Tur lagwad 2021 -तूर पीकावरील संरक्षण सल्ला व नियोजन

तुर पिक हे प्रामुख्याने भारतात घेतले जाते व अंतर पिक म्हणुन तुर पिकांची Tur lagwad निवड केली जाते तुर पिक हे सोयाबीन, कपाशी,मक्का तसे बर्राशा पिकांमध्ये लागवड केली जाते तर आपण होनार्या किडींचे नियंत्रण टाळण्याकरिता काही उपाययोजना करणे गरजेचे असते.

Tur lagwad 2021 -तूर पीकावरील संरक्षण सल्ला व नियोजन

तर तूर पिकावर बर्यास्या किडींचे प्रादुर्भाव पाहायला मिळतात आज पर्यंत २०० किडींच्या प्रादुर्भावाची नोंद झाली असली, तरी प्रामुख्याने तुर Tur lagwad पिकांचे कळ्या व फुलोरा अवस्थेतील किडीपासून जास्त प्रमाणात नुकसान होते. यांच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते.तर शेतकरी मित्रांनो आपण जर तुर पिकांची लागवड केली असेल तर काय काळजी घ्यावी शेतकरी मित्रांनो तुर पिक ९० ते १०० दिवसांचे असताना आपण पहिली फवारणी केल्यास नियंत्रण राहते.

60 Amazing Fact in The World जगातील आश्चर्यकारक घटना, जगातील सत्य घटना

🌿 तूर पीककातील ( tur lagwad ) संरक्षण सल्ला व नियोजन

तर तुर पिकावर येणाऱ्या किडींचे नियंत्रण ठेवणे सोपे जाते
तर तुर Tur lagwad पिकावर आपण जवळपास सांधी किटकनाशके वापरुन फवारणी करावी. तर कोनते किनॉलफॉस व टाणीक व बुरशीनाशक वापरावे आपल्या पिकांची चांगली वाढ होते व झाडांना चांगल्या प्रकारे फाद्या फुटतात व पिकांची जोमाने वाढ होते या फवारणीचा फायदा पिकाला सेवट पर्यंत राहते आणि पाने गुंडाळन्याचे प्रमान कमी होते तर ही फवारणी आपण केली तर आपल्याला उत्पादन चांगली वाढ होण्यासाठी मदत होते तर तुर पिकावर होणारे किडींचे नियंत्रण कसे करावे.

तूर पिकाव होनार्या किडींचे नियंत्रण करा व महत्त्वाच्या किडीची माहिती जाणून घ्या व आपल्या उत्पादनातील होनारी घट टाळा.

🐛 तुर Tur lagwad पिकावरील शेंगा खानारी अळी 🐛

तुर पिकावर येणाऱ्या किडींच प्रकार म्हणजे चार प्रकार आहेत त्याअवस्थांपैकी अळी अवस्था ही अधिक हानिकारक आहे. कारण या किडीचा पतंग शरीराने दणकट असून, पिवळसर रंगाचा असतो व पुढील तपकिरी पंखजोडीवर काळे ठिपके असतात. तर मादी पतंग तुर पिक फुलोरा अवस्थेत आल्यावर अंडी घालण्यासाठी फुलांवर आकर्षित होतात. तर अळी ८० टक्के कळी, फुले व शेंगावर अंडी घालतात. अंडीची अवस्था ३ ते ४ दिवसांची असते.तर पूर्ण विकसित अळी पोपटी रंगाची असते. व अळीच्या शरीराच्या बाजूवर तुटक तुटक करड्या रेषा आढळतात.व अळी अवस्था हे १७ ते २२ दिवस असते.

तुर पिकावर Tur lagwad अळी नुकसानाचे प्रकार –

तुर पिकावर प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या तुरीची शेंड्यावरील कोवळी पाने तसेच कळ्या यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर करतात.तसेच कोवळ्या शेंगांना अनियमित आकाराचे मोठे छिद्र पाडून अळी अर्धी आत व अर्धी बाहेर राहते व शेंगातील दाणे खातात. व एका अळीचे नुकसान पाहता एक अळी साधारणतः १५ ते २० शेंगांचे नुकसान करते.  व मोठी अळी २५ ते ३० शेंगांचे नुकसान करते.ही अळी नोव्हेंबर ते मार्चपर्यंत क्रिया चालू ठेवत असते.

कळीचे एका झाडाचे नुकसान पाहता झाले तुर Tur lagwad पिकावर प्रति झाड एक अळी असल्यास हेक्टरी १३५ ते१४० किलो घट लागते.तर तुर पिकावर एका झाडावर तीन अळ्या असल्यास ३०५ ते३१० किलो घट प्रति हेक्टरी लागते.म्हणुन वेळेस नियोजन केले नाही तर उत्पादनात मोठी घट लागते

🌿🐞तुर पिकावर मोठा पिसारी पतंग🐞

Tur lagwad 2021 -तूर पीकावरील संरक्षण सल्ला व नियोजन


तुर पिकावर किडीचा पतंग हा नाजूक व निमुळता, करड्या व भुऱ्कट रंगाचा असतो. पुढील त्याचे पंख लांबट दुभंगलेले असून त्या पंखाच्या कडावर बारीक केसांची दाट लव असते, त्यामुळे त्यांना किडींचे नाव पिसारी पतंग म्हणतात. या किडींचे पाय लांब व बारीक असतात. अळी हिरव्या रंगाची साधारणपणे १५ मिमी लांबीची असते व मध्ये फुगलेले भाग असतो व दोन्ही टोकाकडून निमुळता असतो. पाठीवर बारीक काटेरी लव असते.

अंड्यातून बाहेर पडलेली अळी तुर पिकावर मोठ्या प्रमाणात नुकसान करते व ते अळी कळ्या, फुले व शेंगांना छिद्र पाडून खाते, तसेच पूर्ण वाढ झालेली अळी हे प्रथम शेंगांचा बाहेरील भाग खरडून खाते. नंतर शेंगांना, शेंगांच्या बाहेर राहून खाते. व ही अळी शेंगीच्या आत कधीच शिरत हि अळि बाहेर राहुनच पुरन शेंगांचा भाग खाते . व या अळीची अवस्था १० दिवसा पासून ते १५ .१६ दिवसांची राहते. व या अळीचे प्रमाण पावसाळा संपल्यानंतर तुर पिकावर मोठ्या प्रमाणात येतो .व तुर पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान करते व उत्पादन घट लागते

🐛तुर Tur lagwad शेंगीत अळी म्हणजे शेंगमाशी

मोठ्या पंतक अळीनंतर शेंगमाशी पिकांचे सर्वांत…… जास्त नुकसान करते. शेंग माशी आकाराने लहान १.५ मिमी लांब असून, माशीचा रंग हिरवट पोपटी असतो. अळी बारीक, गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून अळीला पाय नसतात. व अळीच्या तोंडाकडील भाग निमुळता म्हणजे बारीक असतो. अळी हे शेंगेमध्ये कोष अवस्थेत जाते.व सुरवातीला या अळीचे किंवा किडीचे कुठलेही लक्षण आपल्याला दिसुन येते नाही तसेच शेंगेंवर सुधा दिसत नाही.

अळीचा अंडे घालण्याचा कालावधी हा साधारणतः डिसेंबर ते जानेवारी असते. ही अळी शेंगेत आत शिरून दाणे अर्धवट कुरतडून खाते, त्यामुळे दाण्याची साइज आबोड धोबळ होते. आपन त्याला बारीक मुकन्या म्हनतो व दान्यावर येणार्या बुरशीमुळे दाणे कुजतात. व धान्याचे वजन कमी होते व उत्पादनात १० ते ५० टक्के घट लागते.म्हणुन अळीचे नियंत्रण ठेवणे गरजेचे असते व उत्पादन वाढ होते

🕸️एकात्मिक कीड व्यवस्थापन🕸️

– तुर पीक कळी व फुलोरा अवस्थेत असताना आपण आपल्या शेतातील तुर पिकांची पाहणी आठवड्यातून किमान १ वेळा बारीक निरीक्षण करणे गरजेचे असते. व हेक्टरी १२ ते २४ झाडाचे निरीक्षण करून घ्यावी.
– तुर पिकांच्या शेतात प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावे. लावताना कामगंध सापळे पिकाच्या १ फूट उंचीवर लावावेत.
– व तसेच ३ ते ५ फूट लांबीचे लाकडी काडीचे टी आकाराचे १० ते ५० पक्षिथांबे प्रति हेक्टरी उभारावेत.

नक्की वाचा – मका लागवड माहिती – sweet corn farming in india 2021

तुर पिकातीलआर्थिक नुकसान अंदाज –

आपण लावलेल्या कामगंध सापळ्यात सतत ३ दिवसा मधे आपल्या ला ८ ते १० नर पतंग सापडल्यास, किंवा एका झाडावर १ अळी प्रति झाड दिसल्यास किंवा ५ टक्के कीडग्रस्त शेंगा दिसल्यास.म्हणजे शेंगांना कोरलेले अवस्थेत दिसल्या तर पुढील प्रमाणे फवारणी करावी.

किटकनाशक फवारणी

तुर पिक हे फुलोऱ्याच्या सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५  मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.तसेच निंबोळी अर्क घरी तयार केलेला असेल तर तोच वापरावे

अळीचे नियंत्रण –

आपल्या शेतातील तुर पिकांची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास खालील प्रकारे फवारणीचे नियोजन करावे.व किडींचे नियंत्रण करावे

फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी

पहिली फवारणी – पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असल्यास
क्विनॉलफॉस (२५ टक्के ईसी) २ मिलि किंवा
इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी ०.७ मिलि

दुसरी फवारणी –
पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी –
इमामेक्टीन बेन्झोइट (५ टक्के एस.जी.) ०.४४ ग्रॅम किंवा
क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एस. सी.) ०.२५ मिलि वापर करावा व किडीचे नियंत्रण होत नसल्यास नंतर १० ते १५ दिवसांनी अंतर प्रभावी औषधे फवारणी करावी
प्रति १० लिटर पाण्यात ५ ते ६ मिली वापरावे

शेतकरी मित्रांनो वरील लिहलेला लेख मि माझ्या अनुभवावरून लिहिलेला आहे व मि वरील सर्व अनुभव माझ्या शेतात केलेला आहे व तुर पिकांचे चांगले उत्पादन घेतले आहे………आपला शेतकरी मित्र…

Tur lagwad 2021 -तूर पीकावरील संरक्षण सल्ला व नियोजन

शेतकरी मित्रांनो तूरीचे पीक Tur lagwad हे प्रामुख्याने भारतामध्ये तसे इतर देशांमध्येही घेतल्या जाते तरी तुरीचे पीक हे भारतामध्ये प्रामुख्याने आंतरपीक म्हणून याची ओळख आहे तुरीचे पीक बहुतांश शेतकरी घेतात तसेच महाराष्ट्रामध्ये 60 ते 70 टक्के आंतरपीक म्हणून तुरीचे पीक घेतले जाते तुरीचे पिकापासून तुरीची डाळ तसेच बेसन तसेच विविध प्रकारे तुरिचा वापर केला जातो तसेच महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने तुरीची डाळीचा आहार रोजच्या जेवणामध्ये वापर केल्या जातो तसेच तूर पीक आपल्याला एक रे साधारणतः 10 ते 12 क्विंटलपर्यंत ही घेता येऊ शकते व तुरीला हमी भाव मिळण्याची शक्यताच असते म्हणून बहुतांश शेतकरी आंतरपीक म्हणून किंवा सोयाबीन तुरीची लागवड करतात

आपल्याला शेतकरी मित्रांनो तुरीची लागवड करायची असल्यास भारी किंवा हलक्या जमिनीमध्ये तुतीची लागवड करणे चांगले राहते तसेच तुरीची लागवड करत असताना पाण्याचे किंवा खताचे नियोजन करणेही गरजेचे असते व काळजीपूर्वक म्हणजे तुरीची लागवड Tur lagwad हे पानचिव व फसण्या जमिनीमध्ये करू नये. तसेच तुरीचे पीक Tur lagwad वेगवेगळ्या प्रकारे घेतल्या जात आहे तुरीचे पीक जास्त प्रकारे कसे घेता येईल हे शेतकऱ्यांमध्ये हा स्पर्धा तयार झालेली आहे शेतकरी एका हेक्‍टरमध्ये 25 ते 30 क्‍विंटलपर्यंत उत्पादन घेताना आपण पहात आहोत तरी तुरीचे पीक Tur lagwad आपल्याला फायदेशीर करण्यासाठी आपण ठिबक सिंचनाद्वारे किंवा सरी-वरंब्यावर किंवा बेडवर लागवड केल्यास आपल्याला फायदेशीर ठरते तरी शेतकरी मित्रांनो हा लेख आवडला तर शेतकरी मित्रांपर्यंत व पोहोचवा.

हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेतकरी यांना जास्तीत जास्त शेअर करा

One thought on “Tur lagwad 2021 -तूर पीकावरील संरक्षण सल्ला व नियोजन

Leave a Reply

Your email address will not be published.

x