तुमच्या जवळ गाय असेल तर पहा शासनाची योजना.
तुमच्याकडे गाय किंवा गाई असतील तर शासनाची राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना तुम्हाला माहित असायला हवी शासनाने गाईसाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना राबवायला सुरुवात केली आहे.
पाहा सविस्तर माहिती.
आपल्या देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रथम शेतीला महत्त्व दिले जात आहे. तर शेतकरी पशुसंवर्धन म्हणून जोडव्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून करत असतात. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार पशुसंवर्धनला जास्तीत जास्त चालना मिळण्यासाठी व जास्तीत जास्त पशुसवर्धन होण्यासाठी अनेक योजना केंद्र सरकार राबवत आहे.
काय आहेत योजना
केंद्र सरकारच्या अंतर्गत राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना केंद्र सरकारने सर्वप्रथम 2014 मध्ये. 2025 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पाससह हे योजना सुरू केली होती. राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना या योजनेअंतर्गत देशी गाय जातीच्या विकसित केल्या जात असल्याने व त्यांच्या संवर्धनाकडे जास्तीत जास्त लक्ष दिले जात आहे. याव्यतिरिक्तही योजना शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करते.
देशामध्ये परदेशी जातींच्या जनावरांचे संगोपन करण्यासाठी शेतकरी जास्त वाढत आहेत.
आपण जर मागील काही वर्षाचा अंदाज बघितला तर शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त परदेशी जातीच्या गायांचे व जनावरांचे संगोपन करण्याचे लक्षात येत आहे. तज्ञांच्या मते आपल्या देशामध्ये परदेशी जनावरे आपल्या देशातील हवामान बदलाशी जवळून घेण्यास ते जनावरे असमर्थ राहातात. ते जनावरे आपले हवामानामध्ये मॅच होण्यास आज समर्थ होतात. त्यामुळे त्या जनावरांचे संगोपन करणे किंवा त्यांना पाळणे हा काही शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय नाही. देशातील पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायाच्या विभागाच्या आकडे वारी अनुसार. त्यांच्याकडे नजर टाकल्यास भारतातील 80 टक्के जनावरे देशी व गैरे वर्णित जाती असल्याचे आढळून येतात.
राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेचे उद्दिष्टे.
राष्ट्रीय गोकुळ मिशन योजने अंतर्गत सरकार स्वदेशी जातींच्या गाईंना प्रोत्साहन देत आहे. यासह इतर अनेक उद्देश यावरही अवलंबून आहे. ही योजना शेतकऱ्यांना सर्व सर्व सोयी सुविधा देण्याच्या प्रयत्नात आहे. कारण पशु सवर्धन शेतकऱ्यांसाठी तसेच पशु संवर्धन करणाऱ्यांसाठी सुलभ व सोपी व्हावे याशिवाय पशुसंवर्धनाच्या फायदा घेऊन हे त्यांचे आर्थिक उत्पन्न व जीवनमान सुधारू शकतात.
राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेचे इतर उद्दिष्टे.
• देशामध्ये देशी जातीचा विकास आणि संवर्धन करणे या योजनेच्या माध्यमातून हेतु आहे जेणेकरून अनुवांशिक रचना सुधारू शकते.
• देशी जातीच्या प्राण्यांच्या संख्येमध्ये वाढ.
•या माध्यमातून रोगांच्या साथींचा प्रसार नियंत्रित करणे.
• दूध उत्पादनास अधिकचे प्रोत्साहन देणे.
• साहिवाल मराठी घेऊनी गिर थारपारकर लाल सिंधी देशी अशा देशी जातींचा वापर करून गाईंच्या इतर जाती त्यांच्यापासून विकसित करणे.
• चांगल्या प्रजातीचे म्हणजे रोगमुक्त उच्च अनुवांशिक गुणवत्तेच्या बैलांचे त्यांच्यापासून वितरण होणे.
• शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या दारात गाई-म्हशींची दर्जेदार कृत्रिम रतन सेवा प्रदान करणे.
• राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्र जोडण्यासाठी बोबाइल जमप्लाझम साठी ये मार्केट पोर्टल तयार केले जाणार आहे. या ई मार्केट पोर्टल मार्फत शेतकरी एकत्र जोडले जातील.
• शेतकऱ्यांनी व पशु संगोपन करणाऱ्यांनी पशुधन व त्यातील उत्पादनाचा व्यापार वाढविला पाहिजे.
• या माध्यमातून शेतकऱ्यांचे अधिकचे उत्पादन वाढविणे व शेतकऱ्यांना याच्यातून आर्थिक उत्पादनाचा मोठा फायदा वाढविणे.
राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कार दिले जातात.
राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या पशुसंवर्धन व त्यांचा चांगल्या प्रकारे व्यवसाय करणाऱ्यांना चांगल्या प्रतीचे काम करणाऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून खास बक्षिसे सुद्धा देण्यात येतात.
• या योजनेच्या माध्यमातून पशुपालन करणाऱ्यांना बक्षीस देण्याची तरतूद केली आहे.
• या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी पशुसंवर्धन व दुग्धशाळा विभागामार्फत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या साठी या योजने मार्फत गोपाळ रत्न व कामधेनू पुरस्कार दिले जातात.
• तसेच देशी जातीच्या गाय संगोपनात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना गोपाल रत्न पुरस्कार दिला जातो.
• तसेच राष्ट्रीय गोकुळ योजनेच्या माध्यमातून कामधेनु पुरस्कार गौशाला व बेस्ट मॅनेजमेंट सोसायटीला देण्यात येतो.
• या योजनेच्या अभियानाअंतर्गत 2017 ते 18 पासून आज पर्यंत 22 गोपाळ रत्न तसेच 21 कामधेनु पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.