नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती पाहणार आहोत ऊस या पिकाविषयी माहिती.
उसाची लागवड कशी करायची उसाचे(Sugarcane Farming) बेणे कसे वापरायचे उसाचा(Sugarcane Farming) वापर योग्य प्रमाणे कसा होऊ शकेल त्याचे प्रमाण आपण किती घेऊ शकू आणि उसाचे पेरण(Sugarcane Farming) कसं करायचं हे सुद्धा आपण याच्या मध्ये बघुयात म्हणजेच आपल्याला समजून जाईल की उसाचं(Sugarcane Farming) पीक योग्य रीतीने कसे घेतले जाईल उसाचे पीक (Sugarcane Farming)योग्य रीतीने घेण्यासाठी आपण समोरील माहिती योग्य प्रकारे समजून घेऊ.
Kabutar Information in Marathi कबुतर
महाराष्ट्रात सरासरी उसाचे(Sugarcane Farming) उत्पादन जे आहे ते साखर साठी चांगल्या प्रकारे घेतले जाते .
उसाचे दोन प्रकार
आहेत एक आहे साखरेचा ऊस आणि दुसरा आहे गुळाचा ऊस. उसासाठी(Sugarcane Farming) जमीन कशी लागते व त्या जमिनीमध्ये आपण उसाची(Sugarcane Farming) पूर्वमशागत कशी घेऊ शकतो याची आपण माहीती बघूया.
उसासाठी (Sugarcane Farming)जमीन भारी ते मध्यम असायला हवी. जमिनीचा भाग 45 ते 60 किंवा 50 ते 65 अशा सेंटीमीटर मध्ये जमीन खोल असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी जमीन सुद्धा उत्तम निचर्याची निवडावी कारण जमिनीची उन्हाळ्यामध्ये उभी व आडवी नांगरणी जी
आहे ती खोल असायला हवी ज्यावेळेस जमीन तापते त्यावेळेस जमीन ही चांगल्या प्रकारची व दर्जेदार राहते म्हणजे नांगरटी नंतर जमीन तापल्यानंतर जी जमिनीमध्ये ढकलत असतात ते योग्य प्रमाणे फोडावेत आणि कुळवाच्या उभ्या-आडव्या आल्यानंतर त्या जमिनीचं सपाटीकरण करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे.
ऊस लागवडीसाठी जर आपण यांत्रिक पद्धतीचा वापर करायचा ठरवलं तर त्यामध्ये दोन सरीतील चे अंतर असते की ते वीस सेंटीमीटर म्हणजेच चार ते पाच फुटाची ठेवावे म्हणजे ऊस तोडणी यंत्राच्या सहाय्याने
करणार असल्यास दोन ओळीतील जे काही अंतर असते म्हणजेच दीडशे सेंटी मीटर ठेवावे यामुळे अंतर मशागत ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ट्रॅक्टरने व ऊस तोडणी यंत्राचा वापर सुलभ प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने करू शकतो.
उसासाठी(Sugarcane Farming) आपल्याला खताचे नियोजन कसे करायचे आणि त्याचे व्यवस्थापन सुद्धा कसे करायचे ते आपण बघू या.
जर उसाचा(Sugarcane Farming) आपल्याला भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर ऊसाला अति चांगल्या प्रकारचा खताचा पुरवठा करणे सुद्धा तेवढाच आवश्यक असतो रासायनिक खताचा जास्त जर वापर केला तर जमिनीची उत्पादकता असते म्हणजे तिची क्षमता जी असते ती कमी होते आणि या समस्येवर आपण किंवा मात करण्यासाठी जर उपाय करायचे ठरवले तर आपल्याला थोडे कठीणच जाईल म्हणून ह्या साठी चांगली पद्धत म्हणजे उसात(Sugarcane Farming)
एकात्मीकरण करणे म्हणजे त्याचे व्यवस्थापन करणे सुद्धा होय एकात्मिक पद्धतीने खाता पुरवठा करता वेळेस आपण खालील जीप होत आहेत त्याचे उत्पादन यामुळे उत्पादनात वाढ कशी होईल हे आपण बघूया सर्वप्रथम आपण सेंद्रिय खताचा वापर करणे गरजेचे आहे.
आपण शेतकरी आहोत तर आपण सेंद्रिय खताचा वापर करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे कारण जोपर्यंत आपण सेंद्रिय खताचा वापर करणे सुरु ठेव तोपर्यंत जमीन हि कसदार सुद्धा राहील आणि जमिनीचा आपल्याला योग्य त्या पिकासाठी चांगला फायदा घेता येईल
शेणखत घेण्याची पद्धत आपण आता बघूयात.
जेव्हा आपण शेतीची पूर्व मशागत करीत असतो त्यावेळेस आपण नांगरणी करणे महत्वाचे आहे व ही नांगरणी झाल्यानंतर योग्य प्रकारच्या शेवटच्या टप्प्यात अगोदर दर हेक्टरी आपण 30 ते 40 टन शेणखत शेतात मिसळून घ्यावे व त्यानंतर चांगल्या उचला वणीच्या आधी आठ ते नऊ ते दहा टन शेणखत व त्याच्या सोबत आपण रासायनिक खत जी आहे त्याचा पहिल्या टप्प्यात आपण मी सोडू शकतो.
दुसरा प्रकार एक आपण शक्ती खताचा सुद्धा बघू शकतो..
आता शक्ती खत म्हणजे काय तर विना खर्चात शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेलं खत म्हणजे शक्ती खत होय या खतांमध्ये आपण वेगवेगळ्या जनावरांच्या माशांचे खत रक्ताचे खत गाळाचे खत मासळी आणि इतर काही पाल्यांचे सुद्धा खत यांचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो आणि खरोखरच या खताचा घर आपण योग्य प्रमाणात उपयोग घेतला तर उसाचे(Sugarcane Farming) उत्पादन सुद्धा टक्क्याने चांगले येते.
नक्की वाचा – तुती लागवड – reshim udyog information in marathi 2021
गांडूळ खत निर्मिती.
आपणा सर्व शेतकऱ्यांना गांडूळ खत म्हणून हे नाव आहे हे सर्वांना परिचित आहेत तर गांडूळ खत हे अशाप्रकारचे एक उत्तम होत आहे की त्या खतांमध्ये दोन ते तीन टक्के हुरद एक टक्का पालाश 5% झिरो पॉईंट पाच टक्के सुषमा असून हे अन्नद्रव्य आहेत हे चांगल्या प्रमाणात कारणीभूत ठरतात
उसाच्या (Sugarcane Farming)पिकासाठी हेक्टरी पाच ते सहा टन गांडूळ खताची शिफारस केली असून त्यामधून आपण शंभर शंभर दीडशे किलो पालाश अशा प्रकारचे पिकास मिळते अशा प्रकारचे खत आपण चांगल्या प्रकारे देऊ शकतो.
उसासाठी (Sugarcane Farming)आपण कोण कोणत्या खताचा योग्य वापर करू शकतो ते बघुया हे खत म्हणजे जिवाणू खत.
आता या जिवाणू खतांमध्ये आपण कशा कशाचा वापर करू शकतो तर ते आपण खालील प्रमाणे बघू कॉपर सल्फेट , बोरीक ऍसिड, सोडियम ऍसिड, मॅग्नीज सल्फेट ,
फेरस सल्फेट ,अशा प्रकारचे खत आपण योग्य त्या प्रमाणात वापरू शकतो. अशाप्रकारे आपण उसाची (Sugarcane Farming) साधी लागवड करू शकतो.
आणखी पद्धतीने आपण उसाची(Sugarcane Farming) लागवड करू शकतो तेसुद्धाआपण बघुयात:-
(१०.२५ टक्के) जास्त होता.
लागवडीचा हंगाम सुरु – १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी, पुर्वहंगामी – १५ ऑक्टोंबर ते १५ नोंव्हेबर, आडसाली – १५ जुलै ते १५ ऑगस्ट असे ऊस लागवडीचे हंगाम ऊस उत्पादकता व साखर उता-याच्या दृष्टीने योग्य आहेत.
जातींची निवड
महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आणि वसंतदादा साखर संस्था (व्ही.एस.आय) मांजरी, पुणे यांच्या माध्यमातून आतापर्यंत अधिक ऊस उत्पादन आणि चांगला साखर उतारा असणा-या अनेक जाती प्रसारित केल्या आहेत.
तथापी सध्या को. ८६०३२ (निरा), को ९४०१२ (फुले सावित्री), को.एम.०२६५ (फुले २६५), को. ९२००५ आणि को.सी ६७१ या मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असणा-या जातींची प्रामुख्याने निवड करावी.
ऊस लागवड ची आणखी आपण बऱ्यापैकी पद्धत निवडू शकतो
ऊस शेतीमध्ये आता आधुनिक तंत्र येत आहे. या तंत्राचा चांगला फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. आता पुढचे पाऊल म्हणजे ऊस कांड्यांची नव्हे, तर थेट ऊसाच्या रोपांचीच लागवड करायची आहे. हि लागवड अनेक अर्थी व कित्येक पटींनी शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे.
दरवर्षी ४० हजार कोटींची उलाढाल होणारा, राज्यातील १ कोटी लोकसंख्या अवलंबून असलेला साखर उद्योग महाराष्ट्राची शान मानला जातो. आज राज्यात थोड्या थोडक्या नव्हे तर १०.२२ लाख हेक्टर क्षेत्रात ऊसाची लागवड प्रतिवर्षी होते. ऊसाचे पीक आडसाली म्हणजे तब्बल दीड वर्षे शेतात राहते. थोडक्यात दरवर्षीनुसार लागवडीचे व गाळपास असे मिळून २० लाख हेक्टरहून अधिक ऊसाचे क्षेत्र आहे.
लाखो कुटुंबांच्या घरात समृद्धी आणणाऱ्या या पिकास दुर्दैवाने आळशाचे पीक असे म्हटले जाते. त्याला कारण म्हणजे शेतकऱ्यांना कमी कष्टात त्याचे उत्पादन मिळते असे म्हटले जाते. अर्थात हि परिस्थिती काही वर्षापर्यंत होती. कारण ऊसाची सरासरी उत्पादकता एकरी ४० टनांपर्यंत किमान असायला हवी, तरच परवडते, असा युक्तिवाद त्यावेळी केला जात होता.
मात्र, एकरी ४० टन ऊसाचे उत्पादन घेऊनही ऊसाची शेती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, असे लक्षात आल्यांनतर शेतकऱ्यांची या पिकाबाबतही व्यावसायिकदृष्टी अधिक सखोल होत गेली. साहजिकच ऊसाची शेती व्यावसायिक दृष्टीने केली तरच एकरी १०० टन ऊस उत्पादन घेता येईल आणि तरच शेती नाफेशीर होऊ शकेल, असा प्रवाद आता शेतकऱ्यांमध्ये आहे.
नवनवे प्रयोग आता शेतकरी करू लागले आहेत. त्यातून उसाचे पीक(Sugarcane Farming) ठिबक सिंचनाखाली आणण्याचाही प्रयोग यशस्वी झाला. पुढे त्यात ऑटोमायझेशनही आले आहे. त्यापाठोपाठ एरवी ऊसाचे पीक तुटून गेल्यानंतर त्याचे पाचट पेटायचे थांबले. साहजिकच त्याद्वारे जमिनीतील सेंद्रिय कर्ब अबाधित राहण्यास मोठी मदत झाली.
त्यानंतर उसाच्या पिकातील(Sugarcane Farming) यांत्रिकीकरण वाढले. त्यामुळे मजुरी व मजुरांच्या खर्चात बचत झाली. हळूहळू एक – एक पायरी पुढे निघालेल्या ऊसाची शेती आता आधुनिक पावलांनी पुढे जावी, अशी अपेक्षा आहे. ऊसाच्या रोपांचीच लागवड का?
आतापर्यंत व सध्याही प्रचलित असलेली लागवड हि ऊसाची टिपरी, एक डोळा व दोन डोळे, तीन डोळे अशा स्वरुपात होती. या पद्धतीची लागवड करताना शेतकरी एका एकरातून अधिकाधिक ऊस मिळावा म्हणून दोन टिपऱ्यांत एक फुट अंतराची शिफारस असताना प्रत्यक्षात समोरासमोर म्हणजे टक्कर पद्धतीचे, सवाई पद्धतीचे लागवड करत असे. त्यातून टिपरी म्हणजे बियाणे अधिक लागते. त्यातून खर्चही वाढतो.
आताच्या ऊसाला प्रचलित मिळणारा भाव पाहता, लागवडीसाठी प्रति एकरी तीन ते चार टन बियाणे वापरणे हि परवडणारी बाब नाही. त्याचप्रमाणे लागवड करणाऱ्याचाही खर्च विनाकारण वाढणारा आहे. निर्सार्गाच्या लहरीपणावर मात करून ऊसाचे उच्चांकी उत्पादन काढण्यासाठी ठिबक सिंचनावर रोपांद्वारे लागवड करून १०० टक्के रोपांची लागवड खूप फायदेशीर ठरणार आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे टिपरीद्वारे केलेली लागवड हि अनेकदा लागवडीनंतर उगवण न झाल्याने पुन्हा सांधावी लागते. त्यातून खर्च वाढत जातो. शिवाय सांधलेल्या ऊसाची मुळ ऊसाशी बरोबरी करण्यात खूप वेळ लागतो. त्याउलट रोपे आयती असल्याने त्यांची उगवणक्षमता चांगली असल्याने व लागवडीनंतर उगवून रोपे मोठी होण्याचा वेळ वाचण्यासाठी रोपांची लागवड खूपच फायदेशीर ठरते. शिवाय लागवड करताना अलीकडे मजुरांचा वाढलेला खर्च लक्षात घेता, निरोगी व उत्तम प्रतीची रोपे शेतकऱ्याचे एक कुटुंब घरच्या घरी लागवड करू शकते. निरोगी व उत्तम प्रतीची रोपे शेतकऱ्यांनाही तयार करता येऊ शकतात.
रोपांची लागवड खर्चिक नाही:–
टिपरीद्वारे लागवड करण्यासाठी सध्या शेतकरी प्रतिएकरासाठी दीड गुंठ उसाचे(Sugarcane Farming) बेणे खरेदी करतात. सध्या प्रति गुंठ चार ते पाच क्वचित सहा हजार रुपये दर बियाणे असलेले शेतकरी आकारत आहेत. तत्याचा विचार करता जवळपास एकरी साडेसात हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. शिवाय बियाणे तोडणी, वाहतूक, लागवड यांसाठी पुन्हा एकरी चार हजार रुपयांहून अधिक खर्च येतो. त्यातही लागवड झाल्यास शंभर टक्के उगवण क्षमतेची खात्री नाही. साहजिकच त्यापुढील पिढीचे म्हणजे खोडव्याचे उत्पादनही कमी येते. त्याचा विचार करता रोपांच्या पद्धतीने लागवडीचा पर्याय अधिकच फायदेशीर आहे.
रोप लागवडीचे आर्थिक गणित:-
उपाय १: एक एकर क्षेत्रात रोपांची जर पाच बाय दोन फुट अंतरावर लागवड केली तर ४३५६ रोपे एका एकर क्षेत्रात लागतात. दोन रुपयांना प्रति रोप खर्च धरल्यास ८ हजार ७१२ रुपये एका एकरासाठी खर्च येतो. त्याद्वारे एका एकर क्षेत्रात तुटून जाणारा ऊस ४५ हजार संख्येपर्यंत मिळतो.
उपाय २: पाच बाय अडीच फुट अंतरावर जर लागवड केली तर ३४८४ रोपे लागतात. त्यासाठी ६ हजार ९६९ रुपये खर्च येतो. त्याद्वारे एक एकर क्षेत्रात तुटून जाणारा ऊस ४५ हजार संख्येपर्यंत मिळतो
उपाय ३: पाच बाय तीन फुट अंतरावर लागवड केली तर २९०० रोपे लागतात. त्यासाठी ५ हजार ८०० रुपये खर्च येतो. त्याद्वारे एका एकर क्षेत्रात तुटून जाणार ऊस ४५ हजार संख्येपर्यंत मिळतो.
अर्थात लागवडीतले अंतर जेवढे वाढेल, तेवढे ऊसाचे वजन वाढत जाते. कारण ऊसाच्या बांधणीपर्यंत फुटव्यांची संख्या मर्यादित राहून सूर्यप्रकाश, मोकळी जागा अधिक मिळते. फुटव्याचे ऊसात रुपांतर झाल्याने दिली गेलेली अन्नद्रव्ये मोजक्याच ऊसाला मिळाल्याने त्याचे वजन वाढून तो सुदृढ बनतो. कारखान्यास तुटला जाणारा ऊस अधिक वजनदार बनतो. त्यामुळे जरी लागवडीची रोपे कमी झाली, तरी पर्यायाने अंतर व खेळती हवा अधिक मिळून त्याचा उत्पादनासाठी फायदाच होतो.
प्रचलित पद्धतीचे तोटे:–
प्रचलित पद्धतीने ऊसाची लागवड केल्यानंतर सुरुवातीस ऊसाच्या पिकात खूप गर्दी दिसते. तब्बल अडीच ते तीन लाख फुटवे होतात. मात्र प्रत्यक्षात कारखाण्यात तुटून जाणारा ऊस तुलनेने खूपच कमी होतो. कारण फुटवे वाढले, तरी एकमेकांना मारून टाकणारे फुटवे अधिक होतात. दिलेली अन्नद्रव्ये विभागून जाऊन प्रत्येक फुटव्यास त्या तुलनेत अन्न मिळत नाही. फुटव्यांची संख्या वाढून तुटेपर्यंत त्यातील अनेक मरून जातात व वजन कमी झालेला ऊस मिळतो.
रोपांद्वारे लागवड कशी करावी:-
शेताची(Sugarcane Farming) चांगल्या प्रकारे मशागत झाल्यानंतर साध्या पद्धतीने पाच फुट बाय पाच फुट अंतरावर मध्यम खोलीची सरी काढून घ्यावी. या सरीमध्ये उपलब्ध असलेले कुजलेले शेणखत, मळी, कारखान्याची राख, कंपोस्ट खते टाकावी. एकरी प्रत्येकी तीन किलो अझॅटोबॅक्टर , स्फुरद विरघळविणारे जीवाणू व पालाश उपलब्ध करणारे जीवाणू मिसळून घ्यावेत.
तर ठिबक सिंचन पद्धतीने केल्या जाणाऱ्या लागवडीसाठी पाच फुट अंतरावर सोळा ते अठरा एम.एम. जाडीची उपनळी टाकावी. हलक्या ते मध्यम जमीनीत चाळीस सेंटीमीटर अंतरावर ताशी ४ लिटर पाणी टाकणारा इनलाईन ड्रीपर असावा. तर भारी जमीनीत पन्नास सेंटीमीटर अंतरावर ताशी ४ लिटर पाणी टाकणारा इनलाईन ड्रीपर असावा. रोपांची लागवड करण्यापूर्वी ठिबक सिंचन चालवावे, म्हणजे मध्यम ते हलक्या जमीनीत एकरी ५० हजार लिटर पाणी तर भारी जमीनीत ४४ हजार लिटर पाणी द्यावे.
वाफसा आल्यानंतर कुदळीने दोन फुट अथवा अडीच फुट अथवा तीन फुट अंतरावर गल घेऊन रोपांची लागवड करावी. यानंतर दिवसातून एक वेळ दोन तास ठिबक सिंचन प्रणाली चालू ठेवावी. चौथ्या दिवसापासून आठ किलो युरिया, अर्धा किलो फॉस्फेरिक अॅसीड, चार किलो पोटॅश ठिबक सिंचनातून आठवड्यातून एकदा सोडावे.
ट्रे मधील रोपांचा वापर :
• खोडवा पिकातील नांग्या भरण्यासाठी
• कमी कालावधीत ऊसाचे पीक घेण्यासाठी
• बियाणे निर्मितीसाठी, बियाणे प्लॉट तयार करण्यासाठी
ऊस रोपे तयार करताना काय काळजी घ्यावी ?
• जमिनीची योग्य प्रकारे मशागत करावी. दोन नांगरटी, एक कुळवणी, डिस्क हॅरो (तव्याचा कुळव) कुळवणी, सबसॉईलरने नांगरट करावी.
• पाच फुट अंतरावर मध्यम खोल सरी काढावी.
• ठिबक सिंचनाची उपनळी प्रत्येक सरीमध्ये टाकून जमीन ओली करावी.
• वाफसा आल्यावर कुदळ, काठीच्या सहाय्याने दहा से.मी. खोली एवढा खड्डा/ गल घ्यावी.
• ट्रेमधील रोपांना हलक्या पाण्याची फवारणी करून, प्रत्येक रोप अलगद उचलून खड्ड्यामध्ये लावावे, चोहोबाजूने माती दाबावी.
• सर्व रोपे लागवड केल्यानंतर ठिबक सिंचन एक ते दीड तास चालवावे.
• ऊसाच्या रोपांचा ट्रे राखून ठेवावा, जेणेकरून १ ते २ % होणाऱ्या रोपांची मर सांधता येईल.
• चौथ्या दिवसापासून फर्टीगेशन चालू करावे.
• लागवडीपासून २१ दिवसाच्या आत
१) ह्युमिक अॅसिड
२) जीवाणू खते- अझॅटोबॅक्टर, स्फुरद विरघळविणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू प्रत्येकी एक लिटर तसेच कार्बेंडाझीम २०० ग्रॅम १०० लिटर पाणी यांची आळवणी करावी किंवा ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.
रोप लागवडीचे फायदे कसे ते बघूया:-
• रोपांद्वारे लागवड केल्यामुळे ९८ ते १०० % उगवण क्षमता पर्यायाने शेतात तुट राहत नाही.
• एक ते दीड महिना ऊसाचे शेत मशागतीसाठी किंवा कमी कालावाधीच्या पिकासाठी वापरता येते.
• आडसाली अगर पूर्व हंगामी ऊसाची लागवड करताना जास्त पाऊस असल्यास जमीन वाफश्यावर नसल्यास दीड महिन्यापर्यंत रोपांद्वारे लागवड करता येईल.
• लागवडीच्या ऊसामध्ये तुट नसल्यामुळे खोडवा पिकामध्ये तुट संधावी लागत नाही, ज्यामुळे खोडव्याचे उत्पादन वाढीसाठी मदत होते.
• गाळप योग्य ऊसाची संख्या जास्त मिळते.
• प्रत्येक ऊसाचे वजन व प्रतवारी वाढते.
• लागवडीवेळी दोन ओळींतील व रोपांतील अंतर योग्य राखल्यामुळे प्रत्येक ऊसाला, बेटाला सर्व बाजूंनी सूर्यप्रकाश, मोकळी हवा, अन्नद्रव्यांची उपलब्धता सारख्या प्रमाणात मिळते.
• निरोगी रोपांमुळे किडग्रस्त व रोगग्रस्त ऊस, ऊसाची बेटे तयार होत नाहीत.
• दोन रोपांतील अंतर जास्त असल्यामुळे व रोप लागण करताना पाने कापल्यामुळे (जेठा कोंब) फुटवे जास्त व एकाच वेळी येतात.
• फुटवे एकसारखे, जोमदार येतात. त्यांची वाढही एकसारखी होते. उत्पादन खर्चात बचत होते.
आता ऊस तोडणी साठीसुद्धा आपनास जास्त त्रास होणार नाही:-
ऊस तोडणी यंत्रास अनुदान योजना
उसाच्या(Sugarcane Farming) क्षेत्रामध्ये व उत्पादनामध्ये होत असलेल्या वाढीमुळे साखर कारखान्यांना ऊसतोडीची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनातर्फे शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्रावर अनुदान देण्यात येते. या योजनेविषयी माहितीपर विशेष लेख…
महाराष्ट्र राज्यामध्ये देशाच्या साखर उत्पादनापैकी एक तृतीयांश साखरेचे उत्पादन होते. विविध प्रकारच्या शैक्षणिक सुविधा, मजुरांना उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या विविध संधी, जीवनशैलीतील बदल यामुळे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्तर उंचावल्यामुळे दिवसेंदिवस ऊस तोडणी मजुरांची संख्या कमी होत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे साखर कारखान्यांना ऊस तोडणीची समस्या भेडसावत आहे.
कुशल मजूर उपलब्ध न झाल्यामुळे उभ्या पिकाची नासाडी होण्याची शक्यता निर्माण होते. ऊस तोडणीस उशीर झाल्यास साखरेच्या उताऱ्यावर परिणाम होत असल्यामुळे उसाला(Sugarcane Farming) कमी भाव मिळतो.
बदलत्या काळातील तंत्रज्ञानाचा विचार करता पारंपरिक पद्धतीचे ऊस तोडणीबरोबरच यांत्रिक पद्धतीने ऊस तोडणी करणे आवश्यक झाले आहे. या क्षेत्रात खाजगी साखर कारखान्यांकडून निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे, भविष्यात ऊसतोडणी वेळेवर आणि कमी खर्चात करण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी यांत्रिक पद्धतीने ऊस तोडणी करण्याकडे आता शेतकरी व साखर कारखाने वळू लागले आहेत. ऊस तोडणी यंत्राच्या किंमती महाग आहेत. सर्वसामान्य शेतकरी(Sugarcane Farming) अथवा साखर कारखान्यांना ऊस तोडणी यंत्र खरेदी करणारे परवडणारे नाही. शेतकरी व साखर कारखान्यांना शासनाने नेहमीच विविध सवलती देऊन प्रोत्साहित केले आहे.
ऊस तोडणी समस्येवर मात करण्यासाठी, शासनाने ऊस तोडणी यंत्रास अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष 2016-17 पासून ही योजना राबविण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील सहकारी साखर कारखाने, व्यक्ती अथवा त्यांचा समुह गट व स्वयंसहायता गट (एसएचजी) हे अनुदानासाठी पात्र राहतील.
या योजनेनुसार सहकारी साखर कारखाने ऊस तोडणी यंत्राच्या एकूण किमतीच्या 40 टक्के अथवा रुपये 40 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल एवढ्या अनुदास पात्र राहतील.
मात्र यासाठी कारखान्यांचे नक्तमूल्य अधिक असणे आवश्यक आहे. तसेच ज्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीचे काम करणार आहेत, त्या कारखान्याचे संमतीपत्र घेणे आवश्यक आहे.
ऊस तोडणी यंत्राची निवड करण्याची जबाबदारी संबंधित साखर कारखाना अथवा लाभार्थ्यांची असेल. ऊस तोडणी यंत्राचा वापर महाराष्ट्र राज्यामध्येच करणे बंधनकारक आहे.
कारखाना/ व्यक्तीगत लाभार्थी यांनी यंत्राचा वापर संबंधित कारखान्यांच्या करार करण्यात /आलेल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस संपेपर्यंत करणे बंधनकारक आहे.
ऊस तोडणी यंत्रास काम मिळण्याची जबाबदारी यंत्र खरेदीदाराची आहे. ऊस तोडणी यंत्र खरेदीदाराकडील मनुष्यबळ प्रशिक्षित करण्याची जबाबदारी यंत्र पुरवठादाराची असेल.
प्रशिक्षणाची खात्री करुनच खरेदीदाराने यंत्राची निवड करावी.