तुती लागवड – reshim udyog information in marathi 2021

तुती लागवड व रेशीम व्यवसायाला सुरुवात करताना घ्यायची काळजी

शेतकऱ्यांकडे तुती लागवड ( reshim udyog information in marathi ) उपलब्ध असलेल्या शेतीपैंकी काही ठराविक क्षेत्रावर तुतीची लागवड करतात व उत्पादित पाल्याचा उपयोग संगोपन गृहातील रेशीम अळ्यांच्या खाद्यासाठी वापर करून त्यापासून तयार होणारे रेशीम कोष विक्री करून उत्पन्न घेणे व आपन याला शेती जोड वेवसाय म्हणुन पाहु शकतो होय. म्हणजेच कोष शेतकऱ्याने अळ्यापासु तयार करायचे व त्याच्या विक्रीतून पैसे मिळवायचे.

Rainbow Colours in Marathi इंद्रधनुष्याबाबत काही मनोरंजन तथ्य

जगाच्या एकूण उत्पन्नापैंकी 82% उत्पादन हे एकट्या चीन देशांत मध्ये होते व तसेच दोन नंबर 16% उत्पादन हे भारतात होते

तुती लागवड - reshim udyog information in marathi 2021

रेशीमचे उत्पादनाचे प्रकार ( reshim udyog information in marathi )

१) तुती रेशीम
२) टसर रेशीम
३) एरी रेशीम
४) मूगा रेशीम

यामध्ये प्रामुख्याने उत्पादन ८२ ते ८४% तुती रेशीमचे उत्पादन घेतले जाते.

यामध्ये प्रामुख्याने दोन घटक समावेश आहेत ( reshim udyog information in marathi )

१) तुती उत्पादन
२) रेशिम कोष उत्पादन

तुती उत्पादन

🌳 *लागणारे भौगोलिक घटक*-म्हणजे
तापमान – १४ ते ४२ अंश
आद्रता- ९० ते ९५
पर्जन्यमान- ६०० ते २६००मिली

तुती लागवड - reshim udyog information in marathi 2021

जमीन

निचरा होणारी,भुसभुशीत,सपाट व तपाड किंवा मयवट प्रकारातील जमीन निवडावी
सामू- म्हणजे बेड अंतर६.२ ते ६.८ असावा
जमिनीची खोली२.५ ते ३ फूट असावी

लागवडीचा महीना ( reshim udyog information in marathi )

साधारणतः जून ते सप्टेंबर या कालावधीत याची लागवड केली जाते.तसेच पाण्याची सोय असेल तर जुनं मधे लागवड केली तरी चालते

तुतीच्या जाती ( reshim udyog information in marathi )

तुतीच्या एकूण३० ते ३५ जाती उपलब्ध आहेत त्यामध्ये महाराष्टात प्रामुख्याने *व्ही १* या तुती जातीची लागवड केली जाते.

तुतीची कलमे ( reshim udyog information in marathi )

तुतीची लागवड करायची असल्यास हि कलम पद्धतीने केली जाते.व कलम पद्धतीने करत्या वेळी साधारणतः 6 महिन्याच्या मातृवृक्षपासून हि कलमे काढली जातात.
-त्यासाठी पेस्न्सिल/बोटाच्या आकाराच्या काडीची निवड करावी.
-साधारणतः एका काडीवर ३ते४ डोळे असावेत,डोळे खुटलेले नसावेत.व डोळे टवटवीत असावी व
-काडीला खालच्या बाजूने तिरपा कापुन द्यावी.
-लागवडी पूर्वी कलम १% बविस्टीन या किंवा कोणत्याही चांगल्या बुरशीनाशक वापरावे व.

बुरशीनाशकाच्या द्रावणात आर्धा तास बुडवावेत.
-मुळांची चांगली वाढ होण्यासाठी खालच्या बाजूला रुटलेक्स पावडर चोळुन घ्यावि जेने करुन गुळाची वाड चांगली होते.

तुती लागवड - reshim udyog information in marathi 2021

तुतीची लागवड ( reshim udyog information in marathi )

-तुतीची लागवड करत असतात ते पट्टा पद्धतीने करणे गरजेचे असते. तसेच ही पट्टा पद्धतीने केली जाते या पद्धतीला ‘इंडो किंवा जपान पद्धत’ असेही म्हटले जातात.
तसेच यात खालील अंतरावर लागवड केली जाते व खालील अंतर या मापाचे ठेवले पाहिजे.
५×३×२ फूट, ५×२×१ फूट व ६×2×1फूट
-दोन साऱ्यांमधील आंतर 3 फूट, दोन पट्टयातील अंतर ५ फूट व दोन झाडातील अंतर 2 फूट याप्रमाणे लागवड केली जाते.

तुती लागवड करताना हे करावे ( reshim udyog information in marathi )

-लागवड करताना कलम उभा जमिनीत १ किंवा २ डोळे जमिनीच्या बाहेर राहतील अश्या पद्धतीने टोचुन घ्यावि.
-तिरकस(झिगझ्याग) किंवा मागे पुढे पद्धतीने लागवड करावी.

खत व्यवस्थापन कसे कराल ( reshim udyog information in marathi )

१ ले वर्ष
१ ली मात्रा दोन ते तीन महिन्यांनी एकरी २५ किलो नत्र द्यावे.
२ री मात्रा 3 ते ४ महिन्यात एकरी २५ किलो पालाश द्यावे
नंतर२ऱ्या वर्षांपासून एकरी *४८:२४:२४* किलो नत्र,स्फुरद,पालाश द्यावे.

तसेच तुती पिकांच्याआवश्यकतेनुसार सुक्क्ष अन्नद्रव्यांचा वापर करावा.

लागवड नंतर ( reshim udyog information in marathi )

लागवड झाल्यानंतर पाचव्या महिन्यापासून आपण तुतीचा पाला रेशीम कीटकांना म्हणजे अळ्यांना खाण्यासाठी दिला जातो.

तुतीचे झाड ( reshim udyog information in marathi )

युतीचे झाड हे लागवडी नंतर जास्तीत जास्त साधारणतः १५ वर्ष उत्पन्न देते.

रेशीम कीटकांचे शेड मधील संगोपन ( reshim udyog information in marathi )

संगोपन गृह-रेशीम कीटकांचे संगोपन गृह हे शेतात,गावा बाहेर, बांधावे कारण ते मोकळ्या जागी व धूळ प्रदूषण युक्त जागेपासून दूर असावे.
-संगोपन गृहाच्या बाजूच्या भिंतीची उंची ९ते१० फूट असावी व मधील उंची १२ ते १४ फूट असावी.
-रुंदी २० फूट व लांबी ५० फूट असावी.तशेच पुर्व पश्चिम बांधकाम करावे शेड मध्ये सुर्याचे किरण व हवा खेळती राहते,

रेशीम कीटकांचे पाच अवस्था ( reshim udyog information in marathi )

रेशीम कीटकाच्या पाच अवस्था असून पहिल्या दोन अवस्थाना बाल्यावस्था व उर्वरीत तीन अवस्था पासुन, प्रौढावस्था म्हंटले जाते. साधारणतः अंडी अवस्थेपासून २५ ते ३० दिवसात कोष विक्री साठी तयार होत जाते.

नक्की वाचाअसे काढा हरभरा पीक Harbhara Pik Lagwad 2020

रेशीम जात

 रेशीम कीटकांच्या अनेक जाती आहेत, परंतु महाराष्ट्रात प्रामुख्याने बायोव्हटाइन या जातीच्या कीटकांचे संगोपन केले जाते.

उत्पादन 

साधारणतः उत्पादन,१०० अंडीपुंजपासून ६० ते ११० किलोपर्यंत रेशीम निघतो. एका अंडीपुंजात ४०० पासुन ते ५०० अंडी पर्यंत असतात.

संगोपन गृह

अंडी संगोपन गृहात आणल्या नंतर निर्जंतुकीकरण,ब्लॅक बॉक्सिंग,हयाचींग,ब्रशिंग इत्यादी कामे केली जातात.
तुतीचा पाला
सुरवातीच्या काळात तुतीचा पाला हा कशाच्या हि साह्याने बारीक करून टाकावे व नंतरच्या काळात बारीक न करताच तसाच रेशीम कीटकांना खाऊ घातला जातो.

शासन मदत 

तुती रेशीम उद्योगासाठी शासनाकडून प्रशिक्षण तसेच अनुदान सुधा देखील दिली जाते.

शेतकरी मित्रांनो आपण रेशमी उद्योगाची सुरुवात करत असाल तर आपल्याला सगळ्या गोष्टी असणे आवश्यक आहे म्हणजेच आपल्याकडे शेती पाणी टीनशेड ह्या सर्व गोष्टी असणे आवश्यक आहे या जर गोष्टी आपल्याकडे नसतील तर आपण रेशमी उद्योग करू शकत नाही उद्योगासाठी कमीतकमी आपल्याकडे शेती असणे आवश्यक आहे.

शेती नसेल तर आपण हा उद्योग करू शकत नाही कारण आपण ज्या अळ्यांच्या कोशाची उत्पत्ती घेतो किंवा कोष तयार करतो त्या अळ्यांना आपल्याला तुतीचा पाला खायला द्यावा लागतो तुतीचा पाला आपल्याला शेतामध्ये आधीच लागवड करून नंतर कोशाचे अळ्यांना चांगला कोष तयार करु शकतो आपण जर तुतीची लागवड करू शकत नसाल किंवा आपल्याकडे शेत जमीन नसेल तर आपल्याला तुतीचा लागवड करता येणार नाही.

आपण जर कोषाची उपलब्ध करायची असल्यास किंवा त्यांना खाद्य द्यायचे असेल तर आपल्याकडे तुती लागवडीसाठी शेत जमीन असणे आवश्यक आहे  तरी मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे आवश्यक असे टीनशेड असणे गरजेचे आहे आपण ज्या प्रमाणात आपल्याला उद्योग करायचा आहे किंवा आपल्याला शेती जमीन जोड व्यवसाय करायचा असल्यास आपल्याला टीनशेड असणे गरजेचे आहे.

टीनशेड आपण बांधकाम करत असताना टीन शेड पूर्व-पश्चिम फायदेशीर राहते  टीनशेडमध्ये आपल्याला हवा खेळती राहिली तर आपल्या कोषाचे उत्पादन चांगले होते तसेच कोष आपले मोठे होतात व उत्पादनात आपल्याला चांगला नफा मिळतो म्हणून टीनशेड आपण जेवढे मोठे तेवढे उत्पादन त्या टीननमध्ये घेऊ शकतो आपल्याकडे जर जागाच नसेल किंवा जमीन किंवा शेता नसेल तर आपण हा उद्योग करू शकत नाही म्हणून तीसरी गोष्ट आपल्याकडे जमीन असणे किंवा जागा असणे आवश्यक आहे.

मित्रांनो आपल्याकडे महत्त्वाचे म्हणजे लागणारे पाणी आपल्या शेतजमिनी मध्ये भरपूर पाणी असल्यास हा आपन उद्योग करू शकतो  नाहीतर करू शकत नाही कारण आपण तुती पाल्याचे लागवड करण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज आवश्यक असते पाणी नसेल तर आपण तुतीची लागवड करू शकत नाही कारण पाण्याच्या नियोजनावर आपण तुतीची लागवड करून तुती चे झाड मोठे करू शकतो.

तुतीचा पाला मिळवण्यासाठी आवश्यकतेनुसार आपल्याला तू तिला पाणी द्यावे लागते म्हणून आपल्याकडे पाणी असणे गरजेचे आहे तरी मित्रांनो तुम्हाला जर हा उद्योग करायचा असेल तर आपल्याला शासनाकडून प्रशिक्षण तसेच माहिती दिल्या जाते तसेच वेगवेगळे अभ्यास दौरे सुद्धा आपल्याला करता येऊ शकतात.

मित्रांनो आपल्याला हा उद्योग करायचा असेल तर आपल्याला शासनाकडून काही टक्क्यावर ती अनुदान सुद्धा मिळते तरी काही शेतकरी या उद्योगांमध्ये प्रगतीशील ठरले तर काही शेतकरी याच्यामध्ये -तोटा मध्ये गेलेले आहेत.

शेतकरी मित्रांनो हा उद्योग करताना परिपूर्ण विचार करून किंवा अभ्यास करूनच हा उद्योग करणार नाहीतर शेतकऱ्यांना तोटा आलेला आहे  कारण आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण हा उद्योग करु शकत नाही आपल्याला परिपूर्ण त्या गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहे.

आपल्याला लागल्यास सरकारकडे पूर्ण माहिती किंवा अभ्यास दौऱ्यातून आपल्याला माहिती मिळू शकते तसेच मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे जे या उद्योगाचे उत्पादन घेत आहे किंवा कोष तयार करण्याचे योजना करत आहेत अशा शेतकऱ्यांकडे आपण दोन ते तीन दिवसाचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असते नाहीतर आपण या उद्योग टोट्यामध्य जाण्याची शक्यता राहते

मित्रांनो हा माझा लेख आवडला असेल तरी आपल्या शेतकरी मित्रां पर्यंत किंवा जे शेतकरी कोषाचे उत्पादन घेऊ इच्छितात अशा मित्रांपर्यंत पाठवा

शेतकरी मित्रांनो आपण राज्य सरकारच्या योजनेतून या उद्योगाचे उभारणी करू शकतो कारण राज्य सरकार आपल्याला 50 ते 60 टक्के अनुदान सुद्धा या उद्योगासाठी देते.

आपल्याला या उद्योगाची उभारणी करायचे असेल तर आपल्या जवळच्या तालुका कृषीवीभागातुन आपल्याला पूर्णपणे माहिती मिळते तसेच आपल्याला या उद्योगाचे सुरुवात करायची असेल तर आपल्याला तालुका कृषी विभागामार्फत या उद्योगात ऑनलाईन अर्ज सादर करणे ही गरजेचे असते.

धन्यवाद.

आपण आमच्या Blog ला भेट देवून त्यावरील उपलब्ध असलेल्या सविस्तर लेखांचा लाभ घेवू शकता, आपण दिलेल्या प्रतिक्रिया आमचे करता बहुमूल्य असतिल… खाली Comment जरूर करा

One thought on “तुती लागवड – reshim udyog information in marathi 2021

Leave a Reply

Your email address will not be published.

x