शेतकरी मित्रांनो पीक घ्यायचे असल्यास कोणती गाडी घ्यायची व तीळ पिकाची ( Til lagwad ) शेती कशी करायची त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे तीळ पिकाची सुधारित लागवड व जास्तीत जास्त उत्पादन कोणत्या प्रकारे घेता येईल व लागवड कशी करायची उत्पन्न जास्त वाढ कसे करायचे तर चला मित्रांनो आज आपण पाहणार आहे तीळ पिकाचे ( Til lagwad ) सुधारित लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापन
अस्वल बद्दल रोचक माहिती 30 Amazing Fact about Bear Aswal in Marathi
मित्रांनो महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने रब्बीमध्ये घेतल्या जाते तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये याची लागवड केल्या जाते जवळपास 17 ते 18 जिल्ह्यांमध्ये याची भरपूर प्रमाणात रब्बीमध्ये लागवड केल्या जाते. तीळ पीक ( Til lagwad ) हे प्राचीन काळापासून घेण्यात येत असल्याने महत्त्वाचे तेल बिया पीक आहे तिलाच या बियाण्यात सर्वसाधारणपणे तेलाचे 50 टक्के व प्रथीनाचे 25 टक्के प्रमाण असते तिळात म्हणजे विशेषता घटक पायाचे म्हटलं तिळाच्या भेंडीमध्ये प्रथिने कॅल्शियम व फॉस्फरस हे खनिज पदार्थ असतात
तीळ पिकाची लागवड, तंत्रज्ञान व व्यवस्थापन – Til lagwad 2021
तिळाचे तेल खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे तिळाचे तेल दुकानावरती आता औषधी तेल म्हणून सुद्धा विक्रीसाठी वापरले जाते व तिळाचे तेल खाणे आरोग्यासाठी तसेच चांगलेही आहे तीलाचे तेल जुने लोक रोज आहारामध्ये खात असत तर मित्रांनो तिळाचे पीक शेतकरी साधारणता खूप कमी घेतात कारण खेळाकडे शेतकऱ्यांचे लक्ष नाही आहे
महाराष्ट्र मध्ये तिळाची लागवड साधारणता 27 ते 28 हजार हेक्टर एवढे क्षेत्र असून उत्पादकता कमी आहे कारण शेतकरी त्याच्याकडे त्याच्याकडे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून बघत नाहीत व कमी लागवड करतात म्हणून त्याला केव्हाही जास्त प्रमाणात भाव राहता व तिळाचे तेल केव्हाही महाग राहते तर तिळाचे तेल खाणे आरोग्यासाठी चांगले आहे
तीळ ( Til lagwad ) पीक कमी घेण्याचे कारणे..
मित्रांनो शेतकरी आज तीळ पिकाची ( Til lagwad ) कमी लागवड करत आहे त्याच्या मागील कारणे हे पीक प्रामुख्याने जिरायती खालील वरकस जमिनीत किंवा कसदार जमिनीत येण्यासारखे आहे दोन नंबर सुधारित जाती व लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान कमी वापर व जाती योग्य बियाणे न मिळणे व कमी पीक म्हणून त्याच्याकडे शेतकऱ्यांचे कमी लक्ष आहे
पावसाचा अनियमितपणा अति कमी व जास्त पडणारा पाऊस जर झाला तर तीळ पीकाल कळ्या लागत नाही म्हणून तिळा कळे शेतकऱ्यांचे कमी लक्ष आहे वरील सर्व बाबी लक्षात घेऊन तीळ पिकाची ( Til lagwad ) सुधारित तंत्रज्ञान वापरून लागवड केल्यास उत्पादन वाढवण्यासाठी मोठा मोठा वाव मिळू शकतो व शेतकऱ्यांना जर त्याच्याकडे लक्ष दिले तर उत्पन्नासाठी तीळ पीक हे चांगले आहे चांगल्या सुधारित जातीची लागवड करा व तीळ पिकापासून भरपूर उत्पन्नही मिळू शकते
नक्की वाचा – bitter melon in marathi 2021 – कारले पीक लागवड व व्यवस्थापन
तिळ पिकाला लागणारे हवामान..
शेतकरी मित्रांनो तीळ पिकाची ( Til lagwad ) लागवड करत असल्यास महत्त्वाचे तीळ पिकाला हवामानाचा ही गरज असते तर मित्रांनो तीळ पिकाची जर लागवड आपण केली तर तीळ हे पीक पडणारा पाऊस त्याच्या वितरण तापमान व सूर्यप्रकाशाचा जास्त प्रकाश असला किंवा तापमान जास्त असले तर तीळ पिकाची उगम शक्ती कमी होतो तर मित्रांनो पिकासाठी लागणारा हवामान तापमान आपण पुढील प्रमाणे पाहू
तिळ पिकाला मध्यम आवश्यक असलेला पाऊस म्हणजे सहाशे ते सातशे मी इतक्या पावसाचे गरज भासते हे पिग जिरायती खालील देखील घेता येते बियाण्याच्या चांगल्या वाढीसाठी किंवा उगम शक्तीसाठी तापमान 15 अंश सेल्सिअस तर पिकाच्या चांगल्या वाढीसाठी 25 ते 28 अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगल्या प्रकारे वाढते
तसेच पिक वाढल्यानंतर फळधारणा होण्याच्या कालावधीमध्ये जास्त तापमान असले तर फळधारणा झाडांना कमी होते फळधारणा होण्याच्या वेळेस 26 ते 32 अंश असल्या तर झाडांना फळधारणा चांगली होते व पावसाचे प्रमाण जास्त झाले तर फुलांची मोठ्या संख्येने गळ धारणा होते व कळ्या झाडांना कमी लागतात फुलधारणा कमी झाली म्हणजे उत्पन्नात घट होते म्हणून पिकाला समोतल चांगले हवामान असणे गरजेचे आहे.
तीळ पिकाची लागवड कोणत्या जमिनीत करावी..
तीळ पीक ( Til lagwad ) साधारणता शेतकरी कोणत्याही जमिनीत घेऊ शकता मात्र कोणत्या जमिनीत घ्यायचे व कोणत्या जमिनीमध्ये घ्यायचे नाही आपण पुढील प्रमाणे जमिनीचा प्रकार पाहून तीळ पिकाची लागवड करत असताना सुपीक निचरा होणाऱ्या जमिनी म्हणजे तसेच मध्यम ते भारी किंवा काळी जमीनीमध्ये किंवा मळवट जमिनीमध्ये तिळाचे पीक आपण घेऊ शकतो तर या पिकाची लागवड फसन्या जाग्यावर किंवा पाणी ज्या जमिनीमध्ये थांब ते त्या जमिनीला पाणचुव जमीन असे म्हटले जाते.
अशा जमिनीमध्ये जर तिळाची लागवड केली तर तीळ पीक ( Til lagwad ) हे जमिनीतून बाहेरच निघत नाही कारण तिळाच्या निघण्याच्या वेळी जर तिळावर जर पाणी थांबले तर जमिनीमध्ये तिळ पूर्ण पणे सळुन जातात व तीळ पीक निघाल्यानंतर आहे 15 ते 20 दिवसांनी त्या जमिनीमध्ये जास्त पाऊस झाला किंवा त्या जागेवर जर पाणी थांबले तर तीळ पीक हे मुरी जाण्याचे प्रमाण जास्त राहते म्हणून या जागेवर तिळाची लागवड करू नये निचरा होणाऱ्या किंवा चांगल्या जमिनीमध्ये तिळाची लागवड करावी..
जमिनीची मशागत..
शेतकरी मित्रांनो पिकाची लागवड करत असतात जमिनीची मशागत चांगल्या प्रकारे करून घेणे गरजेचे असते तिळाचे बियाणे बारीक असते पेरणीनंतर तिळाचे झाड हे कवळे असते म्हणून शेतीची मशागत नागरटी करून ट्रॅक्टरच्या साह्याने रोटावेटर किंवा टिलरच्या साहाय्याने 2 ते 3 वाई देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी नंतर जमीन सपाट किंवा सवान करून घ्यावे किंवा त्या जमिनीतून पाण्याचा निचरा होणे गरजेचे असते जमिनीची चांगली मशागत केल्यास झाडांची उगम शक्ती ही चांगली राहते.
तीळ बियाण्यांची बीज प्रक्रिया..
शेतकरी मित्रांनो बियाण्यांची बीज प्रक्रिया का करावी तर मित्रांनो आपण तीळ ( Til lagwad ) बियाणे घरचे अथवा आपण फोन्डेशनचे वापरले तरीही आपण तीळ बियाण्यांची बिजप्रकिया करणे गरजेचे असते कारण जमिनीमधून उद्भवणारे बुरशीजन्य रोग होऊ नये म्हणून बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते व हेक्टरी साधारणतः 2.5 ते 3 .किलोग्रॅम प्रति हेक्टरी बियाणे वापरावे बीजप्रक्रिया करत्या वेळेस कोणते औषध वापरावे बीज प्रक्रिया करता वेळेस बाविस्टीन चार ग्रॅम प्रति किलो वापरावे..
पेरणीचा कालावधी व वेळ..
शेतकरी मित्रांनो तिळाची लागवड करत असल्यास पेरणी कोणत्या वेळेस करायची तर मित्रांनो आपल्या भागातील पावसाचा अंदाज घेऊन किंवा मान्सूनचा पहिला पाऊस पडून गेल्यानंतर दुसऱ्या पावसाळ्यात म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करणे गरजेचे असते पेरणी करताना बियांमध्ये बारीक वाळू किंवा आपले बारीक मिश्रखत वापरून बियांची पेरणी केल्यास बियांची समप्रमाणात बियांची उनारनी समप्रमाणात होते तसेच जास्त खोलवर बियाणे टाकल्यास उगम शक्तीही कमी होते तर लागवड करत असताना 2.5 पेक्षा जास्त खोलवर बियाणे टाकू नये.
तीळ पिकाची विरळनि का करावी शेतकरी मित्रांनो तीळ पिकाची ( Til lagwad ) लागवड करत असताना तीळ पीक हे एकदम बारीक असल्याकारणाने जास्त प्रमाणात बियांची संख्या पेरणीच्या वेळेस सुटते त्यामुळे झाडांची संख्या जास्त झाल्यामुळे झाडे बारीक होतात व त्यांना फळधारणा होत नाही तसेच पेरणीनंतर आठ ते दहा दिवसांनी पहिली विरळनि केल्यास चांगले पीक जोमाने होते तसेच दुसरी विरळनि 15 ते 22 दिवसांनी केल्यानंतर पिकाचे योग्य वाढ होण्यासाठी अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी चांगली मदत होते म्हणून पिकाचे विरळनि करणे गरजेचे असते ते पिक जास्त दाट झाले तर तिळा पिकाला फळधारणा व फुलांची गळ धारणा जास्त प्रमाणात राहतो उत्पन्नात घट होतो म्हणून विरळनि करणे गरजेचे असते..
तसेच मित्रांनो तिळाचे पीक जास्त प्रमाणात घ्यायचे असल्यास खालील काही गोष्टी करणे आवश्यक असतात खत खताचे नियोजन करणे गरजेचे असते जमिनीमध्ये शेन खत टाकने गरजेचे असते व नत्र पालाश युरिया देणे हे गरजेचे असते अंतर मशागतीवर ही तिळाचे पीक अवलंबून आहे शेतातील आंतरमशागत म्हणजे ती पेरणीनंतर पिकातील अंतर मशागत किंवा निधन करणे किंवा वाई करने गरजेचे असते व पिकाची योग्य वाढ होते व उत्पन्नही चांगले येते व पीक निरोगी राहते व किडीचे नियंत्रण व उपाय कीड त्या अवस्थेमध्ये पिकाची फवारणी करणे गरजेचे असते व पिकातून जास्त उत्पन्न अपेक्षित राहाते..
शेतकरी मित्रांनो तीळ पिकाची माहिती मी माझ्या शेतातील अनुभवाबद्दल लिहिलेली आहे तरी तीळ पीक घ्यायचे असल्यास किंवा तीळ पिकाबद्दल माहिती आवडल्यास माझी माहिती आपल्या शेतकरी बांधवांना पर्यंत पोहोचवावी व शेअर करावी मित्रांनो .
धन्यवाद.