Tractor Anudan – या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर 2020.

Tractor Anudan - या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर 2020

Tractor Anudan – या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर 2020

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांसाठी प्रगतीशील होण्यासाठी व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे शेती मधील काम लवकर होण्यासाठी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत दिसून येत आहे योजनेअंतर्गत आतापर्यंत 12751 शेतकऱ्यांना 86 कोटी 8 लाख रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे.

उन्हाळी कांदा लागवड तंत्रज्ञान -Kanda Lagwad 2021 lasalgaon


शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला ट्रॅक्‍टर(Tractor Anudan) किंवा शेती उपयोगी यांत्रिकरण खरेदी करायचे असेल तर आता आपल्याला त्याच्यावरती सुद्धा अनुदान मिळणार आहे तर आपल्याला ट्रॅक्टर साठी पोखरा तसेच कृषी विभागातून तसेच सीएससी सेंटर मधून आपल्याला ऑनलाईन अर्ज करणे सादर करणे गरजेचे असते आपण याचे पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या कृषी विभागांमध्ये संपर्क साधावा आणि आपण सुद्धा अनुदानावर ती ट्रॅक्टर मिळू शकतो तर मित्रांनो हि योजना राज्यामध्ये राबवल्या जात आहे हे आपण सविस्तर पाहणार आहे.

नक्की वाचा – Sharad Pawar Gram Samrudhi Yojana – राज्य सरकारचा शेतकर्‍यांसाठी मोठा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार वैयक्तीक व तीन पट अनुदान 2021

याआधी विशेष म्हणजे योजनेतून यापूर्वी वर्षाला फक्त तीनशे ते चारशे ट्रॅक्टर(Tractor Anudan) साठी अनुदान दिले जायचे यांना प्रथमच सुमारे चार हजार ट्रॅक्टर(Tractor Anudan) साठी अनुदान देण्यात आले आहे तर वर्षभरात तब्बल दहा ते बारा हजार ट्रॅक्टर साठी अनुदान देण्याचे उद्दिष्ट कृषी खात्याने ठेवले आहे.

राज्यामध्ये प्रत्येक कृषी विभागातून योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या जात आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर अनुदानावर ती ट्रॅक्टर(Tractor Anudan) घ्यायचे असेल तर आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचा आहे.

राज्यांना उन्नत शेती समृद्ध शेती अभियान राबवले जात आहे या अभियानातून कृषी खात्यातील वेगवेगळ्या योजना एकत्रपणे आणि सुटसुटीतपणे राबविण्यात येत आहे त्यात कृषी यांत्रिकीकरण एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेअंतर्गत मंजूर टंचाई आणि इतर बाबींचा विचार करून ट्रॅक्टरसह 15 प्रकारची यंत्रे, अवजारे दिली जाणार आहेत या तांदूळ आणि डाळी च्या गिरण्यांचाही समावेश आहे त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना यांत्रिकीकरण योजना, अन्नसुरक्षा आणि गळीत धान्य चार योजना एकत्र करण्यात आल्या आहेत.
या योजनेचा एकत्रित 198 कोटी रुपयांचा निधी चालू वर्षासाठी मंजूर करण्यात आला आहे योजनेसाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने एकाच वेळी जाहिरात देऊन शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले होते.

उन्नत शेती समृद्ध शेती ही योजना राज्यभरात राबविली जात आहे या योजनेसाठी राज्यातून शेतकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. जवळपास एक लाख वीस हजार शेतकऱ्यांनी योजनेसाठी प्रतिसाद दर्शविला त्यापैकी 72 हजार शेतकऱ्यांना कृषी खात्याने खरेदीसाठी पूर्वसंमती दिली आहे. त्यापैकी 32 हजार शेतकऱ्यांनी खरेदीची तयारी दाखवली आहे म्हणजेच शेतकऱ्यांनी ज्या वस्तूसाठी किंवा ज्या यांत्रिकीकरणासाठी अर्ज केला होता त्याची शेतकऱ्यांनी खरेदीसाठी ईच्छा दाखवली.

यातल्या 13 हजार 400 शेतकऱ्यांनी अवजारे खरेदी करून अनुदानाचे प्रस्ताव सादर केले. 13 नोव्हेंबर अखेर प्रत्येकी 12 हजार 751 शेतकऱ्यांना 86 कोटी 8 लाख
रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तरी सातशे शेतकऱ्यांच्या अनुदानाची वितरणाची प्रक्रिया सुरू आहे यानंतर जसेजसे शेतकऱ्यांचे अनुदानाचे प्रस्ताव प्राप्त होतील. त्यानुसार अनुदान वर्ग केले जाणार आहे सध्या मंजूर असलेले 198 कोटी रुपये खर्च झाल्यानंतर आणखी दोनशे कोटी रुपयांचा निधी या कार्यक्रमासाठी देण्याचे प्रस्तावित आहे टप्प्याटप्प्याने हा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे मंत्रालयीन उच्चपदस्थांनी स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन प्रक्रिया.
ही योजना अधिक पारदर्शक आणि समन्यायी तत्त्वावर राबवण्यासाठी कृषी खात्याने प्रत्येक टप्प्यावर आवश्यक ती खबरदारी घेतलेली आहे या आधी कृषी उद्योग विकास महामंडळाने सुचविलेले यंत्रणेने अवजारे घेण्याची सक्ती होती आता या योजनेतील शेतकऱ्यांना यंत्रे अवजारे घेण्याचे स्वातंत्र्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उपयोगी साधने स्वतःच्या पसंतीनुसार घेता येत आहेत अवजाराची खरेदीची पावती दाखवल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होत आहे कृषी खात्याकडून ऑनलाइन सोडत काढून शेतकऱ्यांना या यंत्रसामग्रीचे वाटप केले जात आहे.

शेतकरी मित्रांनो शासनाने मान्यता दिलेल्या यांत्रिकीकरण यंत्र आपल्याला पहिले खरेदी करावे लागत असे त्या अनुसार बरेचसे शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवत असत तर आता शासनाने नियम बदलून ज्या शेतकऱ्याला ज्या कंपनीचे किंवा त्याच्या आवडीचे अवजारे आता खरेदी करता येतात.

खर्च करायचा निधी.

कृषी खात्याने 40 % निधी ट्रॅक्टर साठी तर उर्वरित निधी इतर यंत्रांसाठी खर्च करायचे बंधन घातले आहे मात्र, काही जिल्ह्यात ट्रॅक्टर(Tractor Anudan), इतर यंत्रे, अवजारे यासाठी शेतकऱ्यांची गरजेनुसार मागणी येत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी 40:60 धोरणानुसार शिल्लक राहणारा निधी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खर्च करायचे सुधारित निदर्शन कृषी खात्याने जाहीर केले आहे.

ट्रॅक्टर(Tractor Anudan) साठी मंजूर अनुदान व किती अनुदान मिळणार.

सर्वसाधारण शेतकरी: मोठा ट्रॅक्टर- 1 लाख, छोटा ट्रॅक्टर -75 हजार रुपये

इतर शेतकरी:
मोठा ट्रॅक्टर- सव्वा लाख, छोटा ट्रॅक्टर- एक लाख रुपये.

2 thoughts on “Tractor Anudan – या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर 2020.

Leave a Reply

Your email address will not be published.

x