नव- नवीन पिकांच्या वाणांमुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात शास्त्रत्रांचा संशोधक मोठी भूमिका निभावत आहेत. नव- नवीन पिकांचे वाण विकसित करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात हातभार लावत आहेत. दरम्यान काही दिवसानंतर गव्हाची पेरणी केली जाईल. गव्हाचे उत्पन्न करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी वाचल्यानंतर आपल्या उत्पन्नात भरभराट होईल. कारण संशोधकांनी गव्हाच्या दोन वाण विकसीत केल्या आहेत.
भारतीय संस्कृतीबद्दल अद्भुत सत्य Amazing Fact about Indian Culture
या वाणांमध्ये रोगप्रतिकार शक्ती अधिक असून उत्पन्नासाठी फार उपयुक्त आहेत. Indian Wheat and Barley Research Institute भारतीय गहू wheat farming आणि बार्ली संशोधन संस्थेने हे वाण विकसित केले आहे. दरम्यान या संस्थेचे संचालक डॉ. जीपी सिंह माध्यमांशी बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असे वाण विकसित करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो.
ऑगस्ट महिन्यातील २४ आणि २५ तारखेला ग्लोबल व्हीट इंप्रुव्हमेंट समिटमध्ये नव्या वाणांना मंजुरी मिळाली. हे वाण अधिक उत्पन्न देणारे आहेत. देशातील विविध भागानुसार हे वाण विकसित करण्यात आले आहेत .
दरम्यान यात गव्हाचे ११ आणि एक बार्लीचे वाण आहे. या वाणांमधून अधिक उत्पन्न होणार असून याच्या मध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. यामुळे पिकांना दुसरे रोग लागण्याचा धोका कमी असतो. या ११ वाणांमधील दोन वाण असे आहेत की, त्यांचे उत्पादन अधिक होते. प्रति हेक्टर ७५ क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन या तीन वाणांमधून मिळाले आहे.
यातील ९ वाण हे भारतीय गहू wheat farming आणि बार्ली संस्था, करनाळने विकसित केले आहे. तर चौधरी चरण सिंह कृषी विश्वविद्यालय हिसारने एक वाण विकसित केले आहे.
डॉ. जीपी सिंह यांनी बार्लीच्या वाणांविषयी माध्यमांना माहिती दिली. आधी देशात पिकणाऱ्या बार्लीपासून बिअर उत्पादित केल्या जात नव्हती. परंतु नव्या वाणातून बिअर उत्पादित केले जाते, यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असतो. दरम्यान भारतात २९.८ मिलियन हेक्टर क्षेत्रावर गव्हाची शेती केली जाते.
कोणत्या राज्यासाठी कोणते वाण आहे उपयोगी
हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यात गव्हाचे उत्पादन अधिक घेतले जाते. उत्तर पश्चिम मैदानी क्षेत्रासाठी (NEPZ) हे वाण विकसित केले आहे. हे वाण पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, पश्चिमी उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीरमधील जम्मू आणि कठुआ जिल्हा, हिमाचल प्रदेशाच्या ऊना जिल्हा आणि उत्तराखंडसाठी उपयुक्त असून या भागातील वातावरण या वाणासाठी लाभकारक आहे.
यातील पहिले वाण हे 3298 (HD 3298), हे सिंचित जमिनीसाठी आणि उशिराने याची पेरणी केली जाते. डीडब्ल्यू 187( DBW 187), डीडब्ल्यू 3030 ( DBW 303) आणि डब्ल्यूएच 1270 (WH 1270) या तीन वाणांची पेरणी लवकर केली जाते.
उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, आणि पश्चिम बंगालसाठी एचडी 3293 (HD3293) हे वाण विकसित करण्यात आले आहे. हे वाण सिंचित आणि वेळेवर पेरावे लागते. छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, कोटा आणि राजस्थानच्या उद्यपूर परिसरासाठी, उत्तर प्रदेशाच्या झांशी भागासाठी सीजी1029 (CG 1029) आणि एचआय 1634 (HI 1634) हे वाण विकसित करण्यात आले आहे. वेळेवर या वाणाची पेरणी करावी लागते.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, आणि तमिळनाडूसाठी डीडीडब्ल्यू 48 (DDW 48), एचआय 1633 (HI 1633) , एनआईडीडब्ल्यू 1149 ( NIDW 1149) हे वाण विकसित करण्यात आले आहे. वाण डीडीडब्ल्यू 48 (DDW 48) सिंचित जमीन आणि वेळेवर पेरावे लागते. एचआई 1633 (HI 1633) हे वाण उशिराने पेरावे लागते. तर एनआईडीडब्ल्यू 1149 ( NIDW 1149) हे वाणाचा पेरा हा वेळेवर करावा लागतो.
आपण बघणार आहोत कोणते वाण कसे लागवड केली जाते
औरंगाबाद-जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी 73 क्विंटल तर मंगळवारी 10 क्विंटल नवीन गव्हाची आवक झाली. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने गव्हाला सध्या 1911 ते 2 हजार 41 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मात्र, या पुढील काळात गव्हाची आवक वाढून भाव कमी होणार असल्याने ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गतवर्षी पडलेल्या दुष्काळात गव्हाची पेरणी केवळ 31 टक्केच झाली होती. या क्षेत्रातून हेक्टरी 12 ते 13 क्विंटल जेमतेम उत्पादन मिळाले. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकर्यांकडे मुबलक प्रमाणात गहू wheat farming उपलब्ध नव्हता. परिणामी बाजारातील गव्हाच्या किमती 2 हजार ते 3200 रुपयांवर पोहोचल्या होत्या.
त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून शहरात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब आदी राज्यातून दररोज 100 टन गव्हाची आयात करण्यात येत आहे. मात्र पुरवठय़ाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने गव्हाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. आता नवीन गहू wheat farming बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
हेक्टरी 15 ते 16 क्विंटल गहू ( wheat farming )
या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात दमदार मान्सून बरसला. त्यामुळे खरिपाची पेरणी वेळेवर होऊन काढणीही लवकर झाली. त्या खाली झालेल्या क्षेत्रावर पुढील पाणीटंचाई लक्षात घेता सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात रब्बी गव्हाची पेरणी केली होती. त्याची काढणी नुकतीच करण्यात आली आहे. हेक्टरी 15 ते 16 क्विंटल सरासरी उत्पादन झाले. कचरू डुगले, शेतकरी, सोनगाव
नक्की वाचा – Watermelon Farming In India – टरबूज आणि खरबूज पिकाची लागवड करून मिळावा लाखोंचे उत्पन्न 2021
गव्हाचे उत्पादन विक्रमी
गतवर्षी हेक्टरच्या केवळ 31 टक्केच पेरणी झाली होती. यंदा पर्जन्यमान चांगले झाले. त्यामुळे 92 टक्के गव्हाची पेरणी झाली. उत्पादनही 15 ते 16 प्रतिहेक्टर होईल. त्यामुळे यंदा गव्हाचे उत्पादन विक्रमी होऊन भाव समतोल राहण्यास मदत होईल. सतीश शिरडकर, प्रकल्प उपसंचालक, आत्मा.
भाव अजून कमी होतील
नवीन गव्हाची आवक सुरू झाली आहे. दोन दिवसांत 83 क्विंटल गहू wheat farming विक्रीसाठी आला. त्याला 1900 ते 2 हजार 41 रुपयांपर्यंत भाव मिळाला. येथून पुढे आवक वाढून भाव कमी होतील. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. नानासाहेब आधाने, सचिव, जिकृउबा समिती
शरबतीचा मान कायम
आपल्याकडे अजित, लोकवण, 496 या गव्हाची वाण पेरली जाते. त्याला बाजारात 1700 ते 2200 रुपयांपर्यंत भाव मिळतो. पण मध्य प्रदेशात पिकणार्या शरबती गव्हाला आपल्याकडे 2700 ते 3200 रुपये भाव मिळतो. शरबती गव्हाच्या वाणाची आपल्याकडे पेरणी होत नसल्यामुळे शरबती गव्हाचे भाव 2400 ते 2700, किरकोळ बाजारात 3200 पर्यंत कायम राहण्याची शक्यता बाजार समितीचे प्रमुख संतोष गायकवाड यांनी वर्तवली आहे.
आपण निर्यातीसाठी कोणता गहू wheat farming लावणे गरजेचे आहे:—
भारतामध्ये आपली देशांतर्गत गरज भागवून उर्वरित गव्हाची निर्यात करण्याची क्षमता आहे. त्यातून परकीय चलन मिळवण्यास वाव आहे. निर्यातीसाठी शासनामार्फत भरपूर सवलती देण्यात येतात व त्यामुळे शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला माल विकून जास्त पैसे मिळवू शकतो.
आता सध्याच्या काळात सुधारित गव्हाच्या जाती आहेत. त्या आपण बघुयात.
अस्टीवम (शरबती),
ड्यूरम (बन्सी/ बक्षी) व
डायकोकम (खपली) अशा तीन प्रजाती आहेत.
परदेशात ड्यूरम गव्हाला जास्त मागणी आहे. जो ड्यूरम गहू wheat farming जिरायती क्षेत्रात घेतात त्याला ‘बन्सी गहू’ wheat farming म्हणतात.
आणि बागायती ड्यूरम गव्हाला ‘बक्षी गहू’ wheat farming म्हटले जाते.
ड्यूरम गव्हापासून चांगल्या प्रतीचा ब्रेड, मेकौरोनी (शेवया, कुरडया इ.) वर्म्हीसेली, इन्स्टट दलिया, नुडल्स इ. पदार्थ तयार करता येतात.
ड्यूरम गहू wheat farming दाण्यांचा आकर्षक रंग व चमकदारपणा यासाठी प्रसिद्ध असून, तो निर्यातीसाठी उत्तम आहे.
महाराष्ट्रातील हवामान, जमीन ही गहू wheat farming उत्पादनासाठी योग्य आहे. त्यातून पिवळसर चमकदार रंगाचे टपोरे गहू wheat farming दाणे मिळू शकतात. त्याच प्रमाणे राज्यामध्ये काजळी रोगाचाही प्रादुर्भाव फारसा होत नाही.
आपल्या हवामानात गव्हामध्ये कवडी (येलोबेरी)चे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी आढळते. हा निर्यातीसाठी महत्त्वाचा निकष आहे.
गव्हाच्या निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील. मापदंड :
प्रतीचे गुणधर्म प्रमाण (%)
कमाल आर्द्रता १४ पेक्षा कमी
प्रथिने १२ ते १४
चमकदारपणा ८० पेक्षा जास्त
इतर पदार्थ १ पर्यंत
शरबती गव्हाचे मिश्रण ५ पेक्षा कमी
तुटलेले खराब रोगट बियाणे ४ पेक्षा कमी
सेडिमेन्टेशन ३५ पेक्षा जास्त
कवडीचे प्रमाण (येलोबेरी) १० पेक्षा कमी
बीटा केरोटीन ५ पी पी एम पेक्षा जास्त
हेक्टोलिटर वजन ७८ पेक्षा जास्त
१०० दाणे वजन ५ ग्राम पेक्षा जास्त
ड्यूरम गव्हाचे निर्यातीसाठी गुणधर्म :
खाली दिलेल्या तक्त्यामधील भौतिक तसेच रासायनिक गुणधर्मामुळे ड्यूरम गहू wheat farming निर्यातक्षम आहे.
भौतिक गुणधर्म
वजनदार दाणे
दाण्यांचा एक सारखा आकार व आकारमान
चकाकी असलेले पिवळसर दाणे
जास्त रवा देणारे दाणे
सारख्या आकाराचे कण असणारा रवा
कडक व न चिकटनारे कणीक जास्त
पाणी कमी शोषणारा रवा
पांढऱ्या डागाविरहित दाणे
रासायनिक गुणधर्म
जास्त प्रथिने
कमी अल्फा अमिलेन हिचा
लिपाकसीडेज क्रिया विरहित
जास्त बीटा केरोटीन
जास्त ग्लूटेन
लवचिक ग्लूटेन
जमीन अशी हवी :
या पिकास जमिन मध्यम ते भारी, काळी कसदार व पाण्याचा निचरा होणारी निवडावी.
हलक्या मध्यम जमिनीत भरपूर भरखते आणि योग्य प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केल्यास चांगले उत्पादन घेता येते.
पूर्वमशागत कशी करायची :
गव्हाची मुळे ६० ते ७० सेंमी खोलीपर्यंत वाढत असल्याने जमिनीची पूर्वमशागत चांगली करावी.
१५ ते २० सेंमी खोल नांगरणी करून, ढेकळे फोडून घ्यावीत. त्यात शेणखत किवा कंपोस्ट खत पसरावे. त्यानंतर कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमिन भुसभुशीत व समपातळीत करावी. पूर्वीच्या पिकाची धसकटे, तणांच्या मुळ्या (काशा), इ. वेचून शेत स्वच्छ करावे.
पेरणी कशी करावी:
खरीपात डाळवर्गीय पिक घेऊन रब्बी हंगामात ड्यूरम गव्हाची लागवड केल्यास फायदेशीर ठरते.
अधिक व उत्तम प्रतिच्या उत्पादनासाठी १५ ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान पेरणी करावी. त्यामुळे गव्हास पोषक हवामान उपलब्ध होते. दोन ओळीतील अंतर २३ सेंमी ठेवून ‘बी’ साधारणपणे २.५ ते ३.० सेंमी खोल पेरावे. हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. बियाण्यास प्रति किलो ३ ग्रॅम कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी. काजळी रोग टाळणे शक्य होईल.
ड्यूरम पिकातील अंतर
गव्हाच्या इतर जातींचे मिश्रण टाळण्यासाठी दोन गव्हाच्या जातींमध्ये योग्य अंतर असावे.
खते कशाप्रकारे द्यावी:
हेक्टरी २५ ते ३० गाड्या शेणखत किवा कंपोस्ट खत द्यावे.
पेरणी वेळी ६० : ६०: ४० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी द्यावे.
नत्राचा उर्वरित ६० किलोचा हप्ता पहिल्या पाण्याच्या पाळी बरोबर युरीयाच्या स्वरुपात द्यावा.
पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी सूक्ष्म खते १९:१९:१९ किवा १२:४२:०० किवा ००:५२:३४ किवा १२:३२:१६ इ. खतांचा योग्य वापर करावा.
सुधारित वाण पिक तयार होण्यास लागणारा कालावधी –
सरासरी उत्पादन क्विं/हेक्टर)-
प्रमुख वैशिष्ट्य—-
:- एम. ए. सी. एस. ३१२५ (बागायती वाण)११२ ते ११५४४ ते ५२तांबेरा रोगास प्रतिकारक, पिवळसर चमकदार व जाड दाणे, रवा, शेवयासाठी उत्तम
:- वाणएन. आय डी. डब्ल्यू. १५ (पंचवटी) (जिरायती वाण)११५ ते १२०१२ ते १५प्रथिने १२ %, दाणे जाड, चमकदार आणि आकर्षक, तांबेरा रोगास प्रतिकारक,
:- एम. ए. सी. एस. ४०२८ (जिरायती वाण)१०० ते १०५१८ ते २०तांबेरा रोगास प्रतिकारक, प्रथिने १४.७ %, जस्त ४०.३ पी पी एम,
लोह ४६.१ पी पी एमएम. ए. सी. एस. ३९४९ (बागायती वाण)११० ते ११२ ४४ ते ५० आकर्षक व तजेलदार दाणा, तांबेरा रोगास प्रतिकारक, रवा, कुरडया, शेवयासाठी उत्तम वाण एन. आय डी. डब्ल्यू.२९५ (बागायती वाण)११५ ते १२०४० ते ४५दाणे चमकदार व मोठे जाड, तांबेरा रोगास प्रतिकारक, उत्तम वाण.
पाणी व्यवस्थापन :
पेरणीनंतर १८ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
हलक्या-मध्यम जमिनीत १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. तथापि, पिक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत. त्या वेळी पाणी देणे फायद्याचे ठरते.
पिकाची परिस्थिती व दिवस
मुकुट मुळे फुटण्याची वेळ पेरणी नंतर – २१ ते २३ दिवस
फुटवे येण्याची वेळ पेरणी नंतर – ३० ते ३५ दिवस
कांडी धरण्याची वेळ पेरणी नंतर – ४० ते ४५ दिवस
पिक फुलोरा/ओम्बीवर येण्याची वेळ पेरणी नंतर – ६० ते ६५ दिवस
दाण्यात चिक भरण्याची वेळ पेरणी नंतर – ९० ते ९५ दिवस. अश्याप्रकारे गहू wheat farming या वाणाची आपण माहिती बघितली.