Soyabean-नमस्कार मित्रांनो आपण दरवर्षी खरीप पिकासाठी खते व बियाणे खरेदी करत असतो पण आपण खते व बियाणे खरेदी ची पावती सांभाळून ठेवत नाही म्हणून आपल्याकडे कोणताही ठोस पुरावा नसतो.
बियाणे खरेदी ची पावती जपून ठेवावी अशी सूचना कृषी खात्याने शेतकऱ्यांना दिलेली आहे मागच्या वर्षीचे बियाणे बोगस निघाल्याचा तक्रारीच्या व तक्रारी अनुसार कृषी विभागाने हे निर्देश शेतकऱ्यांना दिले आहे. तसेच खबरदारी म्हणून शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करता यावे म्हणून हे कृषी खात्याने पाऊल टाकले आहे.
मागील वर्षी म्हणजे 2019 20 या सोयाबीनचे Soyabean बियाणेबाबत अनेक तक्रारी शेतकऱ्यांसमोर उद्भवल्या होत्या. जवळपास बर्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाहीत. तर काही बियाण्यांची खूप कमी प्रमाणात उगम शक्ती बियाणे मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये विकले गेले आहे.
याच पार्श्वभूमीवर कृषी खात्याने पेरणी केलेल्या सोयाबीनचे देयक पिशवी तसेच बिल पावती सांभाळून ठेवण्याची सूचना कृषी खात्याने केली आहे गेल्या दोन वर्षापासून खरीप हंगामातील सोयाबीनचे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन झाले नाहीं.
तसेच सोयाबीन पिकावर खोडमाशी व चक्र भुंगा या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे त्यातच अनियमित पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकामध्ये खूप मोठा फटका बसला आहे.
प्रामुख्याने सोयाबीन पीक तयार करण्याच्या वेळेस अनियमित पाऊस किंवा अति पाऊस झाल्याने सोयाबीन पिकांना अंकुर आले आहेत त्यामुळे सोयाबीनची उगवणक्षमता कमी राहण्याची भीती व्यक्त केली गेली. त्यामुळेच कृषी खात्याने खबरदारी म्हणून या वर्षी बाजारामध्ये उपलब्ध बियाण्यांची उगवण क्षमता निष्कृष्ट राहू शकते त्याचा फटका उत्पादन कमी होऊन शेतकऱ्यांना बसू शकतो बियाण्यांची अशी स्थिती असल्याने खाजगी कंपन्यांकडे असलेल्या बियाण्यांचे भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी जवळपास प्रत्येक बॅग मागे एक हजार रुपयांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
या वर्षी शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पिकांची फेरपालट करून जमिनीची सुपीकता वाढवावी जमिनीमध्ये पीक फेरपालट केल्याने जमिनीची सुपीकता चांगली राहते. तसेच अन्य पर्याय पिकांची लागवड करावे सोयाबीन तूर मूग उडीद हळद आदी पिके घेता येतील सोयाबीन हे आंतरपीक म्हणून घ्यावे त्यामुळे बियाणे कमी आगेल.
शेतकरी मित्रांनो या वर्षी सोयाबीन पिकाचे लागवड करत असल्यास आपण सोयाबीन खरेदी केलेले सोयाबीन ची पिशवी तसेच सोयाबीनचे पक्के बिल सांभाळून ठेवावे ही विनंती.