कोणत्याही पिकाचे चांगले उत्पन्न घेण्याकरिता आपल्याला खालील गोष्टींची आवश्यकता असते
शेत जमिन
खरीप हंगामातील उडीद ( vigna mungo ) या पिकाला मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य असते. क्षारयुक्त, खोलगट, पानचीव ,तसेच ,फसणी तसेच माथ्यावरील हलकी, निकस जमिनीत उडीद ( vigna mungo ) या पिकांची पिकाची लागवड करू नये. आम्ल-विम्ल निर्देशांक ,सामू, 6.0 ते 8.5 असलेल्या जमिनीत हे पिक घेन्यासाठी चांगली असते. या पिकाला सकस काळी, भारी प्रकारची जमीन लागते.
हत्ती चिखलात लोळला इन हिंदी Elephant Information in Marathi
vigna mungo farming in maharashtra 2021
पाणी धरून ठेवणारी मळीची जमीन जास्त मानवते. मध्यम काळ्या पण खोल जमिनीत तसेच काळ्या कपाशीच्या जमिनीतही हे पीक लावतात. ते जसे उष्ण प्रदेशांत तसेच समुद्रसपाटीपासून १,८०० मी. उंचीवरील थंड प्रदेशांतही येऊ शकते. डोंगरी भागांतील आणि दमट हवामानाच्या भागांतील उडीद ( vigna mungo ) चांगला शिजतो.
उडीद ( vigna mungo ) हे कडधान्य पिक मध्यम ते भारी जमिनीत घेतले जात असल्याने जमिनीची खोल नांगरटी करून, जमीन भुसभुशीत करणेआवश्यक असते. जमिनीची चांगली मशागत करुन झाली कि जुनं च्या म्हणजे मिर्रगाच्या पहिला पाऊस पडून झाला कि नंतर बैहीलाच्या साह्याने वखरपाळी किंवा ट्रॅक्टरने वखरटी किंवा रोटावेटर मारून घ्यावे, म्हणजे ढेकळे फुटून काडी कचरा वेगळा होऊन जाते व. ही धसकटे, काडी, कचरा व्यवस्थित वेचून घ्यावा. नंतर एक दोन पाळ्या द्याव्यात म्हणजे जमीन भुसभुशीत होऊन पेरणी योग्य होऊन जाते .
पेरणीची योग्य वेळ-
मान्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत पुरेसी वल म्हनजे 5 ते 6 इंच वल झाली किंवा जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी पूर्ण करणे आवश्यक असते. कारण पाऊस अनियमित पडला तर पेरणीस उशीर होतो व उत्पादनात घट येते. उशिरा पेरलेल्या पिकास लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुल व चरप्या येतात आणि त्याच्या वाढी साढी वाढीस पुरेसा कालावधी किंवा दिवस अवधी मिळत नाही, त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फुले, शेंगा कमी लागतात.शेंगा कमी लागतात त्यामुळे उत्पादनात मोठी घट होते, म्हणून वेळेवर पेरणीस अतिशय महत्त्वाची असते. पेरणीस जस जसा उशीर किंवा वेळ होईल, तस-तसा त्या उत्पादनातही घट होते
बियाणाचे प्रमाण व खालील औषध बीजप्रक्रिया करून घ्यावी चांगल्या प्रकारे करू घ्यावे व या पिकाची योग्य अशी एकरी रोपांची संख्या म्हणजे 4 ते 5 केिली बियाणे पुरेसे असते. पेरणीपूर्वी बियाणास बाविस्टीन १ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम चोळावे. तसेच ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रतिकेिलो या प्रमाणात बियाणास बीजप्रक्रिया केल्यास बुरशीजन्य (जसे भुरी व मूळकुज होत नाही) व रोपांच्या मुळात पांठर्या मुळा जास्त प्रमाणात येतात त्या मुळे रोप मुरी किंवा वाळ जात नाही रोगापासून पिकांचे संरक्षण होते. व त्याचबरोबर १o केिली बियाणास रायझोबियम जिवाणू संवर्धक व पीएसबी प्रति २00 ग्रम ते250 लावून पेरणी करावी.
नक्की वाचा – आपण आधार कार्ड/Aadhar Card phone number update in Marathi 2021
उळीद ( vigna mungo ) पिकांची पेरणीचे अंतर-
या पिकाची लागवड करत असताना महत्वाचे म्हणजे, एकरी रोपांची संख्या योग्य असन्या साठी दोन ओळीतील अंतर ३o तर दोन रोपांतील अंतर १o सें.मी. असावे. मात्र जास्त तनाळी व सेंद्रिय , किंवा जैविक पदार्थांचे प्रमाण कमी असणा-या जमिनीत आंतरमशाग करण्यासाठी सोयीनुसार दोन ओळीत ४५ सें.मी. अंतर वाढ़वावे.
( vigna mungo ) सुधारित किंवा चांगली जातीचे वाण
बीडीयु १- हे वाण कृषि संशोधन केंद्र, बदनापूर येथून सन २००१ मध्ये प्रसारित करण्यात आले. तसेच घरंचे चांगली बियाणे पेरणी साठी वापरावे कारण मुरी रोगास प्रतिकारक असते तसेच महाराष्ट्रातील शिफारस केलेल्या बियाणे वापरावे . तसेच दाणे हे मध्यम काळ्या रंगाचे असावी व टपोरे असून १oo दाण्याचे वजन ४.५ ते ५.o ग्रॅम एवढे असावी.
या वाणामध्ये प्रथिनांचे प्रमाण १९ टक्के इतके असते हे पिकांची काढणी हलकी जमीनीतील दोन, महीन्यात तर भारी जमिनीत अडीच महीने लागतात किंवा 70ते75 दिवसात काढणीस येतो. ह्या पिकाची उंची 22ते25इंच म्हणजे मध्यम उंच वाढणारा असून पाने अरुंद व खोड जांभळ्या किंवा लालसर रंगाचे असते. शेंगा काळ्या व चोपड्या किंवा बारीक काटेरी असतात त्यावर कमी प्रमाणात लव असतो. या वाणाचे सरासरी हलक्या जमिनीत उत्पादन 8-10तसेच भारी जमिनीत 10-12 किंटल प्रति हेक्टरी मिळते.
टिएयु उळीद ( vigna mungo ) बीयाणे-१
हे वाण डॉ.पंजाबराव देशमुख कृषी.विद्यापिठ. अकोला तसेच बी.ए.आर.सी मुंबई यानी संयुक्तपणे सन १९८५ साली प्रसारित केला आहे. हा वाण ७० ते ७५ दिवसात काढणीस तयार होतो. तसेच हा वाण मुरी रोगांपासून प्रतिकारक्षमता आहे. शेंगा काळी व चोपडी असून दाणे मध्यम आकाराचे असतात आणि १oo दाण्याचे वजन ३.५ चे ३.८ ग्रॅम इतके असते. या वाणांमध्ये १९ ते २० टक्के प्रथिने आढळून येतात. या वाणाचे उत्पादन तसेच हलक्या भारी जमिनीत जास्त प्रमाणात उत्पादन येते१२ किंटल प्रति हेक्टरी आहे.
टीपीयु उळीद ( vigna mungo ) वाण-४ –
हा वाण ६५ ते ७o किंवा 70ते 75 दिवसांमध्ये काढणीस तयार होतो. हे वाण लवकर तयार होणारे असून हे वाण तीन राज्यात शिफारस केलेला आहे महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यासाठी शिफारस केले आहे. या वाणाचे दाणे काळे टपोरे असून प्रति हेक्टरी 9 ते 10 क्रिंटल उत्पादन मिळते.
जमीन नांगरून दोन तीन कुळवाच्या पाळ्या देऊन मोकळी करून सपाट करतात. तिच्यामध्ये दर हेक्टर क्षेत्राला ५,०००—६,००० किग्रॅ. शेणखत अगर कंपोस्ट खत घालून ३५—५० किग्रॅ. फॉस्फेरिक अम्ल आणि २५—५० किग्रॅ. नायट्रोजन मिळेल इतकी रासायनिक खते घालून जमीन तयार करतात. तिच्यामध्ये काकरीत ३०—३६ सेंमी. अंतर ठेवून हेक्टरी १०—१२ किग्रॅ. बी पेरतात. उडदात सुधारलेले वाण आहेत. त्यांचे बी भारतातील बहुतेक प्रांतांतून मिळू शकते. बी पेरल्यानंतर जमीन दाबण्याकरिता फळी फिरवितात. पीक एकटेच स्वतंत्रपणे किंवा कापूस, मका, ज्वारी अगर बाजरीच्या पिकात मिश्रपीक म्हणून घेतात.
काही ठिकाणी पेरल्यानंतर पंधरा दिवसांनी ओळीतील रोपांत २०—२५ सेंमी. अंतर ठेवून रोपांची विरळणी करतात. पेरणीपासून २०—२५ दिवसांनी एक कोळपणी करून खुरपाणी करतात. त्यानंतर पीक झपाट्याने वाढते. म्हणून जरूरीप्रमाणे पुन्हा एकदा कोळपणी आणि खुरपणी करतात.
पिकांचेअन्नद्रव्ये व्यवस्थापनाचे नियोजन-
या पिकाच्या मुळाद्वारे नत्र स्थिरीकरण चांगले व्हावे आणि मुळाची योग्य वाढ होण्यासाठी जमिनीची मशागत करतेवेळी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत तसेच शेद्रीय खत असल्यास व्यवस्थित मिसळावे. तसेच पेरणीच्या वेळी एकरी १५ किलो युरिया अधिक १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा १बॉग डी.ए.पी.खत अधिक ६ किलो युरिया द्यावे. कारण जमिन भुसभुशीत होते.
आंतरमशागत करणे ( vigna mungo )
पेरणीनंतर सुरुवातीच्या एका महिन्यात किंवा तण वाढीच्या आधी तण नियंत्रणासाठी १ खुरपणी व २ कोडपणी करुन घ्यावी, कारण तण जर मोठे झाले वनियंत्रण १ महिन्यापर्यंत न झाल्यास पिकांची वाढ चांगली होत नाही आणि त्याचा परिणाम पिक नुकसाता मोठ्या प्रमाणात होते.
ऊळीद ( vigna mungo ) हे आंतरपीके म्हनुन लागवड केली जाते
आंतरपीक म्हणून या पिकाला विशेष महत्व प्राप्त आहे. या पिकाच्या कालावधीमुळे हे पिक तूर, ज्वारी, कपाशीत,मक्का,आंतरपीक म्हणून घेता येतो .
पीक संरक्षण व रोग नियंत्रण
या पिकावरील येणारा रोग विशेष करून भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. हा प्रादुर्भाव म्हणजे नियंत्रण टाळण्याकरिता टीएयु-१, बी.डी.यु-१ अशा रोगप्रतिकारक्षम वाणाची लागवडीकरिता निवड करावी. सततच्या पावसाच्या झडीनंतर एकदम ७ ते ८ दिवस पावसाने दडी मारून वातावर चांगले झाल्यावरच लगेच फवारणी करावी व पिकात जास्तीत जास्त उत्पादन घ्याल.
शेंगा पिकून काळ्या दिसू लागल्या म्हणजे एक दोन तोड्यात त्या काढून घेतात. खळ्यावर नेऊन त्या चांगल्या वाळवितात. वाळल्यानंतर काठीने बडवून अगर बैलांच्या पायाखाली तुडवून त्यांची मळणी करतात. नंतर भुसकट उफणून उडीद ( vigna mungo ) काढून घेऊन साफ करून पोत्यात भरून साठवून ठेवतात. काही ठिकाणी पीक तयार झाल्यावर शेंगांसह झाडे उपटून घेऊन सात-आठ दिवस ती खळ्यात वाळू देतात आणि नंतर वरीलप्रमाणे त्यांची मळणी करतात.
आमच्या शेती संबंधी लेख आवडल्यास इतरांना जरूर पाठवा