्पादन व 328 कोटी रुपये उत्पन्न मिळते
डाळींबाच्या(Pomegranate Farming) रसात 10 ते 16 टक्के साखरेचे प्रमाण असते. ही साखर पचनास हलकी असते. क़ुष्टरोगावर डाळींबाचा(Pomegranate Farming) रस गुणकारी आहे. त्याचप्रमाणे फळांची साल अमांश व अतिसार या रोगांवर गुणकारी आहे.
कापड रंगविण्यासाठीसुध्दा फळांच्या सालीचा उपयोग केला जातो. अवर्षण प्रवण भागामध्ये हलक्या जमिनीत व कमी पावसावर तग धरणारे हे झाड आहे. त्यामुळे या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ होत आहे.
हवामान
डाळींबाचे(Pomegranate Farming) पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्त आहे. उन्हाळयातील कडक ऊन आणि कोरडी हवा तसेच हिवाळयातील कडक थंडी डाळिंबाच्या(Pomegranate Farming) वाढीस योग्य असते. अशा हवामानात चांगल्या प्रतीची फळे तयार होतात परंतु अशा प्रकारच्या हवामानात जरी थोडा फार फरक झाला तरी सुध्दा डाळिंबाचे उत्पन्न चांगले येते. फुले लागल्यापासून फळे होईपर्यंतच्या काळात भरपूर उन व कोरडे हवामान असल्यास चांगल्या प्रकारची गोड फळे तयार होतात. कमी पावसाच्या प्रदेशात जेथे थोडीफार ओलीताची सोय आहे तेथे डाळींबाच्या(Pomegranate Farming) लागवडीस भरपूर वाव आहे.
डाळिंबाचे पीक सर्वसाधारण कोरड्या व समशीतोष्ण हवामानात चांगल्या प्रकारे येते. डाळिंबाच्या(Pomegranate Farming) झाडाच्या चांगल्या वाढीसाठी व उत्पादनक्षमतेसाठी तसेच चांगल्या प्रतीची फळे मिळवण्यासाठी वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कमी असणे आवश्यक आहे. दमट हवामानात फळावर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. फळांच्या पूर्ण वाढीनंतर आर्द्रता वाढल्यास फळास वरून व आतून चांगला रंग येतो
जमीन कशी असावी :-
डाळिंबाचे पिक कोणत्याही जमिनीत घेण्यात येते. अगदी निकस, निकृष्ठ जमिनीपासून भारी, मध्यम काळी व सुपीक जमिन डाळींबाच्या(Pomegranate Farming) लागवडीसाठी चांगली असते, मात्र पाण्याचा चांगला निचरा होणारी गाळाची किंवा पोयटयाची जमिन निवडल्यास उत्पन्न चांगले मिळते.
त्याचप्रमाणे हलक्या, मुरमाड माळरान किंवा डोंगर उताराच्या जमिनीसुध्दा या पिकाला चालतात. मात्र जमिनीत पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे. चुनखडी आणि थोडया विम्लतायुक्त (अल्कलाईन) जमिनीतही डाळिंबाचे पीक येऊ शकते.
नक्की वाचा – Sugarcane Farming – असे काढा उसाचे पीक आणि मिळावा लाखोंचे उत्पन्न 2021
.
जमीन आणखी कशी असायला पाहिजे ते आपण आणखी बघूया: डाळिंबास हलकी ते मध्यम जमीन चालते. डोंगरउताराची, माळरानाची जमीनही या फळपिकास चालते. नदीकाठची, गाळाची व चांगला निचरा होणारी जमीन या पिकास अगदी उपयुक्त होते. 0.5 मीटर खोलीची व त्याखाली मुरमाड जमीन असली तरी झाडे चांगली वाढू शकतात.
भारी व काळ्या जमिनीतही फळझाडांची वाढ चांगली होते. परंतु अशा जमिनीतून पाण्याचा उत्तम निचरा होणे अत्यावश्यक बाब आहे, अन्यथा फळांना चांगला रंग येत नाही. डाळिंबाचे झाड थोड्या खारवट जमिनीतही (सामू 8-5) येऊ शकते, पण क्षाराचे प्रमाण जास्त असल्यास झाडाची योग्य प्रमाणात वाढ होत नाही.
डाळिंबाच्या(Pomegranate Farming) साठी अन्नघटक कसे असायला हवे :-
डाळिंब फळात दाण्याचे प्रमाण 68 टक्के असून दाण्यात खालील प्रमाणे निरनिराळे अन्नघटक असतात.
अन्न घटक प्रमाण :-
1) पाणी78.2 टक्के
2) प्रथिने1.6 टक्के
3) स्न्ग्धि पदार्थ0.1 टक्के
4) तंतुमय पदार्थ5.1 टक्के
5) पिष्टमय पदार्थ14.5 टक्के
6) खनिजे0.7 टक्के
7) कॅल्शियम10 मि.ली.ग्रॅम / 100 ग्रॅम
8) मॅग्नेशियम12 मि.ली.ग्रॅम / 100 ग्रॅम
9) ऑक्झॉलिक अॅसिड14 मि.ली.ग्रॅम / 100 ग्रॅम
10) स्फूरद70 मि.ली.ग्रॅम / 100 ग्रॅम
11) लोह0.3 मि.ली.ग्रॅम / 100 ग्रॅम
12) व्हिटॅमीन ए0.06 मि.ली.ग्रॅम / 100 ग्रॅम
13) रिबोल्फेविन बी-20.1 मि.ली.ग्रॅम / 100 ग्रॅम
14) निकोटीनीक ऍसीड0.3 मि.ली.ग्रॅम / 100 ग्रॅम
15) क जिवनसत्व14 मि.ली.ग्रॅम / 100 ग्रॅम
फळे, खोड व मुळे यांच्या सालीत टॅनिंनचे प्रमाण भरपूर असते. त्याचा उपयोग कपडे रंगविण्यासाठी करतात.
डाळींबाच्या(Pomegranate Farming) जाती
आपण आता या फळांच्या जाती बघणार आहोत:—-
गणेश
सध्या लागवडीखाली असलेले बहुतांश क्षेत्र हे या वाणाखाली असून हा वाण गणेशखिंड, फळसंशोधन केंद्र, पुणे या ठिकाणी डॉ. जी.एस.चीमा यांच्या प्रयत्नाने शोधून काढण्यात आलेला आहे. या वाणाचे वैशिष्टय असे की, बिया मऊ असून दाण्याचा रंग फिक्कट गुलाबी असतो फळात साखरेचे प्रमाणही चांगले आहे. व या वाणापासून उत्पादन चांगले मिळते.
मस्कत – या जातीच्या फळाचा आकार मोठा असतो. फळांची साल फिक्कट हिरवी ते लाल रंगाची असून दाण पांढरट ते फिक्कट गुलाबी असतात. शेतक-यांनी रोपापासून बागा लावल्यामुळे झाडांच्या वाढीत व फळांच्या गुणधर्मात विविधता ाढळते. चवीस हा वाण चांगला असून उत्पादनही भरपूर येते.
मृदुला, जी १३७, फुले आरक्ता, भगवा
लागवड
डाळिंब लागवडिकरिता निवडलेली जमिन उन्हाळयामध्ये 2 ते 3 वेळेस उभी आडवी नांगरटी करुन कुळवून सपाट करावी. भारी जमिनीत 5 × 5 मिटर अंतरावर लागवड करावी. त्यासाठी 60 × 60 × 60 सेमी आकाराचे खडडे घ्यावेत. प्रत्येक खडयाशी तळाशी वाळलेला पालापाचोळयाचा 15 ते 20 सेमी जाडीचा थर देऊन 20 ते 25 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत, 1 किलो सिंगल सुपरफॉस्फेट यांच्या मिश्रणाने जमिनी बरोबर भरुन घ्यावेत. सर्वसाधारणपणे पावसाळयात लागवड करावी. डाळिंबाची (Pomegranate Farming)तयार केलेली कलमे प्रत्येक खडयात एक याप्रमाणे लागवड करावी. कलमाच्या आधारासाठी शेजारी काठी पुरुन आधार द्यावा. कलम लावल्यानंतर त्याच बेताचे पाणी द्यावे. लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. 5×5 मीटर अंतराने प्रती हेक्टरी 400 झाडे लावावीत.
खते
डाळींबाच्या(Pomegranate Farming) प्रत्येक झाडास खालील प्रमाणे रासायनीक खते द्यावीत
वर्षनत्रस्फूरदपालाश1125 ग्रॅम125 ग्रॅम125 ग्रॅम2250 ग्रॅम250 ग्रॅम250 ग्रॅम3500 ग्रॅम250 ग्रॅम250 ग्रॅम4500 ग्रॅम250 ग्रॅम250 ग्रॅम
त्या शिवाय 5 वर्षानंतर झाडाच्या वाढीनुसार प्रत्येक झाडास 10 ते 50 किलो शेणखत आणि 600 ग्रॅम नत्र 250 ग्रॅम स्फूरद व 250 ग्रॅम पालाश दरवर्षी द्यावे.
पाणी
डाळींब(Pomegranate Farming) पिकास फुले येण्यास सुरुवात झााल्यानंतर फळे उतरुन घेईपर्यंतच्या काळात नियमित व पुरेसे पाणी देणे महत्वाचे आहे. पाणी देण्यात अनियमितपणा झाल्यास फुलांची गळ होण्याची शक्यता असते. फळांची वाढ होत असतांना पाण्याचा ताण पडून नंतर एकदम भरपूर पाणी दिल्यास फळांना तडे पडतात व प्रसंगी अशी न पिकलेली फळे गळतात. पावसाळयात पाऊस न पडल्यास जरुरीप्रमाणे पाणी द्यावे व पुढे फळे निघेपर्यंत 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी. फळाची तोडणी संपल्यानंतर बागांचे पाणी तोडावे.
बहार धरणे
डाळींबाच्या(Pomegranate Farming) झाडास तीन बहार येतात. आंबिया बहार. मृग बहार, हस्तबहार यापैकी कोणत्याही एका बहाराची फळे घेणे फायदेशिर असते. आंबियाबहार धरणे अधिक चांगले कारण फळांची वाढ होताना व फळे तयार होताना हवा उष्ण व कोरडी राहते. त्यामुळे फळास गोडी येते. फळांवर किडीचा व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. पाण्याची कमतरता असल्यास मृगबहार धरावा.
डाळींबास(Pomegranate Farming) बहार येण्याचा व फळे तयार होण्याचा काळ खालील प्रमाणे आहे.
अ.क्रं.बहारबहार येण्याचा काळफळे तयार होण्याचा काळ1आंबिया बहारजानेवारी फेब्रूवारीजून ऑगस्ट2मृग बहारजून – जूलैनोव्हेबर – जानेवारी3हस्तबहारसप्टेबर आक्टोबरफेब्रूवारी – एप्रिल
बहार धरतांना पाणी देण्यापूर्वी एक महिना अगोदर बाग नांगरुन घ्यावी किंवा खणून घ्यावी. त्यानंतर झाडांची आळी खणावित व मुळया उघडया करुन जारवा छाटावा झाडावर मर किंवा बांडगुळे असल्यास काढून टाकावीत.
फळांची तोडणी
डाळींबाचे(Pomegranate Farming) फळ तयार होण्यास फूले लागण्यापासून साधारणतः 6 महिने लागतात. आंबिया बहाराची फळे जून ते ऑगस्ट मध्ये मृगबहाराची फळे नोव्हेबर ते जानेवारीमध्ये आणि हस्तबहाराची फळे फेब्रूवारी ते एप्रिल मध्ये तयार होतात. फळांची साल पिवळसर करडया रंगाची झाली म्हणजे फळ तयार झाले असे समजावे व फळाची तोडणी करावी.
डाळिंब या पिकावर फळे पोखरणारी आळी (सुरसा) साल पोखरणारी आळी, लाल कोळी, देवी किंवा खवले किड या किडीचा व फळावरील ठिपके फळकुज (फ्रूट रॉट) या रोगाचा प्रादुर्भाव कमी / अधिक प्रमाणात आढळून येत आहे. सध्या डाळिंब बागायतदारासाठी हा एक चिंतेचा विषय बनलेला आहे. राज्यात सांगोला, पंढरपूर, बारामती, जत, सटाणा, मालेगांव, देवळा या तालुक्यात या रोगाचे प्रमाण अधिक आहे. या बाबत कृषी विद्यापीठ स्तरावरुन शास्त्रज्ञांनी पाहाणी केली असून त्या बाबतची माहिती खालील प्रमाणे आहे.
डाळींबावरील आरोह (मर) रोगाची लक्षणे
या रोगाची पिकांच्या मुळावर वाढणारे हानीकारक फयूजेरीयम व रायजोक्टोनिया बुरशी आणि गाठी करणा-या सूत्रकृमी अशी दोन महत्वाची कारणे आहेत. मध्यम ते भारी जमिनीत लावलेल्या डाळींबाच्या(Pomegranate Farming) बागेस वरचेवर पाणी दिल्यास किंवा ठिबक सिंचनाव्दारे सतत मुळांचा परिसर ओलसर राहिल्यामुळे तेथे सूत्रकृमीचा उपद्रव होतो. सुत्रकृमी अतिसूक्ष्म जीव असून त्याची नर आणि पिल्ले सापासारखी लांबट तर मादी गोलाकार अशी असते. या सूत्रकृमी फळांच्या मुळावर असंख्य जखमा करतात.
मुळातूनच अन्न मिळवितात. या जखमा असलेल्या पेशी मोठया होवून त्या गाठीच्या रुपात दिसतात. झाडांची मुळे तपकिरी रंगाची होतात. याचा झाडांच्या अन्नग्रहन क्षमतेवर विपरीत परिणाम होवून वाढ खुंटते. सूत्रकृमीने केलेल्या जखमातून फयूजोरियम सारख्या मुळ कुजवणारी बुरशी मुळात शिरुन वाढीस लागते. ही बुरशी हळू हळू मुळाची साल आणि मुळे कुजवते. त्यामुळे झाडांना पुरेसा अन्नपूरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो.
सुरुवातीस डाळींबाचे(Pomegranate Farming) झाड निस्तेज दिसते. झाडांची पाने पिवळी पडतात, फळांची गळती होते, काही फांदया पूर्णपणे वाळतात. आणि काही दिवसांनी संपूर्ण झाड वाळते.
मर रोग होण्याची कारणे
पाण्याचा समाधान कारक निचरा न होणा-या भारी जमिनीत डाळींबाची(Pomegranate Farming) लागवड करणे.
चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करणे.
दोन झाडातील अंतर कमी ठेवणे म्हणजे 5 × 5 मीटर पेक्षा अंतर कमी ठेवणे.
शिफारशी पेक्षा जास्त पाणी देणे.
फयूजेरियम बुरशिचा प्रादुर्भाव होणे.
सूत्रकृमी आणि खोडास लहान छिद्र पाडृणारे भूंगेरे यांचा प्रादूर्भाव होणे.
आंतरमशागतीचा अभाव
रोगग्रस्त कलमांची लागवड
जमिनीच्या उताराच्या म्हणजे खोलगट भागात लागवड करणे इत्यादी.
हा रोग होऊ नये म्हणून खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना पडणे अत्यंत आवश्यक आहे.
अ) प्रतिबंधात्मक उपाय
डाळींब(Pomegranate Farming) लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणा-या जमिनीची निवड करावी.
भारी व चोपण जमिनीत डाळींबाची(Pomegranate Farming) लागवड करु नये.
शिफारशीप्रमाणे 5 × 5 मीटर अंतरावरच लागवड करावी.
शिफारशीप्रमाणे पाणी व्यवस्थापन करावे.
लागवडीसाठी रोग व सूत्रकृमीमुक्त कलमांची निवड करावी.
लागवड करताना लागवडीच्या अगोदर कलमांच्या पिशव्या मातीसह एक टक्का बोर्डो मिश्रणात बुडवून नंतर लागवड करावी.
लागवडीच्या वेळी निंबोळी पेंड, शेणखत, कॉपर आक्झीक्लोराईड आणि ट्रायकोडर्माचा शिफारशीप्रमाणे वापर करावा.
फयूजेरियम, सूत्रकृमी, खोडास लहान छिद्रे पाडणारे भूंगेरे आणि खोड किडा यांचे वेळीच नियंत्रण करावे
मर झालेली झाडे त्वरीत काढून टाकावीत.
आ) निवारणात्मक उपाय
या रोगाचा प्रादूर्भाव आढळून आल्यास त्यावर करावयाची निवारात्मक उपाययोजना
दोन टक्के बोर्डोमिश्रण किंवा एक टक्का कॉपर आक्सीक्लोराईडचे द्रावण पाच लिटर प्रति झाड प्रमाणे दयावे. त्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी 2.5 किलो ट्रायकोडर्मा 100 किलो शेणखत यांचे मिश्रण करुन खोडाजवळ जमिनीत मिसळून प्रतिहेक्टरी दयावेत.
मर रोग झालेल्या झाडाच्या आजूबाजूच्या दोन ओळीतील झाडांना ट्रायकोडर्माचे प्रमाण पाच पटीने वाढवावे. तसेच बोर्डो मिश्रण किंवा एक टक्का कॉपर ऑक्सीक्लोराईडचे द्रावण 10 लिटर प्रति झाड या प्रमाणात द्यावे.
दर महिन्याला दोन किलो शेणखत प्रति झाड जमिनीमध्ये खोडाजवळ मिसळून दयावे.
सूत्रकृमी असलेल्या भागामध्ये बहार घेताना निंबोळी पेंड दोन टन प्रति हेक्टरी आणि नंतर तीन महिन्याने चाळीस किलो दहा टक्के दाणेदार फोरेट जमिनीत मिसळून दयावे.
खोडास लहान छिद्र पाडणारे भूंगेरे यांच्या नियंत्रणासाठी खोडावर चारशे ग्रॅम गेरु अ 2.5 मिलि लिंडेन किंवा 5 मिलि क्लोरोपायरीफॉस अ 2.5 ग्रम् ब्लायटॉक्स एक लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणाचा खोडास मुलामा दयावा. त्याच प्रमाणे मुळावर लिंडेन ( 2.5 मिलि ) किंवा / क्लेारोप्लायरोफॉस (5 मिलि ) ब्लायटॉक्स 2.5 ग्रॅम घेवून प्रतिझाड पाच लिटर द्रावण खोडाच्या शेजारी मुळांना पोहोचेल असे दयावे.
खोड किड नियंत्रणासाठी फेनव्हेलरेट 5 मिलि प्रति लिटर पाण्यात किंवा डायक्लोरोफॉस 10 मिलि प्रतिलिटर पाण्याचे इंजेक्शन पिचकारीच्या साहायाने छिद्रात सोडावे आणि छिद्र चिखलाने बंद करावे.
ठिबक सिंचन पध्दतीने पाणी दयावयाचे झाल्यास शिफारशीप्रमाणे म्हणजेच जूलै ते फेब्रूवारी महिन्यात 15 ते 25 लिटर पाणी प्रतिझाड प्रतिलिटर दयावे आणि मार्च ते जून पर्यंत उष्णतामानाचा विचार करुन 25 ते 50 लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिवशी दयावे.
डाळींब (Pomegranate Farming)’मर’ रोगाबाबतचे संशोधन महात्माफूले कृषि विद्यापीठ, राहूरी यांचे मार्फत सूरु आहे. त्याचप्रमाणे डाळींब(Pomegranate Farming) पिकाबाबत राष्ट्रीय पातळीवरील संशोधन केंद्र मंजूर होणे बाबत केंद्रसरकारला प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.
डाळिंब
जमीनहलकी ते मध्यम (45 सेमी खोली असलेली हलकी जमीन)जातीगणेश, जी -137, मृदूला, फूले आरक्ता, भगवालागवडीचे अंतर4.5 x 3.0 मिटरखतेपूर्ण वाढलेल्या झाडास 40 ते 50 किलो, नत्र 625 ग्रॅम, स्फूरद 250 ग्रॅम व पालाश 250 ग्रॅम प्रतिझाडास प्रतिवर्ष. नत्र दोन समान हप्त्यात विभागून दयावेत.आंतरपिकेझाडाच्या लागवडीनंतर सुरुवातीची दोन वर्षे बागेत दोन ओळींमध्ये कांदा, काकडी, मुग, चवळी, सोयाबिन यासारखी कमी उंच वाढणारी पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत.
इतर महत्वाचे मुददे
रोपांची खरेदी खात्रीशीर शासनमान्य रोपवाटीकेतून करावी.
अधिक आर्थिक फायदयासाठी 4.5 x 3.0 मिटर अंतरावर लागवड केलेल्या डाळींबामध्ये(Pomegranate Farming) ठिबक सिंचनाने झाडाजवळचे 20 टक्के क्षेत्र असावे
हवामान :
डाळिंबाचे(Pomegranate Farming) पीक सर्वसाधारण कोरड्या व समशीतोष्ण हवामानात चांगल्या प्रकारे येते. डाळिंबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी व उत्पादनक्षमतेसाठी तसेच चांगल्या प्रतीची फळे मिळवण्यासाठी वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कमी असणे आवश्यक आहे. दमट हवामानात फळावर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. फळांच्या पूर्ण वाढीनंतर आर्द्रता वाढल्यास फळास वरून व आतून चांगला रंग येतो.
लागवड :
डाळिंबाची(Pomegranate Farming) लागवड गुटी कलमाने तयार केलेल्या रोपांपासून करतात. रोपे निवडताना ती खात्रीशीर रोपवाटिकेतून, रोगविरहित व जोमदार असावीत. प्रत्येक खड्ड्याच्या मधोमध एक रोप लावून बाजूने माती घट्ट दाबून पाणी द्यावे. बांबू किंवा काठी रोवून कलमांना आधार द्यावा. नंतर जमिनीलगत येणारी फूट काढून जमिनीपासून 15-20 सेंमी. उंचीवर 4 ते 5 चांगल्या फांद्या राखाव्यात. लागवडीपासून एक ते दीड वर्षात झाडाची चांगली डेरेदार वाढ होऊन फुले धरायला लागतात. झाडाची चांगली वाढ झालेली असल्यास झाडाच्या कुवतीप्रमाणे थोडी (8 ते 12) फळे ठेवण्यास हरकत नाही. पण झाड कमकुवत असल्यास फुले तोडून टाकून झाडाच्या वाढीला मदत करावी.
बागेचे आरोग्य व्यवस्थापन :
झाडांना आकार देणे : उत्तम बाग बनवण्याकरता झाडांना योग्य आकार अथवा वळण देणे महत्त्वाचे आहे. डाळिंब झाडाची वाढ फक्त एक खोड ठेवून करणे. या अनेक खोडांवर करणार्या दोन्ही पद्धती फायदेशीर नाहीत. झाडास एकच खोड ठेवले असता जमिनीतून अनेक फुटवे निघत राहतात. तसेच खोडास रोग वा किडींचा प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण झाडाचा नायनाट होऊन आर्थिक नुकसान होते. त्याचप्रमाणे अनेक खोडे ठेवल्यास त्यावरील फांद्या एकमेकींत मिसळतात. झाड दाटते व आडवी वाढ मोठ्या प्रमाणात होऊन आंतरमशागतीस अडचणीचे होते. या कारणास्तव साधारणत: 3 खोडे ठेवून डाळिंबाचे झाड वाढल्यास योग्य आकार मिळतो व उत्पादन वाढते.
झाडांची छाटणी :
जमिनीलगतचे फुटवे, फोक, आडव्या वाढणार्या फांद्या, मेलेल्या- वाळलेल्या- कीडग्रस्त, रोगग्रस्त फांद्या आणि डहाळ्या यांची छाटणी वेळोवेळी करावी. जमिनीपासून दोन फुटांपर्यंत येणार्या सर्व फांद्या छाटून टाकाव्यात. फुटवे दिसताक्षणीच काढून टाकावेत, अन्यथा झाडांमध्ये फळे लागण्याचे प्रमाण कमी होते. 3-4 वर्षे वय असलेल्या झाडाच्या फांद्यावर येणार्या फुटीवर फळे तयार होतात. त्यामुळे अशा फांद्यांची छाटणी करू नये, अन्यथा उत्पन्नात घट येते. जुन्या झालेल्या फांद्यांची थोड्याफार प्रमाणात विरळणी वा छाटणी केल्याने नवीन फूट येण्यास मदत होते. डाळिंबामध्ये द्राक्षाप्रमाणे मोठ्या प्रमाणात छाटणीची गरज नसते; परंतु प्रमाणशीर छाटणीमुळे निश्चितच फळांची गुणवत्ता आणि उत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो.
छाटणीमुळे झाडे वाकण्याचे किंवा फांद्या मोडण्याचे प्रमाणसुद्धा कमी होते. झाडांची फार जास्त प्रमाणात छाटणी केल्यास झाड उघडे पडून फळे सूर्यकिरणांच्या प्रभावामुळे खराब होतात. झाडे ताणावर सोडली असताना करावयाच्या छाटणीत 1 वर्षे जुनी वाढ छाटावी, जेणेकरून फळधारणा होईल. जुन्या झालेल्या फांद्यांची छाटणी करावी. छाटणीमुळे फळांच्या संख्येत व गुणवत्तेत वाढ होते. रोगाचा एका झाडावरून दुसर्या झाडावर होणारा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक झाड छाटणी करण्यापूर्वी सिकेटर हे छाटणी अवजार डेटॉल (1.0 टक्के) किंवा सोडियम हायपोक्लोराइडच्या (1 टक्के) द्रावणाने निर्जंतुक करून घ्यावे.
1) उत्कृष्ट बाग बनवण्याकरता सुरुवातीपासून झाडांची योग्य निगा व काळजी करणे गरजेचे आहे.
बाग लागवडीकरता हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीची निवड करावी.
रोगमुक्त रोपांचा लागवडीकरिता वापर करावा.
रोपे लावण्याआधी जमिनीत 1 मी. खोलीचे खड्डे खोदावेत. खड्डे परत भरताना विहित मात्रांमध्ये रासायनिक खते व कुजलेली सेंद्रिय खते चांगल्या प्रकारे मिसळावीत. सोबत कॅल्शियम हायपोक्लोराइड 100 ग्रॅम प्रति खड्डा या प्रमाणात वापरावे.
बागेत ओळीमध्ये 4.5 मी. एवढे तर झाडांमधील अंतर जमिनीच्या मगुदरानुसार 3 ते 4 मी. एवढे ठेवावे.
रोपे रोपवाटिकेतून मुख्य बागेत लावण्यापूर्वी कॉपर ऑक्झिक्लोराइड (0.25 टक्के) व स्ट्रेप्टोसायक्लीन (250 पी. पी.एम.) यांच्या संयुक्त मिश्रणाने फवारावीत.
रोपे लागवडनंतर एक महिन्याचे बागा रोग असणार्या भागात असल्यास कॉपर ऑक्झिक्लोराईड (0.25 टक्के) व स्ट्रेप्टोसायक्लीन (250 पी.पी.एम.) यांच्या संयुक्तिक मिश्रणाने फवारावीत. अन्यथा फक्त कॉपर ऑक्सिक्लोराइडची फवारणी करावी.
बाग नीटनेटकी व स्वच्छ ठेवण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी.
2) मुख्य बागेचे व्यवस्थापन
झाडांची पानगळ करण्यासाठी 2-2.5 मि.ली. इथिलीन प्रति लि. पाणी असा वापर करावा.
छाटणी होताक्षणीच बोर्डो मिश्रण (1 टक्का)ची पहिली फवारणी करावी.
नवती फुटण्याच्या कालावधीत स्ट्रेप्टोसायक्लीन (250 पी.पी.एम.)+ कॉपर ऑक्सिक्लोराइड (0.25 टक्के) ची संयुक्तिक दुसरी फवारणी द्यावी. बोर्डो मिश्रण सोडून इतर बुरशीनाशकांमध्ये विशेषत: पावसाळ्यात स्टीकरचा वापर करावा. 15 दिवसांच्या अंतराने बोर्डो मिश्रणाची (0.4 टक्के) तिसरी फवारणी करावी.
चौथी फवारणी स्टे्रेप्टोसायक्लीन (500 पी.पी.एम.)+ कार्बेन्डेझिम (0.10)ची करावी.
रोगाच्या वाढीस पोषक असे ढगाळ व पावसाळी वातावरण असताना स्ट्रेप्टोसायक्लीन 500 पी.पी.एम. एवढ्या तीव्रतेचे वापरावे. दोन फवारणींमधील कालावधी पण 8 ते 10 दिवस एवढा कमी ठेवावा.
स्कॅब (खवले) स्पॅसेलोन स्पेसीज)चा प्रादुर्भाव मर रोगास सहायक ठरतो. त्याच्या नियंत्रणाकरता झाडाच्या मुख्य खोडांवर दुसर्या वर्षापासून लाल माती/ काव (4 किलो)+ क्लोरोपायरीफॉस (20 मिली) + कॉपर ऑक्सिक्लोराइड (25 ग्रॅम) 10 लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
झाडांना न चुकता 3 ते 4 महिने विश्रांती देणे आवश्यक आहे, जेणेकरून अन्नद्रव्यांचा पुरेसा संचय होण्यास व झीज भरून येण्यास मदत होते. या कालावधीत बोर्डो मिश्रणाची (0.1 टक्का)ची एका महिन्याच्या अंतराने व स्ट्रेप्टोसायक्लीनची (500 पीपीएम) एक फवारणी करावी.
आंतरपिके :
नवीन लागवडीस सुरुवातीला दीड ते दोन वर्षांपर्यंत कांदा, लसूण, कोबी, फ्लॉवर, काकडी किंवा भुईमूग व हरभरा ही फार उंच न वाढणारी पिके घेणे फायदेशीर ठरेल. आंतरपिके घेताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की त्यांचा डाळिंबाच्या(Pomegranate Farming) वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ नये.
खत व्यवस्थापन : डाळिंबाच्या(Pomegranate Farming) झाडास तक्ता क्र. 1 प्रमाणे खते द्यावीत.
तक्ता क्र. 1 डाळिंबाच्या झाडास द्यावयाच्या खताचा तपशील.
झाडाचे वय (वर्षे) शेणखत प्रत्येक झाडास (ग्रॅममध्ये)
नत्र स्फुरद पालाश
1 10 250 125 125
2 20 250 125 125
3 30 500 125 125
4 40 500 125 125
5 वर्षे व त्यानंतर 50 625 250 250
ठिबकाद्वारे विद्राव्य खतांचा वापर (बहार धरल्यानंतर)
कालावधी (दिवस) ग्रेड मात्रा / एकर (294 झाडांसाठी)
1-15 12:61:0 1 किलो- एक दिवसाआड
16-30 13:40;13 1 किलो- एक दिवसाआड
31-60 19:19:19+युरिया प्रत्येकी 1 किलो- एक दिवसाआड
61-90 0:52:34+कॅल्शियम नायट्रेट प्रत्येकी 1किलो- एक दिवसाआड
91-120 1.5 किलो- एक दिवसाआड 1 कि. दुसर्या दिवशी
121-150 0:0:50 कॅल्शियम नायट्रेट 1 कि.- दुसर्या दिवशी
(बिया काळ्या न पडण्यासाठी)
झिंक सल्फेट (0.25 टक्का), फेरस सल्फेट (0.25 टक्का) मॅग्नेशियम सल्फेट (0.25टक्का) व बोरिक अॅसिडची (0.2 टक्का) एकत्रित फवारणी फुले धरण्याच्या कालावधीत केल्याने फळांचे उत्पादन व गुणवत्ता सुधारते, तर फळे तडकण्याचे प्रमाण कमी होते.
बहार व्यवस्थापन :
डाळिंबाचे प्रामुख्याने तीन बहार पडतात. महाराष्ट्रातील समशीतोष्ण हवामानात डाळिंबाच्या (Pomegranate Farming)झाडाला जवळजवळ वर्षभर फुले येतात. ती तशीच येऊ दिल्यास झाडावर एकाच वेळी लहान-मोठी फुले व फळे राहतात. व्यापारीदृष्ट्या अशी फळे फायदेशीर ठरत नाहीत. त्यासाठी ठराविक हंगाम साधून बहार धरणे जरुरीचे आहे. आपल्या हवामानात मृग बहार (जून-जुलै), हस्त बहार (सप्टेंबर-ऑक्टोबर) आणि अंबिया बहार (जानेवारी-फेब्रुवारी) असे तीन प्रमुख बहार येतात.
1) मृग बहार :
मृग बहार धरण्यासाठी एप्रिल ते मेमध्ये बागेचे पाणी तोडावे लागते. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची सोय असल्यास हा बहार अत्यंत सोयीस्कर ठरतो. या बहाराची फळे नोव्हेंबर ते जानेवारी या काळात तयार होतात. फळांच्या वाढीच्या काळात ढगाळ वातावरण व पाऊस असल्यामुळे किडींचा त्रास वाढतो. तसेच फळांचा दर्जा पण चांगला नसतो. डाळिंबाची (Pomegranate Farming)आवक कमी असल्यामुळे दर चांगला मिळतो अशा शेतकर्यांचा अनुभव आहे.
2) हस्त बहार :
हस्त बहार साधणे बर्याच वेळेला अवघड जाते. झाडांना ताण देण्यासाठी ऑगस्टपासून सुरुवात करावी लागते. उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्यामुळे झाडाची वाढ चालूच राहते. व झाडाला विश्रांती मिळत नाही. त्यामुळे फुलेही कमी व मागे-पुढे येत राहतात. इच्छित फळांची संख्या मिळवणे जमत नाही. पुढे हिवाळा सुरू होतो. थंडीमुळे फळांची वाढ जोमदार वाढ व फळांचा दर्जा या दोन्ही गोष्टी कमी पडतात. मात्र, बेताचा पाऊस असलेल्या भागातील शेतकरी हा बहार घेऊन चांगले उत्पादन मिळवू शकतो.
3) आंबिया बहार :
जर उन्हाळ्यात पुरेसे पाणी उपलब्ध असेल किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग करून मोजक्या पाण्यावर हे पीक जोपासता येत असेल तर आंबे बहार घ्यायला हरकत नाही. फळांच्या वाढीच्या काळात (मार्च ते मे) हवा कोरडी व उष्ण असते, तर फळे पक्व होताना (जून ते ऑगस्ट) हवेत आर्द्रता व तापमान कमी असते. त्यामुळे फळास गोडी व आकर्षक रंग येतो आणि फळाचा दर्जा उत्कृष्ट राहतो. रोगाचे प्रमाण कमी असते.
मात्र, उन्हाळ्यात पाणीपुरवठा सतत व हमखास पाहिजे. आंबिया बहारासाठी नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यापासून बागेचे पाणी तोडावे. भारी जमिनीत 40 ते 60 दिवसांचा, तर हलक्या जमिनीत 30 ते 50 दिवसांचा ताण पुरेसा होतो. वरील तिन्ही बहारांकडे लक्ष देत असताना फळांची गुणवत्ता आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीनी आंबे बहार (आंबिया बहार) चांगला आढळून आला आहे.
लागवडीपासून साधारणत: बागेची उत्तम मशागत व निगा राखून झाडांची जोमदार वाढ झालेली असल्यास तिसर्या वर्षी डाळिंबाचा बहार धरता येतो. बहार धरण्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे एक ते दीड महिना पाणी तोडावे लागते. पाणी तोडल्यामुळे झाडांची जीवनप्रक्रिया मंदावते पाने पिवळी पडून गळून पडतात. फांद्यांत अन्नसंचय होतो व झाडांना विश्रांती मिळते. हलक्या, मुरमाड जमिनीत 3 ते 4 आठवड्यांत पानगळ सुरू होते, तर भारी जमिनीत अधिक काळ पाणी बंद ठेवावे लागते. दोन ओळींतील जमिनीची वखरणी करून झाडाभोवती चाळणी करून वाफे बांधून घ्यावेत.
पाणी व्यवस्थापन :
नवीन लागवडीस नियमित पाणीपुरवठा आवश्यक आहे. हलक्या मुरमाड जमिनीत 5 ते 6 दिवसांनी आणि भारी जमिनीत 8 ते 10 दिवसांनी पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या झाडांना बहार धरल्यानंतर पहिले पाणी हलके द्यावे. नेहमी झाडांच्या खोडांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. फुले येऊन फळधारणा होईपर्यंत बेताचे पाणी द्यावे. फळे पोसू लागल्यावर जमिनीच्या मगदुराप्रमारे तसेच हवामानाचा अंदाज घेऊन 6 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. या काळात पाणी पुरवठा अनियमित झाल्यास किंवा हवामानात अचानक बदल झाल्यास फुले व फळांची गळ होते व फळे तडकतात. डाळिंब सिंचन प्रयोगात एक दिवसाआड ठिबक पद्धतीने 30 टक्के क्षेत्र ओले ठेवल्यास सर्वांत जास्त फळांचे उत्पादन मिळते आणि पाण्याची सुमारे 20 टक्के बचत होते.
दर्जेदार फळांसाठी फुले व फळे विरळणी :
डाळिंबाच्या(Pomegranate Farming) झाडावर सतत फुले येत असल्यामुळे ही सर्व फुले राखल्यास झाडाच्या ताकदीपेक्षा फळांची संख्या वाढल्यामुळे ती नीट पोसली जात नाहीत. त्यामुळे फळांचा आकार व दर्जा राखला जात नाही. बाजारात मोठ्या व आकर्षक फळांना चांगला भाव मिळतो. साधारणपणे प्रत्येक झाडावर 70 ते 80 फळे चांगली पोसली जातात. फुले येऊन झाडावर 110 ते 130 गाठी धरल्यानंतर नवीन येणारी फुले तोडून टाकावीत. तसेच काही ठिकाणी झुपक्यांनी फळे येतात. त्यांपैकी चांगले एकच फळ राखून विरळणी करावी. डागाळलेली व आकाराने लहान आणि वेडीवाकडी फळे तोडून टाकावीत. फळांची संख्या झाडाच्या ताकदीप्रमाणे मर्यादित ठेवल्यास फळे चांगली पोसतात व त्यांचा दर्जा उत्तम राहतो.
आंतरमशागत :
बागेतील तण काढून हलकी मशागत करावी व झाडांच्या मुळाभोवती जमीन भुसभुशीत करून हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे झाडांची मुळे कार्यक्षम व निरोगी राहून अन्न व पाणी शोषून घेण्यास मदत होते व फळांची वाढ चांगली होऊन ती तजेलदार दिसतात.
फळांची काढणी व प्रतवारी :
एक झाडावर किती फळे घ्यावीत हे फळझाडाची जात, वय, ऋतू, वातावरण आणि लागवड पद्धतीवर अवलंबून असते. साधारणत: एका झाडावर 60-80 फळे ठेवावीत. जास्त फळे झाडावर ठेवल्यास फळे आकाराने लहान होतात. डाळिंबामागे(Pomegranate Farming) फळे पक्व होण्याचा कालावधी फळधारणेनंतर 120 ते 130 दिवस किंवा फुलोर्यानंतर 150-210 दिवस एवढा आहे, परंतु हा कालावधी बर्याच प्रमाणात झाडाच्या वाणावरसुद्धा अवलबूंन असतो.
डाळिंब फळ परिपक्व झाल्यावरच तोडणी करावी. अपरिपक्व किंवा अतिपक्व फळे तोडल्यास फळाची प्रत बिघडते व बाजारभाव कमी मिळतो. म्हणून तोडणी ही योग्य वेळीच झाली पाहिजे. तोडणीस तयार झालेल्या फळाच्या सालीचा रंग किंचित पिवळा दिसतो किंवा फळावर बोटांनी वाजवल्यास धातू ठोकल्यामुळे निघणार्या ध्वनीसारखा आवाज येतो. फळे बाजारात विक्रीस पाठविण्यापूर्वी त्यांची खालीलप्रमाणे आकारावरून प्रतवारी करावी.
1) सुपर -750 ग्रॅम / फळ किंवा जास्त
2) किंग -500 ते 750 ग्रॅम/ फळ
3) क्वीन -400 ते 500 ग्रॅम
4) प्रिन्स – 300 ते 400 ग्रॅम/फळ
फळे बांबूच्या करंड्यांत भरताना तळाशी वाळवलेले गवत किंवा कात्रण टाकून करंड्या व्यवस्थित बंद कराव्यात व त्यावर लेबल लावून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवाव्यात. दुसर्या बाजारपेठेसाठी कोरोगेटेड फायबर बॉक्सचा वापर करावा.
चांगल्या दर्जाची फळे मिळवण्यासाठी फळांची विरळणी करणे, वाढीची अवस्था लक्षात घेऊन मोजकीच फळे झाडावर ठेवणे याला फार महत्त्व आहे. 5 ते 6 वर्षे वयाच्या डाळिंब बागेतील एका झाडापासून 70 ते 80 फळे घेणे योग्य आहे. झाडे 8 ते 10 वर्षांची झाल्यावर प्रत्येक झाडापासून 150 ते 200 फळे मिळतात. बुरशीनाशक औषधांची पूर्वप्रक्रिया केलेली फळे 70 सें. तापमानात 90 दिवस चांगल्या स्थितीत साठवता येतात.